Jump to content

२०१६ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६ या पानावरून पुनर्निर्देशित)
२०१६ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा - भारत ध्वज भारत
संघ १६  (८ संघांतून)
यजमान देश भारत ध्वज भारत
विजेता संघ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज  (२ वेळा विजेते)
उपविजेता संघ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
सामने   ३५
सर्वाधिक धावा बांगलादेश तमिम इक्बाल (२९५)
सर्वाधिक बळी अफगाणिस्तान मोहम्मद नबी (१२)
मालिकावीर भारत विराट कोहली
२०१४ (आधी) (नंतर) २०२०

२०१६ सालात पार पडलेली विश्व आयसीसी टी-ट्वेंटी ही क्रिकेट स्पर्धा २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेची सहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा भारतात भरविण्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या २८ जानेवारी, २०१५ च्या दुबईतील बैठकीत ठरले. ही स्पर्धा ८ मार्च ते ३ एप्रिल २०१६ दरम्यान खेळविली गेली. सामने कोलकाता, बंगलोर, मुंबई, चेन्नई, धरमशाला, नवी दिल्ली, हैदराबाद, मोहाली, आणि नागपूर येथे खेळले गेले.

२०१४ च्या स्पर्धेप्रमाणे यावेळी सुद्धा स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे पूर्ण सभासद असलेले १० संघ आपोआपच स्पर्धेसाठी पात्र ठरले, तर इतर ६ संघ २०१५, २०-२० विश्व अजिंक्यपद पात्रता फेरी मधून निवडण्यात आले.

स्पर्धा तीन टप्प्यांत विभागली गेली होती. पहिल्या फेरीत, सर्वात खालच्या दहा संघांपैकी दोन संघ, अग्रस्थानी असलेल्या पहिल्या आठ संघांबरोबर सुपर १० फेरी साठी निवडण्यात आले. सर्वात शेवटी दुसऱ्या फेरीच्या दोन गटांमधून प्रत्येकी दोन असे चार संघ बाद फेरीमध्ये . इडन गार्डन्स, कोलकाता येथे खेळविल्या गेलेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजने इंग्लंडचा चार गडी राखून पराभव करून २०१२ नंतर दुसऱ्यांदा स्पर्धा जिंकली.

भारतीय फलंदाज विराट कोहलीला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. स्पर्धेत सर्वाधिक धावा बांगलादेशच्या तमिम इक्बालने केल्या तर सर्वाधिक गडी अफगाणिस्तानचा मोहम्मद नबीने केले.

मैदाने[संपादन]

२१ जुलै २०१५, रोजी भारतीय क्रिकेट बोर्डाने २०१६ आयसीसी विश्व टी-ट्वेंटी स्पर्धेसाठी यजमान शहरांची घोषणा केली. बंगळूर, चेन्नई, धरमशाला, मोहाली, मुंबई, नागपुर आणि नवी दिल्ली या शहरांव्यतिरिक्त अंतिम सामन्यांचे यजमानपद कोलकाता या शहराला दिले गेले.

एम्. ए. चिदंबरम मैदानाच्या तिसऱ्या स्टँडच्या बांधकामाबाबत काही कायदेशीर समस्या असल्याने चेन्नई शहरामध्ये एकाही सामन्याचे आयोजन होऊ शकले नाही. गट अचे सर्व सामने धरमशाला येथील एच.पी.सी.ए. मैदानावर आणि गट बचे सर्व सामने नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर खेळविण्यात आले. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा गट २चा सामना एच.पी.सी.ए. मैदानवर नियोजित होता. परंतु एच.पी.सी.ए. कडून पाकिस्तानी क्रिकेट संघाला सुरक्षा देण्याबाबत असमर्थता दर्शवण्यात आल्यामुळे सदर सामना इडन गार्डन, कोलकाता येथे खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला.[१]

दक्षिण दिल्ली महानगर पालिकेकडून मैदानामधील मेहरा ब्लॉकला पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळाले नव्हते त्यामुळे सुरुवातीला फिरोजशाह कोटला मैदानावर होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्याबाबत अनिश्चितता होती. प्रमाणपत्र न मिळाल्यास आयसीसी आणि बीसीसीआय सदर सामना दुसऱ्या मैदानावर घेण्याच्या तयारीत होते. परंतू, २३ मार्च रोजी, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेला (डीडीसीए) दक्षिण दिल्ली महानगर पालिकेकडून सदर ब्लॉक वापरण्याची परवानगी मिळाली.[२]

