माउंट रशमोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माउंट रशमोरवर अमेरिकेच्या इतिहासामधील पहिली १३० वर्षे गाजवणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचे पुतळे: (डावीकडून उजवीकडे) जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थियोडोर रूझवेल्टअब्राहम लिंकन
माउंट रशमोरचे साउथ डकोटामधील स्थान.
माउंट रशमोरचे साउथ डकोटामधील स्थान.
माउंट रशमोर
माउंट रशमोरचे साउथ डकोटामधील स्थान

माउंट रशमोर राष्ट्रीय स्मारक (इंग्लिश: Mount Rushmore National Memorial) हे अमेरिका देशाच्या साउथ डकोटा राज्यामधील एक स्मारक आहे. ह्या वास्तूमध्ये माउंट रशमोर ह्याच नावाच्या डोंगरावर शिल्पकला करून जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थियोडोर रूझवेल्टअब्राहम लिंकन ह्या चार माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे ६० फूट उंचीचे पुतळे बनवण्यात आले आहेत.

ह्या स्मारकाच्या बांधकामाची सुरुवात इ.स. १९२७ साली डॅनिश-अमेरिकन बोर्ग्लम ह्या पिता-पुत्रांनी केली. इ.स. १९३४ ते इ.स. १९३९ दरम्यान सर्व चेहरे निर्माण करण्यात आले. ह्या भागातील पर्यटनाला चालना मिळावी ह्या उद्देशाने हे स्मारक बांधण्यात आले होते.

सध्या साउथ डकोटामधील पहिल्या क्रमांकाचे पर्यटनस्थळ असलेल्या माउंट रशमोरला दरवर्षी सुमारे ३० लाख पर्यटक भेट देतात.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे विमान माउंट रशमोरवरून उडताना


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: