जेम्स मिशनर
American author (1907-1997) | |
माध्यमे अपभारण करा | |
![]() | |
जन्म तारीख | फेब्रुवारी ३, इ.स. १९०७ Doylestown |
---|---|
मृत्यू तारीख | ऑक्टोबर १६, इ.स. १९९७ ऑस्टिन |
मृत्युचे कारण |
|
चिरविश्रांतीस्थान |
|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
|
नागरिकत्व | |
निवासस्थान | |
शिक्षण घेतलेली संस्था |
|
व्यवसाय |
|
नियोक्ता |
|
राजकीय पक्षाचा सभासद | |
कार्यक्षेत्र |
|
वैवाहिक जोडीदार |
|
कर्मस्थळ | |
उल्लेखनीय कार्य |
|
पुरस्कार |
|
![]() |
जेम्स आल्बर्ट मिशनर (फेब्रुवारी ३, इ.स. १९०७:डॉइल्सटाउन, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ऑक्टोबर १६, इ.स. १९९७:ऑस्टिन, टेक्सास, अमेरिका) हे पुलित्झर पुरस्कार विजेते अमेरिकन लेखक होते.
मिशनरने ४०पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. यांतील बहुतेक पुस्तकांची कथानके दीर्घ काळात पसरलेली आणि अनेक कुटुंबांतील अनेक पिढ्यांचा माग घेणारी आहेत. ही कथानके विशिष्ट प्रदेशांत असून त्यांत तेथील इतिहासाचा बारीक तपशील विणलेला आहे. ही पुस्तके लिहिण्यासाठी मिशनरने प्रत्येक प्रदेशांत अनेक वर्षे घालवून संशोधन केले होते.[१]
पूर्वजीवन
[संपादन]मिशनरचा जन्म ३ फेब्रुवारी, १९०७ रोजी अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील डॉइल्सटाउन शहरात झाला. नंतर त्यांनी लिहिलेले आहे की आपले खरे आई-वडील कोण होते आणि आपला जन्म नेमका कुठे झाला हे त्यांना माहिती नव्हते.[१] त्यांना त्यांच्या दत्तक ई मेबेल मिशनरने वाढवले. त्या क्वेकर होत्या आणि जेम्सनाही त्यांनी क्वेकर धर्मात वाढवले.[२]
मिशनरने १९२५मध्ये डॉइल्सटाउनच्या सेंट्रल बक्स हाय स्कूलमधून बारावी उत्तीर्ण केल्यानंतर १९२९मध्ये स्वार्थमोर कॉलेजमधून इंग्लिश आणि इतिहास विषयांमध्ये पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी देशभर प्रवास केला. खिशात पैसे नसल्याने ते महामार्गावर लोकांकडून फुकट लिफ्ट मागत तसेच मालगाड्यांच्या डब्यातून प्रवास करीत असत. त्यानंतर ते स्कॉटलंडला युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्रुझ येथे गेले व तेथे दोन वर्षांची पदवी मिळवली.[३]
स्कॉटलंडहून परतल्यावर त्यांनी पॉट्सटाउनमधील द हिल स्कूल येथे शिक्षकाची नोकरी पत्करली. १९३३ ते १९३६ दरम्यान त्यांनी न्यूटन शहरातील जॉर्ज स्कूल येथे इंग्लिश शिकवले. त्यानंतर ते कॉलोराडोच्या ग्रीली शहराला गेले व तेथील कॉलोराडो स्टेट टीचर्स कॉलेजमधून (आताचे युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्दर्न कॉलोराडो) शिक्षणशास्त्रात उच्चपदवी घेतली.[२]
कारकीर्द
[संपादन]युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्दर्न कॉलोराडोमधून पदवी घेतल्यावर मिशनरने तेथे आणि कॉलेज हाय स्कूल मध्ये शिकवले. ऑक्टोबर १९७२मध्ये विद्यापीठाने त्यांच्या नावाने एक ग्रंथालय स्थापले आहे.[४][५]
१९३९मध्ये मिशनरने हार्वर्ड विद्यापीठात पाहुणे व्याख्याता म्हणून पद स्वीकारले व ते कॉलोराडो सोडून परत ईशान्य अमेरिकेत गेले. तेथे एक वर्ष काम केल्यानंतर त्यांनी मॅकमिलन पब्लिशर्स या प्रकाशन कंपनीमध्ये समाजशास्त्रीय शिक्षण संपादक पदावर नोकरी घेतली.[२]
याच सुमारास दुसरे महायुद्ध सुरू होते व जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केल्यानंतर त्यात अमेरिका ओढले गेले होते व अमेरिकेतील १८-४५ वर्षाच्या सगळ्या नागरिकांना लष्करात भरती केले जात होते. आपण क्वेकर धर्म पाळतो, लढाई करणे हे आपल्या धर्माविरुद्ध असल्याने आपण नैतिक युद्धविरोधी असल्याचे कारण सांगून मिशनरना लष्करात भरती होणे नाकारता आले असते परंतु मिशनरनी अमेरिकेच्या आरमारात भरती होणे पसंत केले.[१][६][७] युद्धादरम्यान त्यांची जेथे बदली झाली तेथील अधिकाऱ्यांचा असा चुकीचा समज झाला की अॅडमिरल मार्क मिट्शर हे जेम्स मिशनरचे वडील आहेत. त्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी पाठविण्यात आले.[८] या प्रवासांमधील अनुभवांवरून त्यांनी टेल्स ऑफ द साउथ पॅसिफिक हे आपले पहिले पुस्तक लिहिले.[२]
साहित्यिक कारकीर्द
[संपादन]
मिशनरने दुसऱ्या महायुद्धादरम्यान आपल्या लेखनाला सुरुवात केली. अमेरिकन आरमारातील सेंकट लेफ्टनंट पदावर असताना त्यांना आरमारी इतिहासकार म्हणून नेमणूक झाली. प्रशांत महासागरातून केलेल्या आपल्या प्रवासांमध्ये त्यांनी तपशीलवार नोंदी ठेवल्या होत्या. या नोंदींचा वापर करून त्यांनी आपले पहिले पुस्तक लिहिले. या पुस्तकाला तुफान लोकप्रियता मिळाली व १९४८चा पुलित्झर पुरस्कारही मिळाला. या वेळी मिशनरचे वय ४० वर्षे होते. रॉजर्स अँड हॅमरस्टाइन या नाट्यसंस्थेने १९४९मध्ये त्याचे ब्रॉडवेवरील संगीतनाटकात रुपांतर केले.[९] यावरून पुढे १९५८ आणि २००१मध्ये त्याच नावाचे चित्रपट काढले गेले. त्यांच्या सेंटेनियल या पुस्तकाचे १२ भागांच्या दूरचित्रवाणी मालिकेत रुपांतर केले गेले. ही मालिका १९७८-७९मध्ये एनबीसीवर प्रसारित झाली.[१०]
मिशनरना त्यांच्या जीवनकालात अमाप प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या पुस्तकांच्या किमान ७.५ कोटी प्रती जगभरात विकल्या गेल्या.[११] हवाई ही त्यांची पहिली महाकांदबरी होती. याचे प्रकाशन हवाईला अमेरिकेचे ५०वे राज्य म्हणून मान्यता मिळण्याच्या दिवशीच केले गेले. या कादंबरीसाठी हवाईमध्ये अनेक वर्षे राहून त्यांनी खोल संशोधन केले होते. त्यांनी आपल्या पुढील सगळ्या महाकादंबऱ्या लिहिताना त्यांनी असेच अफाट संशोधन आणि अभ्यास केला. यासाठी त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक, भौगोलिक, भूशास्त्रीय आणि अशा अनेक विषयांत खोल बुडी मारली.
मिशनरच्या अनेक महाकादंबऱ्या प्रत्येकी १,००० पेक्षा अधिक पानांच्या आहेत. आपल्या माय लॉस्ट मेक्सिको पुस्तकात त्यांनी म्हणले आहे की ते अनेकदा आठवडेच्या आठवडे आपल्या टंकलेखकावर दररोज १२-१५ तास लेखन करीत असत व त्यांच्या या अफाट लेखनाचा मेळ ठेवण्यासाठी त्यांच्या व्यवस्थेला महाकठीण झाले होते.
