अरुण जेटली स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फिरोजशाह कोटला मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
फिरोजशाह कोटला मैदान
मैदान माहिती
स्थान बहादूर शहा झाफर मार्ग, दिल्ली
गुणक 28°38′16″N 77°14′35″E / 28.63778°N 77.24306°E / 28.63778; 77.24306गुणक: 28°38′16″N 77°14′35″E / 28.63778°N 77.24306°E / 28.63778; 77.24306
स्थापना १८८३[१]
आसनक्षमता ४८,०००[२]
मालक दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन
प्रचालक दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन
यजमान भारतीय क्रिकेट संघ
दिल्ली क्रिकेट संघ
दिल्ली डेरडेव्हिल्स

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. १०-१४ नोव्हेंबर १९४८:
भारत  वि. वेस्ट इंडीज
अंतिम क.सा. ३-७ डिसेंबर २०१५:
भारत  वि. दक्षिण आफ्रिका
प्रथम ए.सा. १५ सप्टेंबर १९८२:
भारत वि. श्रीलंका
अंतिम ए.सा. २० ऑक्टोबर २०१६:
भारत वि. न्यू झीलंड
प्रथम २०-२० २३ मार्च २०१६:
अफगाणिस्तान वि. इंग्लंड
अंतिम २०-२० ३० मार्च २०१६:
इंग्लंड वि. न्यू झीलंड
शेवटचा बदल १ जानेवारी २०१७
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

भारतातील नवी दिल्लीच्या बहादूर शाह झाफर मार्ग येथे अरुण जेटली क्रिकेट मैदान (पुर्वीचे फिरोजशहा कोटला मैदान) वसलेले आहे.[२] मैदानाची स्थापन १८८३ मध्ये झाली कोलकाता येथील इडन गार्डन्स नंतर, सध्या चालू स्थितीतील ते भारतातील दुसरे मैदान आहे. २०१६ पर्यंत, शेवटची कसोटी सामन्यांमध्ये २८ वर्षे आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १० वर्षे या मैदानावर भारतीय क्रिकेट संघ अजिंक्य राहिला आहे.[३] अनिल कुंबळेचे पाकिस्तानविरुद्ध एका कसोटी डावातील १० बळी, सुनील गावसकरला मागे टाकून ३५ शतकांसह सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक कसोटी शतके करण्याचा विक्रम आणि त्या आधी डॉन ब्रॅडमनचा सर्वाधिक २९ कसोटी शतकांच्या विक्रमाशी गावसकरने केलेली बरोबरी अशा उल्लेखनीय घटनांमुळे हे मैदान लक्षात राहते.

इतिहास[संपादन]

भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान १० नोव्हेंबर १९४८ रोजी झालेला कसोटी सामना, हा ह्या मैदानावरचा पहिला कसोटी सामना होता. मैदानाचे मालकी आणि व्यवस्थापकिय हक्क डीडीसीए (दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन) कडे आहेत. १९५२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना हेमू अधिकारी आणि गुलाम अहमद यांनी दहाव्या गड्यासाठी १०९ धावांची भागीदारीचा ह्या मैदानातील विक्रम आजपर्यंत अबाधित आहे. १९६५ मध्ये, श्रीनिवास वेंकटराघवनने त्याच्या पदार्पणातील मालिकेमध्ये न्यू झीलंडच्या फलंदाजीला खिंडार पाडताना ७२ धावांत ८ आणि ८० धावांत ४ गडी बाद केले होते. १९६९-७० मध्ये, बिशनसिंग बेदी आणि एरापल्ली प्रसन्ना ह्या फिरकी जोडीने १८ बळी घेऊन ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाला ७ गड्यांनी सुप्रसिद्ध विजय विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.[४] १९८१ मध्ये, जेफ्री बॉयकॉटने गॅरी सोबर्सचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडला. १९८-८४ मध्ये सुनील गावसकरने त्याचे २९वे शतक ठोकून डॉन ब्रॅडमनचा सर्वाधिक काळासाठी अबाधित असलेला सर्वात जास्त कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. १९९९-२००० मध्ये, पाकिस्तान विरुद्ध कसोटीच्या चवथ्या डावात ७४ धावांत १० बळी घेऊन एका डावात १० बळी घेणारा अनिल कुंबळे हा जिम लेकर नंतर दुसरा गोलंदाज ठरला. २००५-०६ मध्ये ह्याच मैदानावर सचिन तेंडुलकरने गावस्करचा सर्वाधिक ३५ कसोटी शतकांचा विक्रम मोडला.[४] २७ डिसेंबर २००९ रोजी, सामना खेळवण्यास खेळपट्टी योग्य नसल्या कारणाने भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा सामना रद्द करण्यात आला. सामनाधिकाऱ्याच्या सामना अहवालावरुन, आयसीसीने मैदानावर १२ महिन्यांचा निर्बंध लादला. त्यानंतर थेट २०११ क्रिकेट विश्वचषकासाठी मैदानाची निवड करण्यात आली.[५] २००८ पासुन सदर मैदान हे भारतीय प्रीमियर लीगचा संघ दिल्ली डेरडेव्हिल्सचे होम ग्राऊंड आहे.[४]

