गुरू दत्त
Appearance
(गुरुदत्त या पानावरून पुनर्निर्देशित)
गुरू दत्त | |
---|---|
जन्म |
वसंत कुमार शिवशंकर पडुकोण जुलै ९, इ.स. १९२५ |
मृत्यू | ऑक्टोबर १०, इ.स. १९६४ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
प्रमुख चित्रपट | प्यासा, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम, मिस्टर अँड मिसेस ५५ |
पत्नी | गीता दत्त |
वसंत कुमार शिवशंकर पडुकोण तथा गुरू दत्त (जुलै ९, इ.स. १९२५ - ऑक्टोबर १०, इ.स. १९६४) हे भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता होते. गुरू दत्त यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनात अबरार अल्वी यांचा सक्रिय सहभाग होता.
दिग्दर्शित चित्रपट
[संपादन]गुरुदत्त यांनी निर्माण केलेले आणि दिग्दर्शित केलेले चित्रपट
- आरपार
- कागज के फूल
- चौदहवी का चाँद
- प्यासा
- बाजी
- साहिब बीबी और गुलाम
- सी.आय.डी.
पुस्तके
[संपादन]गुरुदत्त यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके :-
- अलौकिक प्रतिभावंत गुरुदत्त (कृपाशंकर शर्मा)
- अंजनकुमार यांचे गुरुदत्त व मीनाकुमारी यांच्यावरचं 'आमेन शायरा‘ (दीपरेखा प्रकाशन) हे पुस्तक
- गुरुदत्त (लेखक : अरुण खोपकर), (२६-७-२०१५)
- अरुण खोपकर यांचं ‘गुरुदत्त : तीन अंकी शोकान्तिका‘ (ग्रंथाली प्रकाशन, १९८५) या पुस्तकाला तर सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. (हा पुरस्कार पटकावणारे हे मराठीतले पहिलेच पुस्तक होते.)
- त्या दहा वर्षांतील गुरुदत्त (मूळ लेखक सत्या बरन, मराठी अनुवाद : मिलिंद चंपानेरकर).
- बिछड़े सभी बारी बारी (हिंदी/मराठी.... मराठी अनुवादक - चंद्रकांत भोंजाळ. मूळ बंगाली, लेखक : बिमल मित्र)
- भाऊ पाध्ये, मुजावर यांचीही गुरुदत्त यांच्यावर उत्तम पुस्तके आहेत.
- Yours Guru Dutt, Intimate letters of a great Indian film maker (इंग्रजी) (मूळ लेखक गुरुदत्त, संपादक : नसरीन मुन्नी कबीर).
लघुपट
[संपादन]- अभिनेता विक्रांत मेस्सी याने स्वतःच्या होम ग्राउंड प्रॉडक्शनतर्फे काढलेला ३५ मिमी लघुपट. यात गुरुदत्त यांची भूमिका नीरज कवी यांनी साकारली आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |