Jump to content

शुक्र ग्रह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शुक्र या पानावरून पुनर्निर्देशित)


शुक्र  

शुक्र
कक्षीय गुणधर्म
कक्षेचा कल: सूर्याच्या विषुववृत्ताशी
कोणाचा उपग्रह: सूर्य
उपग्रह: 0
वातावरण


सूर्यमालेमध्ये शुक्र हा सूर्यापासून बुधानंतर, आणि पृथ्वीअगोदर येणारा क्रमाने दुसरा ग्रह आहे. जरी सर्व ग्रहांच्या भ्रमणकक्षा लंबगोलाकार असल्यातरी शुक्राची भ्रमणकक्षा जवळजवळ वर्तुळाकार आहे. याचा व्यास १२,१०४ कि. मी. एवढा आहे. शुक्र देखील अंतर्वर्ती ग्रह आहे. यामुळेच शुक्रदेखील आपल्याला आकाशात फक्त सकाळी किंवा संध्याकाळीच दिसतो. या ग्रहावर वातावरण अतिशय दाट असल्यामुळे सूर्याचा शुक्रावर पडलेला प्रकाश मोठ्याप्रमाणात परावर्तित होतो. म्हणून शुक्र आपल्याला इतर ग्रहांपेक्षा अधिक तेजस्वी दिसतो.


शुक्र पृथ्वीहून जास्त सूर्याजवळ असल्यामुळे आकाशात नेहमी सूर्याच्या दिशेकडे दिसतो. त्यामुळेच तो पहाटे किंवा संध्याकाळी क्षितिजावर दिसू शकतो. जर तो जास्त प्रखर बनला तर दिवसाही दिसू शकतो. शुक्र हा सूर्य व चंद्रापाठोपाठ पृथ्वीवरून तेजस्वी दिसणाऱ्या चांदण्यांत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची तेजस्विता -४,६ आहे. तो अंत्यर्वर्ती ग्रह असल्याने तो सूर्यापासून कधीच दूर दिसत नाही. तो जास्तीत जास्त तो ४७.८ अंशापर्यंत दूर जाऊ शकतो. त्याची तेजस्विता ही सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी सर्वांत जास्त असते त्यामुळेच त्याला पहाटेचा तारा किंवा सायंतारा असेही म्हणतात.

रचना

[संपादन]

शुक्र हा ग्रह घन पृष्ठभाग असणारा ग्रह आहे. म्हणजे त्याचा पृष्ठभाग हा पृथ्वीप्रमाणे खडकाळ आहे. आकार व वस्तुमानाच्या बाबतीत तो पृथ्वीशी कमालीचा मिळताजुळता आहे इतका की कित्येकदा त्याला पृथ्वीचा जुळा ग्रह असेही म्हणतात. शुक्राचा व्यास पृथ्वीच्या व्यासापेक्षा फ़क्त ६६० कि.मी.ने कमी आहे तर त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या ८१.५% इतके आहे. मात्र त्याचे वातावरण मात्र अत्यंत दाट कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीपेक्षा अत्यंत वेगळे आहे.

परिभ्रमण व परिवलन

[संपादन]

शुक्राला स्वतःभोवती फिरण्यास २४३ दिवस लागतात. तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २२५ दिवस लागतात. त्यामुळे शुक्रावरील एक दिवस हा त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे. शुक्राचे सूर्यापासूनचे अंतर १०,८२,०८,९३० कि.मी. एवढे आहे. सूर्यमालेतील इतर सर्व ग्रह पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेकडे फिरतात. फक्त शुक्र आणि युरेेेेनस हे दोन ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. त्यामुळे शुक्रावर सूर्य पश्चिम दिशेला उगवतो व पूर्व दिशेला मावळतो. शुक्र हा देखील अंतर्वर्ती ग्रह असल्यामुळे याचेसुद्धा सूर्यावरील अधिक्रमण आपणास पहावयास मिळते. शुक्राला एकही चंद्र नाही. शुक्र सूर्यापासून १०.६ कोटी कि.मी. आहे. बाकीच्या ग्रहांची कक्षा जरी लंबवर्तुळाकार असली तरी शुक्राची कक्षा मात्र जवळपास वर्तुळाकार आहे. त्याचा पृष्ठभाग ताशी ६.५ कि.मी. वेगाने फिरतो, तर त्याचा पृथ्वीच्या विषुववृत्ताजवळचा पृष्ठभाग हा ताशी १६०० कि.मी या वेगाने फिरतो.