२०१६ आयसीसी विश्व टी-ट्वेंटी स्पर्धेची मैदाने.
स्थळ शहर क्षमता सामने
ईडन गार्डन्स कोलकाता ६६,३४९ ४ (अंतिम)
एम. चिन्नास्वामी मैदान बंगळूर ४०,०००
वानखेडे मैदान मुंबई ३२,००० ४(उपांत्य)
एच.पी.सी.ए. मैदान धरमशाला २३,००० ८ (गट फेरी)
फिरोजशाह कोटला मैदान दिल्ली ४०,७१५ ४ (उपांत्य)
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान मोहाली २६,९५०
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान नागपूर ४५,००० ९ (गट फेरी)

पात्र संघ[संपादन]

स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा १६ देशांचे संघ सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे पूर्ण सभासद असलेले १० संघ आपोआपच स्पर्धेसाठी पात्र ठरले, तर इतर ६ संघ ६ ते २६ जुलै २०१५ दरम्यान आयर्लंड व स्कॉटलंड दरम्यान खेळविल्या गेलेल्या २०१५, २०-२० विश्व अजिंक्यपद पात्रता फेरी मधून निवडण्यात आले.

२० एप्रिल २०१४ च्या आय.सी.सी. आंतरराष्ट्रीय टी२० चॅम्पियनशिप क्रमवारीनुसार पूर्ण सभासद असलेले अव्वल ८ संघ आपोआप सुपर १० मध्ये तर इतर ८ संघ गट फेरी मध्ये समाविष्ट करण्यात आले. गट फेरीमधील विजेते अफगाणिस्तान व बांगलादेश यांनी सुपर १० मध्ये प्रवेश केला.

ऑक्टोबर २०१५ मध्ये पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शाहर्यार खान यांनी भारत-पाकिस्तान दरम्यानची मालिका न खेळविली गेल्यास पाकिस्तानी संघ २०१६ विश्व टी-ट्वेंटी मध्ये खेळणार नाही असे जाहीर केले. मालिका शेवटी रद्द करण्यात आली तरीही, फेब्रुवारी २०१६ मध्ये पाकिस्तान सरकारने संघाला भारत दौरा करण्यासाठी मंजूरी दिली [३]. मार्च २०१६ च्या सुरुवातीला पाकिस्तानने स्पर्धआधी सुरक्षा व्यवस्थेचे मुल्यांकन करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठविले. ह्या भेटीनंतर पीसीबीच्या विनंतीवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना धरमशाला पासून कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे हलविण्यात आला, आणि ११ मार्च रोजी पाकिस्तानने स्पर्धेत सहभाग निश्चित केला[४].

पात्रता निकष देश
यजमान भारतचा ध्वज भारत
पूर्ण सदस्य ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
पात्रता स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
Flag of the Netherlands नेदरलँड्स
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
ओमानचा ध्वज ओमान

सामना अधिकारी[संपादन]

संपूर्ण स्पर्धेमध्ये सामना अधिकारी म्हणून आय.सी.सी. रेफ्रींचे एलिट पॅनेलमधील ७ अधिकाऱ्यांनी काम पाहीले.

तसेच आय.सी.सी. पंचांच्या एलिट पॅनेलमधील १२, आंतरराष्ट्रीय पंच आणि रेफ्रींच्या पॅनेल मधील १० व आय.सी.सी. असोसिएट आणि संलग्न पॅनेलमधील २ सदस्य मैदानावर पंच म्हणून कामगिरी पार पाडली.

बक्षिसाची रक्कम[संपादन]

२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेमध्ये एकूण २० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स बक्षीस म्हणून देण्यात आले. ही रक्कम २०१४ च्या रकमेपेक्षा ३३% जास्त होती.[५] संघांच्या कामगिरीनुसार सदर रक्कम खालीलप्रमाणे वाटण्यात आली:[६]

टप्पा बक्षिसाची रक्कम (US$)
विजेते $३.५ दशलक्ष
उपविजेते $१.५ दशलक्ष
उपांत्य सामन्यातील पराभूत संघ $७५०,००० प्रत्येकी
“सुपर १० फेरी” मधील प्रत्येक सामन्यातील विजेत्यास बोनस $५०,०००
सर्व १६ संघांना सहभागाबद्दल $३००,०००
एकूण $१०,००,०००

सराव सामने[संपादन]

वेळापत्रक[संपादन]

खाली सुचीबद्ध केलेल्या सर्व वेळा ह्या भारतीय प्रमाणवेळ (यूटीसी+०५:३०) आहेत.

पहिली/गट फेरी[संपादन]

गट अ[संपादन]

संघ सा वि नेरर गुण
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश +१.९३८
Flag of the Netherlands नेदरलँड्स +०.१५४
ओमानचा ध्वज ओमान -१.५२१
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड -०.६८५
९ मार्च
१५:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१५३/७ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१४५/७(२० षटके)
पीटर बोरेन २९ (२८)
अल-अमीन होसेन २/२४ (३ षटके)
बांगलादेश ८ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: एस्. रवी (भा) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: तमीम इक्बाल, बांगलादेश
 • नाणेफेक : नेदरलँड्स, गोलंदाजी

९ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१५४/५ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१५७/८ (१९.४ षटके)
गॅरी विल्सन ३८ (३४)
मुनीस अन्सारी ३/३७ (४ षटके)
झीशान मकसूद ३८ (३३)
अँडी मॅकब्राइन २/१५ (३ षटके)
ओमान २ गडी व २ चेंडू राखून विजयी
एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाला
पंच: ख्रिस गाफने (न्यू) व नायजेल लाँग (इं)
सामनावीर: अमीर अली, ओमान
 • नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी

११ मार्च
१५:०० (दि/रा)
धावफलक
वि
 • नाणेफेक : ओमान, गोलंदाजी
 • पावसामुळे सामना रद्द
 • या सामन्याच्या निकालामुळे नेदरलँड्स स्पर्धेतून बाद

११ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
९४/२ (८ षटके)
वि
तमीम इक्बाल ४७ (२६)
जॉर्ज डॉकरेल १/१८ (२ षटके)
 • नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी
 • पावसामुळे सामना प्रत्येकी १२ षटकांचा करण्यात आला.
 • बांगलादेशच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना थांबवण्यात आला.
 • या सामन्याच्या निकालामुळे आयर्लंड स्पर्धेतून बाद

१३ मार्च
१५:०० (दि/रा)
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
५९/५ (६ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
४७/७ (६ षटके)
नेदरलँड्स १२ धावांनी विजयी
एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाला
पंच: नायजेल लाँग (इं) व एस्. रवी (भा)
सामनावीर: पॉल व्हान मीकेरेन, नेदरलँड्स
 • नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी
 • पावसामुळे प्रत्येकी ६ षटकांचा सामना खेळविण्यात आला.

१३ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१८०/२ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
६५/९ (१२ षटके)
तमीम इक्बाल १०३* (६३)
खावर अली १/२४ (३ षटके)
जतिंदर सिंग २५ (२०)
शकिब अल हसन ४/१५ (३ षटके)
बांगलादेश ५४ धावांनी विजयी (ड/ल पद्धती)
एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाला
पंच: ख्रिस गाफने (न्यू) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: तमीम इक्बाल, बांगलादेश
 • नाणेफेक : ओमान, गोलंदाजी
 • पावसामुळे ओमान पुढे १२ षटकांमध्ये १२० धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले
 • बांगलादेश तर्फे आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १००० धावा पूर्ण करणारा तमीम इक्बाल हा पहिलाच फलंदाज
 • या सामन्याच्या निकालामुळे ओमान स्पर्धेतून बाद तर बांगलादेश सुपर १० च्या गट २ मध्ये सामील


गट ब[संपादन]

संघ सा वि नेरर गुण
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान +१.५४०
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे -०.५६७
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड -०.१३२
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग -१.०१७
८ मार्च
१५:०० (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१५८/८ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१४४/६ (२० षटके)
वुसी सिबंदा ५९ (४६)
तन्वीर अफजल २/१९ (४ षटके)
झिंबाब्वे १४ धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: अलिम दर (पा) व इयान गोल्ड (इं)
सामनावीर: वुसी सिबंदा, झिम्बाब्वे
 • नाणेफेक : हाँग काँग, गोलंदाजी
 • रायन कॅम्पबेलचे हाँग काँग कडून आंतरराष्ट्रीय टी २० पदार्पण.

८ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१७०/५ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१५६/५ (२० षटके)
जॉर्ज मन्सी ४१ (२९)
रशीद खान २/२८ (४ षटके)
अफगाणिस्तान १४ धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: मराइस इरास्मुस (द) व रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: मोहम्मद शहझाद, अफगाणिस्तान
 • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी

१० मार्च
१५:०० (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१४७/७ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१३६ (१९.४ षटके)
शॉन विल्यम्स ५३ (३६)
मार्क वॅट २/२१ (४ षटके)
झिंबाब्वे ११ धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: अलिम दर (पा) व मराइस इरास्मुस (द)
सामनावीर: वेलिंग्टन मसाकाद्झा, झिंबाब्वे
 • नाणेफेक : झिंबाब्वे, फलंदाजी
 • ह्या सामन्याच्या निकालामुळे स्कॉटलंड स्पर्धेतून बाद

१० मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
११६/६(२० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
११९/४ (१८ षटके)
अंशुमन रथ २८ (३१)
मोहम्मद नबी ४/२० (४ षटके)
अफगाणिस्तान ६ गडी व १२ चेंडू राखून विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: इयान गोल्ड (इं) व रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: मोहम्मद नबी, अफगाणिस्तान
 • नाणेफेक : हाँग काँग, फलंदाजी
 • ह्या सामन्याच्या निकालामुळे हाँग काँग स्पर्धेतून बाद

१२ मार्च
१५:०० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१८६/६ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१२७ (१९.४ षटके)
अफगाणिस्तान ५९ धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: अलिम दर (पा) व रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: मोहम्मद नबी, अफगाणिस्तान
 • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
 • ह्या सामन्याच्या निकालामुळे झिंबाब्वे स्पर्धेतून बाद तर अफगाणिस्तान सुपर १० च्या अ गटात सामील
 • अफगाणिस्तानचा संघ प्रथमच विश्व टी२० स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीसाठी पात्र

१२ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१२७/७ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
७८/२ (८ षटके)
मार्क चॅपमॅन ४० (४१)
मॅट मचान २/२६ (४ षटके)
मॅथ्यू क्रॉस २२ (१४)
अझीझ खान १/११ (१ षटक)
स्कॉटलंड ८ गडी राखून विजयी (ड/ल पद्धती)
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: मराइस इरास्मुस (द) व इयान गोल्ड (इं)
सामनावीर: मॅट मचान, स्कॉटलंड
 • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
 • स्कॉटलंडच्या डावा दरम्यान आलेल्या पावसामुळे त्यांच्यासमोर १० षटकांत ७६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
 • आय.सी.सी. स्पर्धेतील स्कॉटलंडचा हा पहिलाच विजय

दुसरी/ सुपर १० फेरी[संपादन]

गट १[संपादन]

संघ सा वि नेरर गुण
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज +०.३५९
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड +०.१४५
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका +०.६५१
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका -०.४६१
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान -०.७१५
१६ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१८२/६ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१८३/४ (२० षटके)
ज्यो रूट ४८ (३६)
आंद्रे रसेल २/३६ (४ षटके)
ख्रिस गेल १००* (४८)
अदिल रशीद १/२० (२ षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी व ११ चेंडू राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: ख्रिस गाफने (न्यू) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: ख्रिस गेल, वेस्ट इंडीज
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
 • ख्रिस गेलचे विश्व टी-ट्वेंटी मध्ये सर्वात वेगवान शतक
 • विश्व टी-ट्वेंटी स्पर्धेत दोन शतके करणारा ख्रिस गेल हा पहिलाच फलंदाज
 • ख्रिस गेलचे नवीन विक्रम - आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक षट्कार - ९८ व विश्व टी-ट्वेंटी मध्ये सर्वाधिक षट्कार - ६०

१७ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१५३/७ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१५५/४ (१८.५ षटके)
श्रीलंका ६ गडी व ७ चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) व जोएल विल्सन (वे)
सामनावीर: तिलकरत्ने दिलशान, श्रीलंका
 • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी

१८ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२२९/४ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२३०/८ (१९.४ षटके)
हाशिम अमला ५८ (३१)
मोईन अली २/३४ (४ षटके)
ज्यो रूट ८३ (४४)
काइल ॲबॉट ३/४१ (४ षटके)
इंग्लंड २ गडी व २ चेंडू राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: एस्. रवी (भा) व पॉल राफेल (ऑ)
सामनावीर: ज्यो रूट, इंग्लंड
 • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
 • विश्व टी-ट्वेंटी मधील सर्वात मोठा तर आंतरराष्ट्रीय टी२० मधील दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग.
 • इंग्लंडच्या पहिला १७ चेंडूंतील ५० धावा ह्या आंतरराष्ट्रीय टी२० मधील दुसऱ्या क्रमांकाच्या वेगवान धावा.
 • क्विंटन डि कॉकचे २१ चेंडूतील अर्धशतक हे दक्षिण आफ्रिकेकडून सर्वात वेगवान अर्धशतकाशी बरोबरी करणारे ठरले.

२० मार्च
१५:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२०९/५ (२० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१७२ (२० षटके)
मोहम्मद शाहजाद ४४ (१९)
ख्रिस मॉरिस ४/२७ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ३७ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: ख्रिस गाफने (न्यू) व पॉल राफेल (ऑ)
सामनावीर: ख्रिस मॉरिस, दक्षिण आफ्रिका
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
 • एका शतकात दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक २९ धावा काढणारा एबी डि व्हिलियर्स हा दुसरा फलंदाज.

२० मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१२२/९ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२७/३ (१८.२ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडू व १० चेंडू राखून विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: रिचर्ड केटेलबोरो (इं) व ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: आंद्रे फ्लेचर, वेस्ट इंडीज
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी

२३ मार्च
१५:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१४२/७ (२० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१२७/९ (२० षटके)
मोईन अली ४१* (३३)
मोहम्मद नबी २/१७ (४ षटके)
रशीद खान २/१७ (४ षटके)
शफीकुल्लाह शफीक ३५ (२०)
आदिल रशीद २/१८ (३ षटके)
इंग्लंड १५ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: एस्. रवी (भा) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: मोईन अली, इंग्लंड
 • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
 • या सामन्याच्या निकालामुळे अफगाणिस्तान स्पर्धेतून बाद
 • ह्या मैदानावर खेळविला गेलेला हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना

२५ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१२२/८ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२३/७ (१९.४ षटके)
क्विंटन डी कॉक ४७ (४६)
ख्रिस गेल २/१७ (३ षटके)
वेस्ट इंडीज ३ गडी व २ चेंडू राखून विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: इयान गोल्ड (इं) व रिचर्ड केटेलबोरो (इं)
सामनावीर: मार्लोन सॅम्युएल्स, वेस्ट इंडीज
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
 • या सामन्याच्या निकालामुळे वेस्ट इंडीज उपांत्य फेरीत दाखल
 • वेस्ट इंडीज तर्फे १००० धावा पूर्ण करणारा मार्लोन सॅम्युएल्स हा दुसरा तर ड्वेन ब्राव्हो हा तिसरा फलंदाज.

२६ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१७१/४ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१६१/८ (२० षटके)
जॉस बटलर ६८* (३९)
जेफ्री वान्डर्से २/२६ (४ षटके)
इंग्लंड १० धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: पॉल राफेल (ऑ) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: जॉस बटलर, इंग्लंड
 • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
 • या सामन्याच्या निकालामुळे इंग्लंड उपांत्य फेरीत दाखल, तर श्रीलंका व दक्षिण आफ्रिका स्पर्धेतून बाहेर

२७ मार्च
१५:०० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१२३/७ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
११७/८ (२० षटके)
ड्वेन ब्राव्हो २८ (२९)
रशीद खान २/२६ (४ षटके)
मोहम्मद नबी २/२६ (४ षटके)
अफगाणिस्तान ६ धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: अलिम दार (पा) व ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: नजिबुल्लाह झादरान, अफगाणिस्तान
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
 • इव्हीन लुईसचे वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण
 • अफगाणिस्तानने यशस्वीरित्या टी-२० विश्वचषक सामन्यात दुसऱ्या सर्वात कमी धावसंख्याचे रक्षण केले.

२८ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१२० (१९.३ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१२२/२ (१७.४ षटके)
तिलकरत्ने दिलशान ३६ (४०)
केल अबॉट २/१४ (३.३ षटके)
हाशिम आमला ५६* (५२)
सुरंगा लकमल १/२८ (३.४ षटके)
दक्षिण आफ्रिका ८ गडी व १४ चेंडू राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: एस्. रवी (भा) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: ॲरन फंगिसो, दक्षिण आफ्रिका
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
 • तिलकरत्ने दिलशान हा सर्वात जास्त विश्व ट्वेंटी२० सामने खेळणारा क्रिकेट खेळाडू ठरला (३५ सामने).
 • हाशिम आमला हा दक्षिण आफ्रिकेतर्फे १००० धावा पूर्ण करणारा चवथा फलंदाज.

गट २[संपादन]

संघ सा वि नेरर गुण
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड +१.९००
भारतचा ध्वज भारत -०.३०५
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया +०.२३३
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान -०.०९३
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश -१.८०५
१५ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१२६/७ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
७९ (१८.१ षटके)
न्यू झीलंड ४७ धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: कुमार धर्मसेना (श्री) व रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: मिचेल सँटनर, न्यू झीलंड
 • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
 • न्यू झीलंड तर्फे मिचेल सँटनरने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये फिरकी गोलंदाजांमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविली

१६ मार्च
१५:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२०१/५ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४६/६ (२० षटके)
मोहम्मद हफिझ ६४ (४२)
तास्किन अहमद २/३२ (४ षटके)
शकिब अल हसन ५०* (४०)
शहिद आफ्रिदी २/२७ (४ षटके)
पाकिस्तान ५५ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: इयान गोल्ड (इं) व रिचर्ड केटेलबोरो (इं)
सामनावीर: शहिद आफ्रिदी, पाकिस्तान
 • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
 • आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १००० धावांचा टप्पा पूर्ण करणारा शकिब अल हसन हा बांगलादेशचा दुसरा फलंदाज [७]
 • आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १००० धावा व ५० बळी घेणारा शकिब अल हसन हा दुसरा अष्टपैलू खेळाडू ठरला