राजकीय कारकीर्द
[संपादन]
मिशनर १९६० च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत उभे असलेल्या जॉन एफ. केनेडी यांच्या पेनसिल्व्हेनियातील बक्स काउंटीमधील प्रचारसमितीचे अध्यक्ष होते. १९६२मध्ये मिशनरने स्वतः बक्स काउंटी आणि लीहाय काउंटीमधून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहासाठीची निवडणुक लढवली परंतु यात ते हरले. ही निवडणूक लढवणे ही आपली चूक असल्याचे त्यांनी म्हणले. १९६२ च्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाकडून उभे राहणे ही माझी चूक होती. माझी बायको तरी मला सांगत होती "असे नको करू नको करू". मग मी हरलो आणि पुन्हा पुस्तके लिहायला लागलो. [२] आपल्या द वर्ल्ड इज माय होम या आत्मचरित्रात त्यांनी म्हणले आहे की या निवडणुकीत उभे राहणे हे त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट होती करण जनतेत प्रचार केल्यावर माणसाला चांगली अक्कल येते.[१२]
१९६८मध्ये मिशनर पेनसिल्व्हेनियाचे सेनेटर जोसेफ एस. क्लार्क यांच्या तिसऱ्या मुदतीसाठीच्या प्रचारसमितीचे अध्यक्ष होते. क्लार्क हे रिचर्ड श्वाइकर यांच्याविरुद्ध हरले.[१३]
मिशनर १९६७-६८मध्ये पेनसिल्व्हेनिया संविधान समितीचे चिटणीस होते.[२] त्याच वर्षी ते अमेरिकेच्या इलेक्टोरल कॉलेजचे सदस्यही होते. याद्दल त्यांनी प्रेसिडेंशियल लॉटरी: द रेकलेस गॅम्बल इन अवर इलेक्टोरल सिस्टम ही पुस्तिकाल लिहिली.
वैयक्तिक जीवन
[संपादन]मिशनरनी एकूण तीन वेळा लग्न केले. १९३५मध्ये त्यांनी पॅटी कून यांच्याशी लग्न केले. १९४८मध्ये त्यांचा घटस्फोट झाल्यावर त्याच वर्षी मिशनरनी व्हँगे नॉर्डशी लग्न केले.[१] त्यांनी १९५५मध्ये घटस्फोट घेतला व मिशनरनी मरी योरिको साबुसावा यांच्याशी लग्न केले. साबुसावा या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिक होत्या. त्यांना व त्यांच्या आई-वडिलांना अमेरिकन सैन्याने केवळ जपानी वंशाचे असल्या कारणाने जपानी अमेरिकन कारागृहांमध्ये बंदी केलेले होते. साबुसावा १९९४मध्ये मृत्यू पावल्या.[१]
दातृत्त्व
[संपादन]आयुष्याच्या उत्तरकाळात मिशनरनी आपल्या संपत्तीचा मोठा भाग दान करून टाकला. यात शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक संस्थाना दिलेले १० कोटी डॉलर होते. मिशनरनी जेथे पदवीशिक्षण घेतले ते स्वार्थमोर कॉलेज त्यांच्या दातृत्त्वाचे मोठे लाभार्थी होते.[१४] याशिवाय त्यांनी ३.७ कोटी डॉलर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास अॅट ऑस्टिनला दिले होते.[१]
१९८९मध्ये मिशनरनी आपल्या जर्नी या कादंबरीच्या कॅनडातील आवृत्तीच्या रॉयल्टीचे उत्पन्न जर्नी प्राइझ या पुरस्कारासाठी दिला. दरवर्षी १ लाख कॅनेडियन डॉलरचा हा पुरस्कार कॅनडातील सर्वोत्तम लघुकथा लिहिणाऱ्या नवोदित केनेडियन लेखकाला दिला जातो.
मिशनरनी आपली उरलेली संपत्ती आणि प्रताधिकार स्वार्थमोर कॉलेजला बहाल केले[१५] आणि आपली इतर कागदपत्रे युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्दर्न कॉलोराडोला दिली.[१]
मृत्यू
[संपादन]आयुष्याच्या शेवटी मिशनर मूत्रपिंडाच्या व्याधीने त्रस्त होते आणि त्यांना रोज रक्त शुद्धीकरण करावे लागत असे. अशी चार वर्षे काढल्यावर त्यांनी हे बंद करण्याचे ठरवले. त्यांनी म्हणले की त्यांना आयुष्यात जे काही करायचे होते ते सगळे ते करून चुकले होते आणि आता अधिक शारीरिक हाल करून घेण्याची त्यांची इच्छा नव्हती. रोजची ही शुश्रुषा बंद केल्यानंतर काही दिवसांनी १६ ऑक्टोबर, १९९७ रोजी मिशनर ऑस्टिन येथे मृत्यू पावले[१][९] त्यांनी आपल्या देहाचे अग्निदहन व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांच्या अस्थि त्यांच्या तिसऱ्या पत्नीच्या अस्थींशेजारी ऑस्टिन मेमोरियल पार्क सेमेटरी येथे ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या नावाचा स्मृतीलेख टेक्सास स्टेट सेमेटरी येथे उभारलेला आहे.[१६]
कृती
[संपादन]मिशनरच्या टेल्स ऑफ द साउथ पॅसिफिक या पहिल्याच पुस्तकाला पुलित्झर पुरस्कार मिळाला. त्यांच्या अनेक कृतींवरून चित्रपट, संगीतनाटके आणि दूरचित्रवाणि मालिका तयार झाल्या. त्यांनी अमेरिकेतील इलेक्टोरल कॉलेज पद्धतीवर टीका करणारे प्रेसिडेन्शियल लॉटरी:द रेकलेस गॅम्बल इन अवर इलेक्टोरल सिस्टम हे पुस्तक लिहिले. १९६९मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे २०१४ आणि २०१६मध्ये पुनर्प्रकाशन झाले.[१७]
कादंबऱ्या, लघुकथा आणि अकाल्पनिक कथांच्या लेखनाशिवाय मिशनर चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका तसेच रेडियो कार्यक्रमांच्या निर्मितीतही सहभागी होता.