पहाटतारा आणि सायंतारा

[संपादन]

शुक्र एकतर पहाटे पूर्व क्षितिजावर दिसतो, किंवा संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर. मात्र, शुक्र जेव्हा सूर्यापासून ८-१० अंश अंतरावर असतो, तेव्हा तो दिसत नाही. हे ज्या दिवशी घडते त्या दिवशीच्या पंचांगात शुक्राचा अस्त झाल्याची नोंद असते. साधारणपणे २० महिन्यांच्या काळात सूर्य ९ महिने पहाटे आणि ८-९ महिने संध्याकाळी दिसतो. इतर काळात तो दिसत नाही. अस्तकाळानंतर जेव्हा शुक्र पहिल्यांदा आकाशात दिसतो तेव्हा पंचांगात शुक्राचा उदय झाल्याची नोंद असते. शुक्राच्या उदयास्ताच्या व मार्गी-वक्री असण्याच्या तारखांचे गणित अत्यंत क्लिष्ट असल्याने या तारखांमध्ये सामान्य माणसाला अनियमितता जाणवते.

ज्योतिषशास्त्रातील शुक्र

[संपादन]

भारतीय ज्योतिषानुसार शुक्र हा लाभदायक ग्रह आहे. हा वृषभ आणि तूळ राशींचा स्वामी आहे. ज्योतिषान्वये शुक्र हा रोमान्स, कामुकता, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, प्रजोत्पत्ती, स्त्रैण गुण, तसेच ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला और मूर्तिकला यांचे प्रतीक आहे. ज्याच्या कुंडलीत शुक्र प्रबळ आहे त्याच्यात हे गुणदोष असण्याची शक्यता असते.

हस्तरेखा शास्त्रानुसार तळहातावर अंगठ्याच्या शेजारी जो उंचवटा असतो तो शुक्राचा असतो. ह्याची जास्त-कमी उंची व्यक्तीमधील प्रेमभावना, आकर्षण, वासना और सौंदर्य यांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती दाखवते.

शरीरशास्त्रातील शुक्र

[संपादन]

पुरुषाच्या वृषणांमध्ये जे पुरुषबीज असते त्याला शुक्राणू म्हणतात. हे वीर्य नावाच्या द्रवपदार्थाबरोबर सातत्याने शरीराबाहेर टाकले जातात.

इ.स. २००९ सालापासूनचे शुक्राचे उदयास्त

[संपादन]

शुक्राच्या अस्तकाळाच्या तारखा खाली दिल्या आहेत. उरलेल्या तारखांना शुक्र पूर्व किंवा पश्चिम क्षितिजावर दिसायला हवा.

शुक्रास्ताच्या तारखा :- २००९ : १९ डिसेबर २००९ ते ३१ डिसेंबर २००९ (१३ दिवस)
२०१० : १ जानेवारी २०१० ते ४ फेब्रुवारी २०१० (३५ दिवस) अधिक
२०१० : २१ ऑक्टोबर २०१० ते २ नोव्हेंबर २०१० (१३ दिवस); एकूण ४८ दिवस
२०११ : २७ जुलै २०११ ते ८ सप्टेंबर २०११ (४४ दिवस)
२०१२ : २ जून २०१२ ते १० जून २०१२ (९ दिवस)
२०१३ : २४ फेब्रुवारी २०१३ ते १९ एप्रिल २०१३ (५५ दिवस
२०१४ : ८ जानेवारी ते १४ जानेवारी २०१४ अधिक
२०१४ : ३ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०१४ (एकूण ५५ दिवस)
२०१५ : ७ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०१५ (१४ दिवस)
२०१६ : ९ मे ते २८ जून २०१६ (५१ दिवस)
२०१७ : १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१७ अधिक
२०१७ : २१ मार्च ते २५ मार्च २०१७ (एकूण २१ दिवस)
२०१८ : १ जानेवारी २०१८ ते १ फेब्रुवारी २०१८ अधिक
२०१८ : १८ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०१८ (एकूण ४५ दिवस)
२०१९ : २५ जुलै ते ५ सप्टेंबर २०१९ (४३ दिवस)
२०२० : ३१ मे ते ८ जून २०१० (८ दिवस)

