ग्रोव्हर क्लीव्हलँड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
स्टीफन ग्रोव्हर क्लीव्हलॅंड
ग्रोव्हर क्लीव्हलँड


सही ग्रोव्हर क्लीव्हलँडयांची सही

स्टीफन ग्रोव्हर क्लीव्हलॅंड (इंग्लिश: Stephen Grover Cleveland) (१८ मार्च, इ.स. १८३७ - २४ जून, इ.स. १९०८) हा अमेरिकेचा २२वा (इ.स. १८८५ - इ.स. १८८९) व २४वा (इ.स. १८९३ - इ.स. १८९७) राष्ट्राध्यक्ष होता. दोन वेळा, परंतु विलग कार्यकाळांसाठी अध्यक्ष बनलेला तो एकमेव अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहे. त्यामुळेच राष्ट्राध्यक्षांच्या क्रमवारीत त्याची दोनदा गणना होते. अमेरिकेच्या राजकारणावर रिपब्लिकन पक्षाची पकड असलेल्या इ.स. १८६० ते इ.स. १९१२ या प्रदीर्घ कालखंडात राष्ट्राध्यक्षपदी बसलेला तो एकमेव डेमोक्रॅट राजकारणी होता. अध्यक्ष बनण्यागोदर इ.स. १८८३ ते इ.स. १८८५ या कालखंडात तो न्यू यॉर्क संस्थानाचा गव्हर्नर होता.

बाह्य दुवे[संपादन]

  • "ग्रोव्हर क्लीव्हलँड: अ रिसोर्स गाइड (ग्रोव्हर क्लीव्हलँड: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.