१८ मार्च
१५:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१४२/८ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३४/९ (२० षटके)
मार्टिन गुप्टिल ३९ (२७)
जेम्स फॉकनर २/१८ (३ षटके)
ग्लेन मॅक्सवेल २/१८ (३ षटके)
न्यू झीलंड ८ धावांनी विजयी
एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाला
पंच: मराईस इरास्मुस (द) व नायजेल लाँग (इं)
सामनावीर: मिशेल मॅक्लेनाघन, न्यू झीलंड
 • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी

१९ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
११८/५ (१८ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
११९/४ (१५.५ षटके)
शोएब मलिक २६ (१६)
सुरेश रैना १/४ (१ षटक)
विराट कोहली ५५* (३७)
मोहम्मद सामी २/१७ (२ षटके)
भारत ६ गडी व १३ चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: कुमार धर्मसेना (श्री) व मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: विराट कोहली, भारत
 • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
 • ओल्या मैदानामुळे सामना उशिरा सुरू झाला व प्रत्येकी १८ षटकांचा खेळविण्यात आला.
 • आय.सी.सी. एकदिवसीय व टी-ट्वेंटी विश्व चषक स्पर्धेतील मिळून हा भारताचा पाकिस्तानवर ११वा विजय[८].
 • आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पाकिस्तानकडून १०० धावा पूर्ण करणारा अहमद शाहजाद हा ५वा फलंदाज.

२१ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१५६/५ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५७/७ (१८.३ षटके)
महमुदुल्ला ४९* (२९)
ॲडम झाम्पा ३/२३ (४ षटके)
उस्मान ख्वाजा ५८ (४५)
शकिब अल हसन ३/२७ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ३ गडी व ९ चेंडू राखून विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: अलिम दार (पा) व इयान गोल्ड (इं)
सामनावीर: ॲडम झाम्पा, ऑस्ट्रेलिया
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
 • साकलेन साजीबचे बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण
 • टी२० क्रिकेट मध्ये ६००० धावा पूर्ण करणारा डेव्हिड वॉर्नर (ऑ) हा ४था फलंदाज

२२ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१८०/५ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१५८/८ (२० षटके)
शारजील खान ४७ (२५)
ॲडम मिल्न २/२६ (४ षटके)
न्यू झीलंड २२ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) व नायजेल लाँग (इं)
सामनावीर: मार्टिन गुप्टिल न्यू झीलंड
 • नाणेफेक : न्यू झीलँड, फलंदाजी
 • ह्या सामन्याच्या निकालामुळे न्यू झीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र.[९]
 • शहीद आफ्रिदी (पाकिस्तान) ट्वेंटी -२० विश्वचषक सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी (३९) घेणारा गोलंदाज झाला.[१०]

२३ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१४६/७ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४५/९ (२० षटके)
 • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी
 • ह्या सामन्याच्या निकालामुळे बांगलादेश स्पर्धेतून बाद.
 • २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील हा चवथा १ धावेने मिळविलेला विजय.
 • पाठलाग करणाऱ्या संघाचे डावातील शेवटच्या तीन चेंडूंवर तीन गडी बाद होण्याची आंतरराष्ट्रीय टी२० मधील ही पहिलीच वेळ.
 • आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १००० धावांचा टप्पा पार करणारा महेंद्रसिंग धोणी हा भारताचा पाचवा फलंदाज.

२५ मार्च
१५:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९३/४ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१७२/८ (२० षटके)
स्टीव्हन स्मिथ ६१ (४३)
इमाद वसिम २/३१ (४ षटके)
खालिद लतिफ ४६ (४१)
जेम्स फॉकनर ५/२७ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया २१ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ
पंच: कुमार धर्मसेना (श्री) व मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: जेम्स फॉकनर, ऑस्ट्रेलिया
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
 • ह्या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान स्पर्धेतून बाद.
 • ऑस्ट्रेलियातर्फे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये एका सामन्यात ५ गडी बाद करणारा जेम्स फॉकनर हा पहिलाच गोलंदाज

२६ मार्च
१५:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१४५/८ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
७० (१५.४ षटके)
शुवागता होम १६* (१७)
ग्रँट इलियॉट ३/१२ (४ षटके)
न्यू झीलंड ७५ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: जॉन क्लोएट (द) व मायकेल गॉफ (इं)
सामनावीर: केन विल्यमसन, न्यू झीलंड
 • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
 • हेन्री निकोल्सचे न्यू झीलंड कडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
 • बांगलादेशतर्फे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये एका सामन्यात ५ गडी बाद करणारा मुस्तफिजूर रहमान हा दुसरा गोलंदाज.
 • बांगलादेशची आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या (७०).
 • या सामन्यात एकूण १० फलंदाज यष्टीचीत झाले, आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक.

