२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० अंतिम सामना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० - अंतिम सामना
स्पर्धा २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६
दिनांक ३ एप्रिल २०१६
मैदान इडन गार्डन्स, कोलकाता
सामनावीर मार्लोन सॅम्युएल्स
मालिकावीर विराट कोहली
पंच

कुमार धर्मसेना
रॉड टकर
मराइस इरास्मुस

ब्रुस ऑक्सेनफोर्ड (राखीव पंच)
प्रेक्षक संख्या ६६,०००


२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० अंतिम सामना ३ एप्रिल २०१६ रोजी कोलकाता येथील इडन गार्डन्स ह्या मैदानावर खेळवला गेला. पात्र ठरलेल्या इंग्लंड आणि वेस्ट इंडीज मधून २०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० चा विजेता निवडण्यासाठी हा सामना खेळवला गेला.[१] सामन्यात वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी झाली. आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२० स्पर्धा दोनदा जिंकणारा वेस्ट इंडीज हा पहिलाच संघ[२]

पार्श्वभूमी[संपादन]

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मानधनाच्या वादामुळे वेस्ट इंडीजचे काही खेळाडू स्पर्धेतून अंग काढून घेण्याच्या तयारीत होते,[३] त्यामुळे त्यांचा दुय्यम संघ विश्वचषकासाठी पाठवला जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. [४] वेस्ट इंडीजचा कर्णधार डॅरेन सामीने वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाबरोबर पत्रव्यवहार करून मानधनाच्या मुद्यावरून खेळाडूंच्या स्पर्धेत भाग घेण्यासंदर्भात चिंता व्यक्त केली होती.[५][६] सामी म्हणाला की "...आम्हाला स्पर्धेत खेळायचे आहे आणि आम्ही संपूर्ण ताकदीने वेस्ट इंडीजचे प्रतिनिधीत्व करू".[७]

या सामन्या आधी इंग्लंड आणि वेस्ट इंडीज दोन्ही संघ एकमेकांविरूद्ध दोनवेळा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळले आहेत. पहिल्यावेळी लॉर्डस् वर झालेल्या क्रिकेट विश्वचषक १९७९च्या अंतिम सामन्यात आणि दुसर्‍यावेळी २००४ च्या आयसीसी चँपियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात – दोन्ही वेळेस वेस्ट इंडीजने विजय मिळवला होता. तसेच हा अंतिम सामना हा दोन माजी विजेत्या संघांचा होता – इंग्लंडने २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१० मध्ये आणि वेस्ट इंडीजने २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२ मध्ये पहिल्यांदा विजय मिळवला होता.

दोन्ही संघ सुपर १० च्या गट-१ मध्ये अफगाणिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या संघांसोबत खेळले होते. दोन्ही संघांदरम्यानचा गट फेरीतील सामना १६ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे मैदानावर झाला होता, ज्यात वेस्ट इडीजने ६ गडी आणि ११ चेंडू राखून विजय मिळवला होता. वेस्ट इंडीजचा सलामीवीर ख्रिस गेलने ११ षटकारांसहीत ४७ चेंडूंमध्ये १०० धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत दोन शतके करणारा तो पहिलाच फलंदाज.[८]

ह्या व्यतिरिक्त, पुरूष संघाच्या अंतिम सामन्या अगोदर, वेस्ट इंडीज महिला संघानेसुद्धा २०१६ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी२० स्पर्धेत जगजेते पद मिळवले होते. इडन गार्डन्स येथे झालेल्या या सामन्यात त्यांनी तीनवेळचे जगजेते ऑस्ट्रेलियाचा ८ गडी आणि ३ चेंडू राखून पराभव केला.[९]

अंतिम सामन्यापर्यंत[संपादन]

इंग्लंड[संपादन]

२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१० स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यानंतर सुद्धा, इंग्लंडला मागील वर्षी क्रिकेट विश्वचषकाच्या गट फेरीच्याही पुढे जाता आले नव्हते, तसेच २०१० च्या विजेत्या संघातला एकमेव फलंदाज आणि कर्णधार आयॉन मॉर्गन हा एकमेव खेळाडू या वर्षीच्या संघात होता. तुलनेने अनुभवी संघ असूनही, विश्वचषकाचा अनुभव असलेले फलंदाज ज्यो रूट, यष्टिरक्षक जोस बटलर आणि तेज गोलंदाज लिआम प्लंकेट यासारखे खेळाडू इंग्लंडने ॲशेससाठी निवडले आणि चषक जिंकला.