आकडेवारी[संपादन]

फिरोज शाह कोटला – वेस्ट इंडीज वि दक्षिण आफ्रिका
फिरोज शाह कोटला मैदान

कसोटी क्रिकेट[संपादन]

  • सर्वाधिक सांघिक धावसंख्या: वेस्ट इंडीज ६४४/८घो वि भारत, ६ फेब्रुवारी १९५९[६]
  • सर्वात निचांकी सांघिक धावसंख्या: भारत ७५ वि वेस्ट इंडीज, २५ नोव्हेंबर १९८७[७]
  • सर्वाधिक धावा: सचिन तेंडुलकर (७५९ धावा)
  • सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या: बर्ट सुटक्लिफ २३०* वि भारत, १६ डिसेंबर १९५५
  • सर्वात यशस्वी गोलंदाज: अनिल कुंबळे (५८ बळी)

एकदिवसीय क्रिकेट[संपादन]

आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी[संपादन]

कसोटी[संपादन]

आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[९]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
१०-१४ नोव्हेंबर १९४८ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक
२-७ नोव्हेंबर १९५१ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अनिर्णित धावफलक
१६-१८ ऑक्टोबर १९५२ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारतचा ध्वज भारत १ डाव आणि ७० धावा धावफलक
१६-२१ डिसेंबर १९५५ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड अनिर्णित धावफलक
६-११ फेब्रुवारी १९५९ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक
१२-१६ डिसेंबर १९५९ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १२७ धावा धावफलक
८-१३ फेब्रुवारी १९६१ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान अनिर्णित धावफलक
१३-१८ डिसेंबर १९६१ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अनिर्णित धावफलक
८-१३ फेब्रुवारी १९६४ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अनिर्णित धावफलक
१९-२२ मार्च १९६५ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत ७ गडी धावफलक
२८ नोव्हेंबर-२ डिसेंबर १९६९ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ७ गडी धावफलक
२०-२५ डिसेंबर १९७२ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी धावफलक
११-१५ डिसेंबर १९७४ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि १७ धावा धावफलक
१७-२२ डिसेंबर १९७६ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि २५ धावा धावफलक
२४-२९ जानेवारी १९७९ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक
१३-१८ ऑक्टोबर १९७९ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक
४-९ डिसेंबर १९७९ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान अनिर्णित धावफलक
२३-२८ डिसेंबर १९८१ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अनिर्णित धावफलक
२९ ऑक्टोबर -३ नोव्हेंबर १९८३ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक
१२-१७ डिसेंबर १९८४ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी धावफलक
२६-३० सप्टेंबर १९८६ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक
२५-२९ नोव्हेंबर १९८७ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५ गडी धावफलक
१३-१७ मार्च १९९३ भारतचा ध्वज भारत झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे भारतचा ध्वज भारत १ डाव आणि १३ धावा धावफलक
१०-१३ ऑक्टोबर १९९६ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ७ गडी धावफलक
४-७ फेब्रुवारी १९९९ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारतचा ध्वज भारत २१२ धावा धावफलक
१८-२२ नोव्हेंबर २००० भारतचा ध्वज भारत झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे भारतचा ध्वज भारत ७ गडी धावफलक
२८ फेब्रुवारी-४ मार्च २००२ भारतचा ध्वज भारत झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे भारतचा ध्वज भारत ४ गडी धावफलक
१०-१४ डिसेंबर २००५ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत १८८ धावा धावफलक
२२-२६ नोव्हेंबर २००७ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारतचा ध्वज भारत ६ गडी धावफलक
२९ ऑक्टोबर-२ नोव्हेंबर २००८ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक
६-९ नोव्हेंबर २०११ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत ५ गडी धावफलक
२२-२४ मार्च २०१३ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ६ गडी धावफलक
३-७ डिसेंबर २०१५ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत ३३७ धावा धावफलक