२७ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१६०/६ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६१/४ (१९.१ षटके)
ॲरन फिंच ४३ (३४)
हार्दीक पंड्या २/३६ (४ षटके)
विराट कोहली ८२* (५१)
शेन वॉटसन २/२३ (४ षटके)
भारत ६ गडी व ५ चेंडू राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ
पंच: कुमार धर्मसेना (श्री) व मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: विराट कोहली, भारत
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
 • ह्या सामन्याच्या निकालामुळे भारत उपांत्य फेरीसाठी पात्र आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद.
 • शेन वॉटसनचा (ऑ) शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना.[११]
 • रविचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ५० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज.[१२]
 • आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये विराट कोहली सर्वात जलद १५०० धावा (३९ डावांत).[१३]
 • विराट कोहलीच्या एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त धावा (५३६) आणि एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त सामनावीराचे पुरस्कार मिळवणारा क्रिकेट खेळाडू (६).[१४][१५]
 • महेंद्रसिंग धोणी सर्वात जास्त (३२) बळी घेणारा यष्टिरक्षक.[१६]


बाद फेरी[संपादन]

  उपांत्य अंतिम सामना
                 
②१  न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १५३/८ (२० षटके)  
①२  इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १५७/३ (१७.१ षटके)  
     इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १५५/९ (२० षटके)
   वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १६१/६ (१९.४ षटके)
①१  वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १९६/३ (१९.४ षटके)
②२  भारतचा ध्वज भारत १९२/२ (२० षटके)  

उपांत्य सामने[संपादन]

३० मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१५३/८ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५९/३ (१७.१ षटके)
कॉलिन मन्रो ४६ (३२)
बेन स्टोक्स ३/२६ (४ षटके)
जेसन रॉय ७८ (४४)
इश सोधी २/४२ (४ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: कुमार धर्मसेना (श्री) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: जेसन रॉय, इंग्लंड
 • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
 • जेसन रॉय विश्व ट्वेंटी२० सामन्यात इंग्लंड तर्फे दुसऱ्या सर्वात जलद ५० धावा करणारा फलंदाज (२६ चेंडू).[१७]
 • आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये भागीदारीत १००० धावा पूर्ण करणारी मार्टीन गुप्टील आणि केन विल्यमसन (न्यू झीलंड) ही दुसरी जोडी

३१ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१९२/२ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९६/३ (१९.४ षटके)
विराट कोहली ८९* (४७)
सॅम्यूएल बद्री १/२६ (४ षटके)
लेंडल सिमन्स ८२* (५१)
विराट कोहली १/१५ (१.४ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी आणि २ चेंडू राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: इयान गोल्ड (इं) व रिचर्ड केटेलबोरो (इं)
सामनावीर: लेंडल सिमन्स, वेस्ट इंडीज
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
 • विश्व ट्वेंटी २० मालिकेतील हा वेस्ट इंडीजचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग [१८]

अंतिम सामना[संपादन]

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र झाले (अनुक्रमे २०१० आणि २०१२ साठी). वेस्ट इंडीजचा कर्णधार डॅरेन सामी ने नाणेफेक जिंकून, मालिकेतील आधीच्या प्रत्येक सामन्या घेतल्याप्रमाणे पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने निर्धारित २० षटकांमध्ये ९ गड्यांच्या मोबदल्यात १५५ धावा केल्या. ज्यो रूट ३६ चेंडूत ५४ धावा करून सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू होता. वेस्ट इंडीज तर्फे कार्लोस ब्रेथवेटने २३ धावा देऊन ३ गडी बाद केले, तर सॅम्युएल बद्रीने एक षटक निर्धाव टाकत १६ धावा देऊन २ गडी बाद केले. वेस्ट इंडीजने १५६ धावांचे आव्हान ६ गड्यांच्या मोबदल्यात २ चेंडू राखून पूर्ण केले. बेन स्टोक्सने टाकलेल्या शेवटच्या षटकात वेस्ट इंडीजला विजयासाठी १९ धावांची गरज होती. कार्लोस ब्रेथवेटने लागोपाठ चार षटकार खेचून हे आव्हान पार केले. मार्लोन सॅम्यूएल्सने ६६ चेंडूंत ८५* धावा केल्या. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.[१९] सामन्याला ६६,००० प्रेक्षकांनी हजेरी लावली.[२०]