वेस्ट इंडीज विरुद्ध झालेल्या पराभवानंतर[१०], इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला विश्व टी२० च्या इतिहासातील सर्वात मोठा २२९ धावांचा यशस्वी पाठलाग करून पराभूत केले.[११] त्यानंतर त्यांनी अफगाणिस्तानचा १५ धावांनी[१२] आणि श्रीलंकेचा १० धावांनी पराभव[१३] करून उपांत्य फेरीत धडक मारली. दिल्लीमधील अंतिम सामन्यात त्यांचा मुकाबला स्पर्धेत अजिंक्य राहिलेल्या न्यूझीलंडशी होता. न्यूझीलंडने पहिल्या १० षटकांत ८९/१ अशी दमदार सुरवात केली. परंतू नंतर ख्रिस जॉर्डन आणि बेन स्टोक्सने केलेल्या अचूक गोलंदाजीने त्यांना १५३ धावांवर समाधान मानावे लागले. इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयने ४४ चेंडूंत ७८ धावा करून इंग्लंडला सात गडी व १७ चेंडू राखून विजय मिळवून दिला. त्याला सामनावीराचा पुरस्कार दिला गेला.[१४]

वेस्ट इंडीज[संपादन]

कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट मधील निराशाजनक कामगिरीनंतरसुद्धा, वेस्ट इंडीजला स्पर्धेत पुढे जाण्याचा विश्वास होता. त्याचे मुख्य कारण होते, त्यांच्या अनेक खेळाडूंचा आयपीएल मधील अनुभव आणि त्यातील बरेच २०१२ च्या चँपियन संघाचा एक भाग होते, अपवाद होता तो ऑफ-स्पिन गोलंदाज सुनील नारायण आणि अष्टपैलू कीरॉन पोलार्ड यांचा.[१५]

इंग्लंडला पराभूत केल्यानंतर[१०], त्यांनी श्रीलंकेविरुद्ध ७ गडी राखून[१६] आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ गडी राखून[१७] विजय मिळवले. गट फेरीच्या शेवटच्या सामन्यात त्यांना नवख्या अफगाणिस्तान विरुद्ध ६ धावांनी पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले[१८], परंतू गटामध्ये त्यांनी पहिले स्थान अगोदरच मिळवले होते. मुंबईतील उपांत्य सामन्यात त्यांची गाठ यजमान भारताविरुद्ध पडली, आणि भारताने पहिली फलंदाजी करून विराट कोहलीच्या ४७ चेंडूंतील ८९ धावांच्या नाबाद खेळीमुळे निर्धारीत २० षटकांत १९२/२ अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेला सलामीवीर ख्रिस गेल फक्त ५ धावांत तर त्यानंतर लगेच मार्लोन सॅम्युएल्स बाद झाल्यानंतर वेस्ट इंडीजचा संघ १९/२ अशा अडचणीत सापडला. परंतू फलंदाजांच्या तुफान फटकेबाजीमुळे वेस्ट इंडीजचा सात गडी आणि २ चेंडू राखून विजय झाला. शेवटच्या क्षणी बदली म्हणून निवड झालेल्या लेंडल सिमन्सने या पाठलागाचे नेतृत्व केले. दोन वेळा नो बॉलमुळे जीवदान मिळालेल्या सिमन्सने ५१ चेंडूंत नाबाद ८२ धावांची खेळी केली. त्यालाच सामनावीरचा पुरस्कार मिळाला.[१९]

सामन्याचा तपशील[संपादन]

सामन्याचा सारांश[संपादन]

वेस्ट इंडीजची सुरवात खूपच चांगली झाली सॅम्युएल बदरीने दुसर्‍याच चेंडूवर जेसन रॉयला त्रिफळाचीत केले आणि दुसर्‍या षटकात ॲलेक्स हेल्सला आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर झेलबाद केले. आपल्या दुसर्‍या षटकात बदरीने ओवेन मॉर्गनला ख्रिस गेलकरवी झेलबाद केले त्यामुळे इंग्लंडची अवस्था ४.४ षटकांत ३ बाद २३ अशी झाली. त्यानंतर ज्यो रूटने ३६ चेंडूंत ५४ धावा करत इंग्लंडला सामन्यात पुन्हा आणून ठेवले, परंतू पॅडल स्वीप करण्याच्या नादात कार्लोस ब्रॅथवाइटच्या षटकात सुलेमान बेनकडे एक सोपा झेल देऊन तो बाद झाला. त्याशिवाय ड्वेन ब्राव्होने एकाच षटकांत तीन चेंडूंत दोन फलंदाजांना तंबूत धाडले. त्यामुळे इंग्लंडचा संघ ११०/४ वरून १४.१ षटकांनंतर १११/७ अशा अडचणीत सापडला. तळाच्या फलंदाजांनी केलेल्या फलंदाजीमुळे इंग्लंडला निर्धारित २० षटकांमध्ये १५५/९ अशी मजल मारता आली.[२]