काल्पनिक कथा
[संपादन]शीर्षक | प्रकाशन वर्ष | नोंदी |
---|---|---|
टेल्स ऑफ द साउथ पॅसिफिक | १९४७ | |
द फायर्स ऑफ स्प्रिंग | १९४९ | |
रिटर्न टू पॅरेडाइझ | १९५० | |
द ब्रिजेस ॲट टोको-री | १९५३ | |
सायोनारा | १९५४ | |
हवाई | १९५९ | |
कॅरेव्हान्स | १९६३ | |
द सोर्स | १९६५ | जेरुसलेम व मध्यपूर्व |
द ड्रिफ्टर्स | १९७१ | |
सेंटेनियल | १९७४ | कॉलोराडो |
चेझापीक | १९७८ | मेरिलँड, व्हर्जिनिया, वॉशिंग्टन डी.सी. |
द वॉटरमेन | १९७८ | |
द कव्हेनंट | १९८० | दक्षिण आफ्रिका |
स्पेस | १९८२ | |
पोलंड | १९८३ | |
टेक्सास | १९८५ | |
लेगसी | १९८७ | |
अलास्का | १९८८ | |
कॅरिबियन | १९८९ | |
जर्नी | १९८९ | |
द नॉव्हेल | १९९१ | |
साउथ पॅसिफिक | १९९२ | |
मेक्सिको | १९९२ | |
रिसेशनल | १९९४ | |
मिरॅकल इन सेव्हिया | १९९५ | |
माटेकुंबे | २००७ |
अकाल्पनिक कथा व कादंबऱ्या
[संपादन]शीर्षक | प्रकाशनवर्ष | नोंदी |
---|---|---|
द फ्युचर ऑफ द सोशल स्टडीझ ("द प्रॉब्लेस ऑफ द सोशल स्टडीझ") | १९३९ | संपादक |
द व्हॉइस ऑफ एशिया | १९५१ | |
द फ्लोटिंग वर्ल्ड | १९५४ | |
द ब्रिज ॲट अँडाऊ | १९५७ | |
रास्कल्स इन पॅरेडाइझ | १९५७ | |
जॅपनीझ प्रिंट्स: फ्रॉम द अर्ली मास्टर्स टू द मॉडर्न | १९५९ | रिचर्ड डग्लस लेनच्या टिप्पणींसह |
रिपोर्ट ऑफ द काउंटी चेरमन | १९६१ | |
द मॉडर्न जॅपनीझ प्रिंट: ॲन अप्रिशियेशन | १९६८ | |
इबेरिया | १९६८ | प्रवासवर्णन |
प्रेसिडेन्शियल लॉटरी | १९६९ | |
द क्वालिटी ऑफ लाइफ | १९७० | |
केंट स्टेट: व्हॉट हॅपन्ड अँड व्हाय | १९७१ | |
मिशनर मिसलेनी – १९५०/१९७० | १९७३ | |
फर्स्टफ्रुट्स, अ हार्वेस्ट ऑफ इझ्रायेली रायटिंग | १९७३ | |
स्पोर्ट्स इन अमेरिका | १९७६ | |
अबाउट सेंटेनियल: सम नोट्स ऑन द नोव्हेल | १९७८ | |
जेम्स मिशनर्स युएसए: द पीपल अँड द लँड | १९८१ | संपादक पीटर चैटिन; मिशनरची प्रस्तावना |
कलेक्टर्स, फोर्जर्स — अँड अ रायटर: अ मेम्वा | १९८३ | |
मिशनर ॲंथोलॉजी | १९८५ | |
सिक्स डेझ इन हवाना | १९८९ | |
पिलग्रिमेज: अ मेम्वा ऑफ पोलंड अँड रोम | १९९० | |
द ईगल अँड द रेव्हन | १९९० | |
माय लॉस्ट मेक्सिको | १९९२ | |
द वर्ल्ड इज माय होम | १९९२ | आत्मचरित्र |
क्रीचर्स ऑफ द किंग्डम | १९९३ | |
लिटररी रिफ्लेक्शन्स | १९९३ | |
विल्यम पेन | १९९३ | |
व्हेंचर्स इन एडिटिंग | १९९५ | |
धिस नोबल लँड | १९९६ | |
थ्री ग्रेट नॉव्हेलस ऑफ वर्ल्ड वॉर २ | १९९६ | |
अ सेंचुरी ऑफ सॉनेट्स | १९९७ |
रूपांतरणे
[संपादन]शीर्षक | नोंदी |
---|---|
द ब्रिजेस ॲट टोको-री | १९५३ चित्रपट |
रिटर्न टू पॅरेडाइझ | १९५३ चित्रपट |
मेन ऑफ द फायटिंग लेडी | १९५४ चित्रपट |
अंटिल दे सेल | रिटर्न टू पॅरेडाइझ मधील लघुकथेवर आधारित १९५७ चित्रपट |
सायोनारा | दहा ऑस्कार पुरस्कारांसाठी नामांकित व चार पुरस्कार जिंकलेला १९५७ चित्रपट |
