रतन टाटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रतन टाटा
Ratan Tata photo.jpg
जन्म २८ डिसेंबर इ.स. १९३७
मुंबई, ब्रिटीश भारत
निवासस्थान कुलाबा, मुंबई, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
वांशिकत्व पारशी
नागरिकत्व भारतीय
प्रशिक्षणसंस्था हार्वर्ड विद्यापीठ
कारकिर्दीचा काळ इ.स. १९६२ ते इ.स. २०१२
मालक टाटा उद्योगसमूह
प्रसिद्ध कामे टाटा नॅनो
धर्म पारशी धर्म
संकेतस्थळ
http://www.tata.in/aboutus/articles/inside.aspx?artid=uBZjT+/ooH8= Ratan N Tata

रतन नवल टाटा (जन्म: २८ डिसेंबर १९३७) हे एक भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आहेत. १९९० ते २०१२ या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते आणि ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत ते समूहाचे अंतरिम अध्यक्ष होते, तसेच त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टचे नेतृत्व करत होते.[१] ते पद्मविभूषण (२००८) आणि पद्मभूषण (२०००) या भारतातील दोन सर्वोच्च नागरी पुरस्कारांचे प्राप्तकर्ते आहेत.[२]

१९३७ मध्ये जन्मलेले रतन हे टाटा कुटुंबातील वंशज आणि नवल टाटा यांचे पुत्र आहेत, ज्यांना नंतर टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पुत्र रतनजी टाटा यांनी दत्तक घेतले होते. ते कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलचे व्यवस्थापन कार्यक्रमाचे माजी विद्यार्थी आहेत जेथे त्यांनी १९७५ मध्ये शिक्षण पूर्ण केले.[३] १९६१ मध्ये ते त्यांच्या कंपनीत रुजू झाले. तेव्हा ते टाटा स्टीलच्या शॉप फ्लोअरवर काम करायचे आणि १९९१ मध्ये जेआरडी टाटा यांच्या निवृत्तीनंतर ते त्यांचे उत्तराधिकारी होते. त्यांनी टाटा टी मिळवून टेटली विकत घेतली, टाटा मोटर्स घेऊन जग्वार लँड रोव्हर विकत घेतली आणि टाटा स्टील घेऊन कोरस कंपनीचे अधिग्रहण केले. त्यांनी मोठ्या प्रमाणावर भारत-केंद्री गटातील टाटा समूहाला जागतिक व्यवसायात रूपांतरित करण्याच्या प्रयत्न केला.

बालपण[संपादन]

रतन टाटा चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले, हे खरे असले, तरीही त्यांचे बालपण मात्र अतिशय अवघड परिस्थितीमध्ये गेले. अवघ्या सहा वर्षांचे वय असताना, त्यांचे आई-वडील विभक्त झाले आणि रतन टाटा व त्यांच्या भावाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या आजीवर येऊन पडली. त्यांच्या वडिलांनी आपला राहता बंगलाही विकून टाकला.

शिक्षण[संपादन]

चॅम्पियन स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्‍ट होण्याची मनीषा बाळगून रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले. आपले टाटा हे नाव विसरून आपण आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करायचे, या ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले. कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही घेतली. याच काळात टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख जे. आर. डी. टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली.

जीवन[संपादन]

दिल्ली येथे रतन टाटा

टाटा समूहाचे संस्थापक असलेल्या जमशेदजी टाटांचा नातू अशा पद्धतीने धडपड करतो आहे हे पाहून जे. आर. डी. प्रभावित झाले. आजीची तब्येत बिघडल्यामुळे तिला भेटायला भारतात आलेल्या रतन यांना जे. आर. डी. यांनी टाटा उद्योगसमूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. इ.स. १९६२ च्या डिसेंबर महिन्यात रतन टाटा समूहात दाखल झाले; मात्र समूहाच्या परंपरेनुसार ६२ ते ७१ त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच इ.स. १९७१ मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविण्यात आली. नेल्को ही तोट्यात चालणारी कंपनी होती. रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळविले. संपूर्ण बाजारपेठेतील नेल्कोचा हिस्सा दोन टक्‍क्‍यांवरून वीस टक्के झाला; पण देशात आणीबाणी जाहीर झाली. पाठोपाठ आलेल्या मंदीमध्ये नेल्कोला आपल्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि ही कंपनी बंद पडली. रतन टाटा यांना अनुभवाला आलेले ते पहिले अपयश होते. इ.स. १९७७ मध्ये रतन टाटांवर एम्प्रेस मिल या टाटा समूहातील बंद पडावयास आलेल्या मिलची जबाबदारी सोपविण्यात आली. एम्प्रेस मिलच्या यंत्रसामग्रीमध्ये अनेक वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यात आली नव्हती. कामगारांची संख्याही मोठी आणि त्याच्या तुलनेत उत्पादन तूटपुंजे असे चित्र असलेल्या या मिलमध्ये पन्नास लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची विनंती रतन टाटा यांनी टाटा उद्योगसमूहाला केली; पण नानी पालखीवाला, अजित केरकर आणि रुसी मोदी या संचालकांनी त्याला विरोध केल्याने अखेर ही मिलही बंद करण्यात आली. रतन टाटांच्या नावावर दुसरे अपयश जमा झाले. या सर्व प्रकारामुळे रतन टाटा चांगलेच दुखावले गेले होते; पण त्याचबरोबर अनुभवाच्या शाळेमध्ये बरेच काही शिकले होते. इ.स. १९८१ मध्ये जे. आर. डी. टाटा यांनी त्यांच्याकडे टाटा इंडस्टीजची सूत्रे सोपविली. त्याच वेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योगसमूहाचे भावी प्रमुख असणार हे स्पष्ट झाले होते. इ.स. १९९१ मध्ये जे. आर. डी. यांनी स्वतःच उद्योगसमूहाची सर्व सूत्रे रतन टाटांकडे सोपवून निवृत्ती पत्करली. त्यानंतर सुरू झालेली यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत. कोरस, जग्वार, टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. या भरारीनं देशातल्या तरुणांना नवी ऊर्जा दिली.` मोठी स्वप्न पाहाणं आणि ती प्रत्यक्षात आणणं ` हा रतन टाटांचा स्वभाव. याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनोची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी सिद्ध केलं. हे यश मिळवत असतांना टाटांनी कधीच आपल्या मुल्यांशी तडजोड केली नाही. यामुळंच सचोटी, गुणवत्ता म्हणजे टाटा हे समीकरण तयार झालंय. निवृत्ती नंतर ते नव उद्योजकांना प्रोत्साहन देत आहेत. रतन टाटा यांनी आपले शिक्षण Cathedral and john cannon school(मुंबई)आणि Bishop Cotton School(शिमला) या ठिकाणी पूर्ण केले.

Jaguar आणि Land Rover सारखेच रतन टाटा यांनी बऱ्याच कंपन्या विकत घेतल्या त्यात २००० मध्ये टेंटलीला विकत घेतले आणि जगातील सर्वात मोठी टी बेग्ज बनवणारी कंपनी निर्माण केली. २००४ मध्ये साऊथ कोरिया मधील Daewoo Commercial Vehicleला रतन टाटा यांनी विकत घेतले. २००७ मध्ये टाटा ने लंडनमधील Corus Group ही स्टील कंपनी विकत घेतली. नंतर तिचे नाव Tata Steel Europe ठेवण्यात आले. [१]

रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार[संपादन]

२० वर्षांहून अधिक काळ टाटाचे अध्यक्ष राहिलेले रतन टाटा यांना भारतीय उद्योग जगात एक लिविंग लीजेंड म्हणून ओळखले जातात, चला आज त्यांचे काही अनमोल विचार जाणून घेऊया.

जर तुम्हाला लवकर पुढे जायचे असेल तर एकटे चला. परंतु जर तुम्हाला दूरवर जायचे आहे, तर सर्वांना सोबत घेऊन चला.

प्रत्येक व्यक्तीत काहीना काही गुण आणि प्रतिभा असते.त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्यातले गुण आणि प्रतिभा ओळखली पाहिजे.

मी त्या लोकांची प्रशंसा करतो जे यशस्वी झाले आहेत. परंतु ते यश खूप निर्दयतेने मिळाले असेल तर मी त्या लोकांची प्रशंसा करेन पण इज्जत करणार नाही.

महान बनणे म्हणजे लहान लहान गोष्टी करणे ज्याने देश आणखी मजबूत होईल. जसे पाण्याचं अपव्यय न करणे, वीजेची बचत करणे, अन्न तेवढेच घेणे जेवढे आवश्यकता आहे. अशी लहान पाहुलंच आपल्या देशाला महान बनवून आपण महासत्ते कडे जाऊ.

विकिक्वोट
रतन टाटा हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Dec 19, Reeba Zachariah / TNN / Updated:; 2012; Ist, 03:47. "Ratan Tata is chairman emeritus of Tata Sons - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-01-11 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  2. ^ "List of Fellows - Royal Academy of Engineering". web.archive.org. 2016-06-08. 2022-01-11 रोजी पाहिले.
  3. ^ "Leadership Team | Tata group". www.tata.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-11 रोजी पाहिले.