वेस्ट इंडीजच्या डावा दरम्यान अचानकच दुसरे षटक टाकण्यासाठी ज्यो रूटला पाचारण करण्यात आले आणि त्याने लगेच ख्रिस गेल आणि जॉन्सन चार्ल्स या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. पुढच्याच षटकात डेव्हिड विलीने भारताविरुद्ध विजय मिळवून देणार्‍या लेंडल सिमन्सला शून्यावरच पायचीत पकडले आणि तिसर्‍याच षटकात वेस्ट इंडीजचा संघ ३ बाद ११ अशा अडचणीत सापडला. ड्वेन ब्राव्हो आणि मार्लोन सॅम्युएल्सने ६९ चेंडूंत ७५ धावांची भागीदारी करून वेस्ट इंडीजच्या डावाला आकार दिला. पंरतू त्यानंतर लागोपाठच्या षटकांमध्ये ब्राव्हो, आंद्रे रसेल आणि कर्णधार डॅरेन सॅमी बाद झाल्याने वेस्ट इंडीजच्या समोर शेवटच्या ४ षटकांत विजयासाठी ४५ धावांचे होते. पुढच्या तीन षटकांतील अचूक गोलंदाजीमुळे शेवटच्या षटकात वेस्ट इंडीजला विजयासाठी १९ धावांची गरज होती आणि या अखेरच्या षटकात कार्लोस ब्रॅथवाइटने बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर पहिल्या चार चेंडूंवर लागोपाठ चार षटकार खेचत विजयश्री खेचून आणली.[२]

वेस्ट इंडीजच्या फक्त तीन फलंदाजांना दोन आकडी धावसंख्या गाठता आली: सॅम्यूएल्स, ब्रॅथवाइट आणि ब्राव्हो. सॅम्यूएल्सची ६६ चेंडूंतील नाबाद ८५ धावांची खेळी ही विश्व ट्वेंटी२० अंतिम सामन्याच्या इतिहासातील सर्वोच्च खेळी होती. ब्रॅथवाइटने यशस्वी पाठलाग करताना शेवटच्या षटकातील सर्वोच्च धावांचा विक्रम मोडीत काढला (ब्रॅथवाइटच्या २४ धावांनी ऑस्ट्रेलियाच्या मायकेल हसीने सेंट लुशिया येथे झालेल्या २०१० च्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानच्या सईद अजमलच्या गोलंदाजीवर केलेल्या २२ धावांचा विक्रम मोडीत काढला. सॅम्यूएल्सला सामनावीराचा खिताब देण्यात आला.

हा विजय म्हणजे वेस्ट इंडीजचा १९७५ व १९७९ क्रिकेट विश्वचषक आणि २०१२ विश्व ट्वेंटी२० नंतरचा चवथा आयसीसी विश्व चँपियनशीपमधील विजय. ह्या विजयामुळे दोनवेळा पुरूष विश्व टी२० जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ होण्याचा मान वेस्ट इंडीजला मिळाला. तसेच एकाच दिवशी त्यांनी महिला आणि पुरूष स्पर्धा जिंकल्या.

धावफलक[संपादन]

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
जेसन रॉय गो बदरी ०.००
ॲलेक्स हेल्स झे बदरी गो रसेल ३३.३३
ज्यो रूट झे बेन गो ब्रॅथवाइट ५४ ३६ १५०.००
ओवेन मॉर्गन* झे गेल गो बदरी १२ ४१.६६
जोस बटलर झे ब्राव्हो गो ब्रॅथवाइट ३६ २२ १६३.६३
बेन स्टोक्स झे सिमन्स गो ब्राव्हो १३ १६२.५०
मोईन अली झे †रामदिन गो ब्राव्हो ०.००
क्रिस जॉर्डन नाबाद १२ १३ ९२.३०
डेव्हिड विली झे चार्ल्स् गो ब्रॅथवाइट २१ १४ १५०.००
लियाम प्लंकेट झे बदरी गो ब्राव्हो १००.००
आदिल रशीद नाबाद १००.००
अवांतर धावा (ले.बा. ४, वा. १)
एकूण (९ बाद; २० षटके) १५५