साउथ पॅसिफिक | १९५८ चित्रपट |
ॲडव्हेंचर्स इन पॅरेडाइझ | १९५९-१९६२ दूरचित्रवाणी मालिका |
हवाई | १९६६ चित्रपट |
द हवाईयन्स | १९७० चित्रपट |
सेंटेनियल | १९७८ दूरचित्रवाणी मालिका |
कॅरेव्हान्स | ॲंथोनी क्विनअभिनित १९७८ चित्रपट |
स्पेस | १९८५ दूरचित्रवाणी मालिका |
जेम्स ए. मिशनर्स टेक्सास | |
साउथ पॅसिफिक | २००१ दूरचित्रवाणीवरील चित्रपट |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि यादी
[संपादन]- ^ a b c d e f g h Krebs, Albin (October 17, 1997). "James Michener, Author of Novels That Sweep Through the History of Places, Is Dead". The New York Times. November 5, 2009 रोजी पाहिले.
- ^ a b c d e f "James Michener Biography". Pennsylvania Center for the Book. Penn State University Libraries.
- ^ "Biographical Sketch, James A. Michener Papers". University of Miami Library. July 29, 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ May, Kalen (October 30, 2012). "UNC Celebrating Michener Library's First 40 Years". University of Colorado. May 10, 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 17, 2016 रोजी पाहिले.
- ^ "Michener". Michener Library. 2017-11-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-04-20 रोजी पाहिले.
- ^ "James A. Michener Biography and Interview". www.achievement.org. American Academy of Achievement.
- ^ "Michener: A Writer's Journey - PDF Free Download". July 7, 0419.
- ^ Michener, James A. (1951). Return to Paradise. Random House.
- ^ a b "Get Me Michener at Raffles". The New Paper. Singapore. September 16, 1998.
- ^ "Centennial: The Complete Miniseries". DVDTalk.com. March 1, 2017 रोजी पाहिले.
- ^ James Michener Biography. Bookrags.com. May 3, 2009 रोजी पाहिले.
- ^ Michener, James (1992). The World is My Home (First ed.). New York: Random House. p. 188. ISBN 0-679-40134-2.
- ^ Beers, Paul B. (March 31, 1976). Pennsylvania Politics Today and Yesterday: The Tolerable Accommodation. Penn State University Press. p. 198. ISBN 978-0271002385.
- ^ "James A. Michener Art Museum". michenerartmuseum.org. March 30, 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 16, 2004 रोजी पाहिले.
- ^ O'Neill, James (March 1, 1998). "Michener's gift keeps on giving". Philadelphia Inquirer.
- ^ "James Albert Michener". Texas State Cemetery. 2017-03-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 1, 2017 रोजी पाहिले.
- ^ Michener, James (1969). Presidential Lottery. Penguin Random House. March 1, 2017 रोजी पाहिले.