बिल गेट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
बिल गेट्स
जन्म विल्यम हेन्री गेट्स तिसरा
२८ ऑक्टोबर १९५५ (वय ६१)
सिऍटल, वॉशिंग्टन, यु.एस.ए.
राष्ट्रीयत्व अमेरिकन
भाषा इंग्लिश
वडील विल्यम्स एच. गेट्स
आई मॅरी मॅकसवेल गेट्स
पत्नी मेलिंडा गेट्स (m. १९९४)
अपत्ये तीन
अधिकृत संकेतस्थळ http://gatesnotes.com/

विल्यम हेनरी "बिल" गेट्स ३रे (जन्म - ऑक्टोबर २८, इ.स. १९५५- हयात) हे मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक व मालक आहेत. ते दानशूर म्हणून प्रसिद्ध आहेत.

बिल गेट्स यांचा जन्म सिऍटल, वॉशिंग्टन, डी.सी. येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विल्यम्स एच गेट्स एक वकील होते व आईचे नाव मॅरी मॅक्सवेल गेट्स आहे. त्यांचे आईवडील इंग्लिश, जर्मन, स्कॉट-आयरिश वंशाचे आहेत. बिल गेट्स यांच्या मोठ्या बहिणीचे नाव क्रिस्टी व छोट्या बहिणीचे नाव लिबी आहे.

मायक्रोसॉफ्ट ही कंपनी पॉल अॅलन आणि बिल गेट्स या दोघांनी मिळून स्थापन केली.काही वर्षातच ही जगातील सर्वात मोठ्या PC(व्यक्तिगत संगणक) सॉफ्टवेअर कंपनी बनली. मायक्रोसॉफ्टमधे असताना ते सॉफ्टवेअर बांधणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. तसेच, गेट्स यांच्याकडे कंपनीचे सर्वाधिक वैयक्तिक शेअर्स (८ टक्के) आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही प्रकाशित केलेली आहेत. सन १९८७पासून, बिल गेट्स यांचा  'फोर्ब्स' जाहीर करत असलेल्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत समावेश होत आला आहे. इ.स. २००९ पर्यंत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. इ.स. २०११ मध्ये बिल गेट्स यांचे जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत दुसरे स्थान व अमेरिकेच्या श्रीमंत लोकांच्या यादीत पहिले स्थान होते.विकिक्वोट
बिल गेट्स हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.