गडी बाद होण्याचा क्रम: १-० (रॉय, ०.२ ष), २-८ (हेल्स, १.५ ष), ३-२३ (मॉर्गन, ४.४ ष), ४-८४ (बटलर, ११.२ ष), ५-११० (स्टोक्स, १३.४ ष), ६-११० (अली, १३.६ षटके), ७-१११ (रूट, १४.१ षटके), ८-१३६ (विली, १७.३ ष), ९-१४२ (प्लंकेट, १८.३ ष)

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
सॅम्युएल बदरी १६ ४.००
आंद्रे रसेल २१ ५.२५
सुलेमान बेन ४० १३.३३
ड्वेन ब्राव्हो ३७ ९.२५
कार्लोस ब्रॅथवाइट २३ ५.७५
डॅरेन सामी १४ १४.००
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
जॉन्सन चार्ल्स झे स्टोक्स गो रूट १४.२८
ख्रिस गेल झे स्टोक्स गो रूट २००.००
मार्लोन सॅम्युएल्स नाबाद ८५ ६६ १२८.७८
लेंडल सिमन्स पायचीत गो विली ०.००
ड्वेन ब्राव्हो झे रूट गो रशीद २५ २७ ९२.५९
आंद्रे रसेल झे स्टोक्स गो विली ३३.३३
डॅरेन सामी * झे हेल्स गो विली १००.००
कार्लोस ब्रॅथवाइट नाबाद ३४ १० ३४०.००
दिनेश रामदिन
सॅम्युएल बदरी
सुलेमान बेन
अवांतर धावा (ले.बा. ३, वा. ६)
एकूण (६ बाद; १९.४ षटके) १६१

गडी बाद होण्याचा क्रम: १-१ (चार्ल्स, १.१ ष), २-५ (गेल, १.३ ष), ३-११ (सिमन्स, २.३ ष), ४-८६ (ब्राव्हो, १३.६ ष), ५-१०४ (रसेल, १५.१ ष), ६-१०७ (सामी, १५.३ ष)

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
डेव्हिड विली २० ५.००
ज्यो रूट ९.००
ख्रिस जॉर्डन ३६ ९.००
लियाम प्लंकेट २९ ७.२५
आदिल रशीद २३ ५.७५
बेन स्टोक्स २.४ ४१ १५.३७

सामना अधिकारी[संपादन]

सामन्यानंतर[संपादन]

पुरस्कार वितरण समारंभावेळी, सामनावीर मार्लोन सॅम्युएल्सने त्याचा पुरस्कार शेन वॉर्नला समर्पित करत म्हटले "मी माईकने नाही तर माझ्या बॅटने उत्तर देतो". ह्या दोन खेळाडूंदरम्यान २०१३-१४ च्या बीग बॅश लीग मध्ये झालेल्या बाचाबाची संदर्भातील चालू असलेल्या शा‍ब्दिक चकमकीचीच ही एक प्रतिक्रिया होती.[२०] वेस्ट इंडीजचा कर्णधार डॅरेन सामीने वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाची निंदा करताना त्याच्या भाषणात म्हटले, "फायनलमध्ये धडक मारल्याने अगदी सकाळपासून आमचे कौतूक होते आहे; पण आमच्याच क्रिकेट बोर्डाने अद्याप आमच्याशी संपर्क साधला नाही. ही अतिशय निराशाजनक बाब आहे. [२१] इंग्लंडचा कर्णधार आयॉन मॉर्गन म्हणाला की "आम्ही व्यवस्थित फलंदाजी केली नाही आणि अंदाजे ४० धावा कमी झाल्या"[२२] आणि बेन स्टोक्सच्या शेवटच्या षटकाचे समर्थन करताना तो म्हणाला, "ती त्याची चूकी नाहीये ".[२३]