वक्री शुक्र

[संपादन]

चंद्र-सूर्य सोडले तर इतर सर्वच ग्रह वर्ष-दोन वर्षांतून किंवा अधिक काळातून कधीना कधी वक्री होतात. म्हणजे आधीच्या नक्षत्रातून पुढच्या नक्षत्राच्या दिशेने जाण्याऐवजी ते मागच्या नक्षत्राकडे सरकतात. राहू आणि केतू सूर्याला विरुद्ध दिशेने प्रदक्षणा घालीत असल्याने नेहमीच वक्री असतात.

२००८ सालापासून शुक्राचे वक्री होण्याचे आणि नंतर मार्गी होण्याचे दिवस

[संपादन]

२००८ : वर्षभार मार्गी.br/> २००९ : ६ मार्च, १८ एप्रिल २००९
२०१० : ८ ऑक्टोबर, १९ नोव्हेंबर २०१०
२०११ : वर्षभर मार्गी.
२०१२ : १५ मे, २७ जून २०१२
२०१३ : २२ डिसेंबर, ३१ डिसेंबर २०१३ :< br/> २०१४ : १ जानेवारी, १ फेब्रुवारी २०१४
२०१५ : २५ जुलै, ६ सप्टेंबर २०१५
२०१६ : वर्षभर मार्गी.
२०१७ : ४ मार्च, १५ एप्रिल २०१७
२०१८ : ६ ऑक्टोबर, १९ नोव्हेंबर २०१८
२०१९ : वर्षभर मार्गी.
२०२० : १३ मे, २५ जून २०२०.

(अपूर्ण)

निरीक्षण

[संपादन]

मानवनिर्मित उपग्रहांच्य़ा मदतीने केलेले संशोधन

[संपादन]

मानवी संस्कृतीमध्ये शुक्र

[संपादन]

भारतीय पुराण वाङ्मयानुसार, दैत्यांच्या गुरूचे नाव शुक्राचार्य होते. बृहस्पतीचा पुत्र-कचाने शुक्राचार्यांच्या देवयानी नावाच्या मुलीच्या मदतीने, एरवी शुक्राचार्यांनाच फक्त माहीत असलेला संजीवनी मंत्र हस्तगत केला.

भारतीय लिखित साहित्यात चंद्र आणि श्रावण यांच्या खालोखाल शुक्राच्या चांदणीचा उल्लेख असलेल्या अनेक कविता, गीते, आणि इतर ललित व वैज्ञानिक साहित्य उपलब्ध आहे. असे काही साहित्य :-

पुस्तके
  • प्रणयी शुक्र (ज्योतिषविषयक, लेखक पद्माकर जोशी)
  • रजोगुणी शुक्र भाग १, २ (ज्योतिषविषयक, लेखक द. मा. लेले )
  • शुक्रचांदणी (कथासंग्रह, माधवी देसाई)
  • शुक्रतारा (ललित, लेखिका जयश्री निंबाळकर)
  • शुक्रतारा उगवला (कवितासंग्रह, कवी महालिंग मेणकुदळे)
  • शुक्रनीती (भारतीय प्राचीन व्यवसायशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्र, लेखक अनिल सांबरे)
  • शुक्रवारची कहाणी (ललित, लेखिका प्रतिभा रानडे)
  • शुक्रावर स्वारी (बालसाहित्य, रमेश महाले)
  • सूर्यमालेतील सृष्टिचमत्कार/शुक्राचा पृथ्वीदिन, शुक्राच्या कला (मोहन आपटे)
  • सूर्यमाला बुध शुक्र शनी (खगोल शास्त्रविषयक, लेखिका चेतना जांभळे)
  • (शुक्रासह) सू्र्यमालेची काल्पनिक सफर (फक्त सी.डी., मोहन आपटे)
  • वगैरे
मराठी भावगीते

हिंदी चित्रपटगीते

[संपादन]

संदर्भ व आभार

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]