एकदिवसीय[संपादन]

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[१०]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
१५ सप्टेंबर १९८२ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत ६ गडी धावफलक
०२ ऑक्टोबर १९८६ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ३ गडी धावफलक
१३ जानेवारी १९८७ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत ६ गडी धावफलक
२२ ऑक्टोबर १९८७ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ५६ धावा धावफलक
१५ ऑक्टोबर १९८९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ गडी धावफलक
२३ ऑक्टोबर १९८९ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २० धावा धावफलक
०३ नोव्हेंबर १९९४ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत १०७ धावा धावफलक
०२ मार्च १९९६ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ६ गडी धावफलक
११ एप्रिल १९९८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १६ धावा धावफलक
१४ एप्रिल १९९८ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ गडी धावफलक
१७ नोव्हेंबर १९९९ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत ७ गडी धावफलक
३१ जानेवारी २००२ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २ धावा धावफलक
१७ एप्रिल २००५ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १५९ धावा धावफलक
२८ मार्च २००६ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत ३९ धावा धावफलक
०२ डिसेंबर २००८ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सामना रद्द धावफलक
३१ ऑक्टोबर २००९ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ६ गडी धावफलक
२७ डिसेंबर २००९ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अनिर्णित धावफलक
२४ फेब्रुवारी २०११ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७ गडी धावफलक
२८ फेब्रुवारी २०११ Flag of the Netherlands नेदरलँड्स वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २१५ धावा धावफलक
०७ मार्च २०११ कॅनडाचा ध्वज कॅनडा केन्याचा ध्वज केन्या कॅनडाचा ध्वज कॅनडा ५ गडी धावफलक
०९ मार्च २०११ भारतचा ध्वज भारत Flag of the Netherlands नेदरलँड्स भारतचा ध्वज भारत ५ गडी धावफलक
१७ ऑक्टोबर २०११ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत ८ गडी धावफलक
०६ जानेवारी २०१३ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारतचा ध्वज भारत १० धावा धावफलक
११ ऑक्टोबर २०१४ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत ४८ धावा धावफलक
२० ऑक्टोबर २०१६ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६ धावा धावफलक

टी२०[संपादन]

आजवर मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[११]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२३ मार्च २०१६ Afghanistan इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १५ धावा धावफलक
२६ मार्च २०१६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० धावा धावफलक
२८ मार्च २०१६ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८ गडी धावफलक
३० मार्च २०१६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी धावफलक

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2016-09-21. 2017-01-01 रोजी पाहिले.
  2. ^ a b "फिरोजशाह कोटला, नवी दिल्ली". क्रिकविन्डो (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "फिरोजशाह कोटला, दिल्ली / नोंदी / कसोटी सामने". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ a b c फिरोजशाह कोटला क्रिकइन्फो.कॉम
  5. ^ २०१० च्या शेवटीपर्यंतर फिरोजशाह कोटलावर आंतरराष्ट्रीय सामने नाहीत
  6. ^ "वेस्ट इंडीजचा भारत दौरा, ५वी कसोटी: भारत वि वेस्ट इंडीज, दिल्ली, फेब्रुवारी ६-११, १९५९" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ "वेस्ट इंडीजचा भारत दौरा, १ली कसोटी: भारत वि वेस्ट इंडीज, दिल्ली, २५-२९ नोव्हेंबर, १९८७" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ a b "आयसीसी क्रिकेट विश्वचषक, १३वा सामना, गट ब: नेदरलँड्स वि वेस्ट इंडीज, दिल्ली, २८ फेब्रुवारी २०११" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ "फिरोजशाह कोटला, दिल्ली / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ "फिरोजशाह कोटला, दिल्ली / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ "फिरोजशाह कोटला, दिल्ली / नोंदी / आंतरराष्ट्रीय टी२० सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]