सामन्याची सांगता झाल्यानंतर आयसीसीने आपला विश्व ट्वेंटी२० संघ जाहीर केला. संघामध्ये वेस्ट इंडीजचे दोन खेळाडू (आंद्रे रसेलसॅम्यूएल बदरी) आणि इंग्लंडचे चार खेळाडू आहेत (जेसन रॉय, ज्यो रूट, जोस बटलरडेव्हिड विली).[२४] वेस्ट इंडीजच्या विजयानंतर सेंट लुशियामधील एका मैदानाचे नामकरण डॅरेन सामी राष्ट्रीय क्रिकेट मैदान असे करण्यात आले.[२५]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ विश्व टी२०, अंतिम सामना: इंग्लंड वि. वेस्ट इंडीज, कोलकाता, एप्रिल ३, २०१६
 2. a b c ब्रेथवेटच्या सलग ४ षटकारांमुळे वेस्ट इंडीजची जेतेपदाला गवसणी (इंग्रजी मजकूर)
 3. ^ करारांच्या वादामुळे ट्वेंटी२० विश्वचषकाच्या पूर्वसंध्येला वेस्ट इंडीज समोर गंभीर प्रश्न (इंग्रजी मजकूर)
 4. ^ अटी मान्य करण्यासाठी वेस्ट इंडीजच्या खेळाडूंना चार दिवसाची मुदत (इंग्रजी मजकूर)
 5. ^ पत्रव्यवहारामुळे वेस्ट इंडीज क्रिकेटमधली खोल दुही उघड (इंग्रजी मजकूर)
 6. ^ 'खेळाडूंनी ते संप करतील असे कधीही म्हटले नव्हते' – डॅरेन सामी (इंग्रजी मजकूर)
 7. ^ वेस्ट इंडीजच्या खेळाडूंना विश्व टी२० मध्ये खेळायचे आहे. (इंग्रजी मजकूर)
 8. ^ गेलच्या ४७ चेंडूंतील शतकामुळे इंग्लंडचा पराभव (इंग्रजी मजकूर)
 9. ^ महिला विश्व टी२०, अंतिम सामना: ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडीज, कोलकाता, एप्रिल ३, २०१६
 10. a b विश्व टी२० – १५वा सामना, सुपर १० गट १: इंग्लंड वि. वेस्ट इंडीज, मुंबई, मार्च १६, २०१६
 11. ^ विश्व टी२० – १८वा सामना, सुपर १० गट १: इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका, मुंबई, मार्च १८, २०१६
 12. ^ विश्व टी२० – २४वा सामना, सुपर १० गट १: अफगाणिस्तान वि. इंग्लंड, मुंबई, मार्च २३, २०१६
 13. ^ विश्व टी२० – २९वा सामना, सुपर १० गट १: इंग्लंड वि. श्रीलंका, मुंबई, मार्च २६, २०१६
 14. ^ रॉयच्या ७८ धावांमुळे इंग्लंडचा अंतिम सामन्यात प्रवेश (इंग्रजी मजकूर)
 15. ^ टी२० विशेषज्ञांमुळे कमकुवत झालेल्या वेस्ट इंडीज आशावादी (इंग्रजी मजकूर)
 16. ^ विश्व टी२० – २१वा सामना, सुपर १० गट १: श्रीलंका वि. वेस्ट इंडीज, बंगळूर, मार्च २०, २०१६
 17. ^ विश्व टी२० – २७वा सामना, सुपर १० गट १: दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडीज, नागपूर, मार्च २५, २०१६
 18. ^ विश्व टी२० – ३०वा सामना, सुपर १० गट १: अफगाणिस्तान वि. वेस्ट इंडीज, नागपूर, मार्च २७, २०१६
 19. ^ फलंदाजांच्या फटकेबाजी मुळे वेस्ट इंडीज विश्व टी२० च्या अंतिम फेरीत (इंग्रजी मजकूर)
 20. ^ मी नव्हे, माझी कामगिरी बोलते
 21. ^ सेलिब्रेशनला किनार नाराजीची
 22. ^ विश्व ट्वेंटी२०: वेस्ट इंडीजने इंग्लंडला हरवून दुसर्‍यांदा जेतेपद मिळवले (इंग्रजी मजकूर)
 23. ^ विश्व ट्वेंटी२० अंतिम सामना: इंग्लंडच्या पराभवासाठी बेन स्टोकला जबाबदार धरले जाऊ नये – मॉर्गन (इंग्रजी मजकूर)
 24. ^ विश्व ट्वेंटी२० २०१६: स्पर्धा संघामध्ये इंग्लंडचे चार खेळाडू (इंग्रजी मजकूर)
 25. ^ सेंट लुशियामधील मैदानाचे डॅरेन सामीच्या सन्मानार्थ नामकरण (इंग्रजी मजकूर)