सय्यद अहमद खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सर सय्यद अहमद खान
Sir Syed1.jpg
सर सय्यद अहमद खान
जन्म ऑक्टोबर १७, १८१७
मृत्यू मार्च २७, १८९८

सर सय्यद अहमद खान (उर्दू:سید احمد خان) (ऑक्टोबर १७, १८१७ - मार्च २७, १८९८) हे १९व्या शतकातील एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होत. भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्वाचे मानले जाते. सर सय्यद यांनी मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली ज्याला त्यांच्या म्रूत्यूनंतर इ.स. १९२० मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला. सर सय्यद यांचा राष्ट्रीय सभेला विरोध होता कारण राष्ट्रीय सभा तिच्या धोरणांमध्ये जहाल आहे अशी त्यांची धारणा होती.[१][२]

सर सय्यद यांनी भारतीय मुस्लिम समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर हल्ला चढवला. त्यांचा पर्दापद्धतीला सक्त विरोध होता. त्यांनी सुफी पीर व फकिरांच्या पद्धतीला विरोध करून इस्लामच्या एकेश्वरवादाच्या शिकवणुकीवर भर दिला. आपल्या मतांच्या प्रचारासाठी त्यांनी इ.स. १८७० मध्ये तहजी़ब-उल-अखलाक या उर्दू नियतकालिकाची सुरूवात केली. इ.स. १८७७ मध्ये त्यांची Imperial[मराठी शब्द सुचवा] विधीमंडळात निवड करण्यात आली आणि इ.स. १८८८ मध्ये त्यांना सर या पदवीने सन्मानित करण्यात आले.[३]

मार्च २७, १८९८ रोजी वयाच्या ८०व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ History of Modern India (standard VIII).
  2. ^ नेहरू, जवाहरलाल. Discovery of India.
  3. ^ "Sir Syed Ahemad Khan: Ismalic Reformer in Islamic India".