३ एप्रिल
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१५५/९ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६१/६ (१९.४ षटके)
ज्यो रूट ५४ (३६)
कार्लोस ब्रेथवेट ३/२३ (४ षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: कुमार धर्मसेना (श्री) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: मार्लोन सॅम्युएल्स, वेस्ट इंडीज
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी


सांख्यिकी[संपादन]

सर्वाधिक धावा[संपादन]

फलंदाज सामने डाव धावा सरासरी स्ट्राइक रेट सर्वोच्च १०० ५० चौकार षट्कार
बांगलादेश तमिम इक्बाल २९५ ७३.७५ १४२.५१ १०३* २४ १४
भारत विराट कोहली २७३ १३६.५० १४६.७७ ८९* २९
इंग्लंड ज्यो रूट २४९ ४९.८० १४६.४७ ८३ २४
अफगाणिस्तान मोहम्मद शहझाद २२२ ३१.७१ १४०.५० ६१ २३ १२
इंग्लंड जोस बटलर १९१ ४७.७५ १५९.१६ ६६* १३ १२
स्रोत: ESPN Cricinfo[२१]

सर्वाधिक बळी[संपादन]

खेळाडू सामने डाव बळी षटके इको सरासरी सर्वोच्च स्ट्राइक रेट ४ विकेट ५ विकेट
अफगाणिस्तान मोहम्मद नबी १२ २७ ६.०७ १३.६६ ४/२० १३.४
अफगाणिस्तान रशीद खान ११ २८ ६.५३ १६.६३ ३/११ १५.२
न्यूझीलंड मिशेल संटनेर १० १८.१ ६.२७ ११.४० ४/११ १०.९
न्यूझीलंड इश सोधी १० १९.४ ६.१० १२.०० ३/१८ ११.८
इंग्लंड डेव्हिड विली १० २१ ७.५७ १५.९० ३/२० १२.६
स्रोत: ESPN Cricinfo[२२]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "पाकिस्तानचा संघ भारतात येणार, सरकारची मंजूरी". 2016-03-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-03-23 रोजी पाहिले.
 2. ^ "उपांत्य लढत दिल्लीतच". 2016-07-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-03-24 रोजी पाहिले.
 3. ^ "पाकिस्तानचा मार्ग मोकळा". 2016-03-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-03-23 रोजी पाहिले.
 4. ^ पाकिस्तानचा संघ भारतात येणार, सरकारची मंजूरी[permanent dead link]
 5. ^ विश्व ट्वेंटी२० मध्ये महिलांपेक्षा विजेत्या पुरूष संघाला १६ पट जास्त बक्षीसाची रक्कम (इंग्रजी मजकूर)
 6. ^ "२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० बक्षीसाची रक्कम (इंग्रजी मजकूर)". 2018-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-04-12 रोजी पाहिले.
 7. ^ बूम, बूम आफ्रिदीपुढे बांगलादेश ढेर
 8. ^ टीम इंडिया की जय! पाकवर ६ विकेट्सनी मात
 9. ^ न्यू झीलॅंड उपांत्य फेरीत
 10. ^ न्यू झीलॅंड वि पाकिस्तान सामन्या नंतरची आकडेवारी हायलाइट्स
 11. ^ वॉटसनचा टी२० क्रिकेटमधून सन्यास
 12. ^ आयसीसी विश्व ट्वेंटी२०: रविचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ५० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज
 13. ^ कोहलीची जादुगिरी आणि ऑस्ट्रेलिया आणि फॉकनरसाठी भूताटकी (इंग्रजी मजकूर)
 14. ^ आयसीसी विश्व ट्वेंटी२०: या कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सामनावीराचे पुरस्कार मिळवणारा क्रिकेट खेळाडू (इंग्रजी मजकूर)
 15. ^ नोंदी / आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० / फलंदाजीतील विक्रम / एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा
 16. ^ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० / नोंदी / सर्वाधिक बळी
 17. ^ चार षटकांचा फरक आणि रॉयचा विक्रम
 18. ^ रन्स इन बाउंड्रीज - १४६ वि. ९२ (इंग्रजी मजकूर)
 19. ^ ब्रेथवेटच्या ६, ६, ६, ६ मुळे वेस्ट इंडीजने विजेतेपद जिंकले. (इंग्रजी मजकूर
 20. ^ चित्रफीत: विश्व ट्वेंटी२० अंतिम सामना क्षणचित्रे
 21. ^ फलंदाजीची आकडेवारी www.espncricinfo.com वर
 22. ^ गोलंदाजीची आकडेवारी www.espncricinfo.com वर