भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१५-१६
Appearance
(भारत क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६ या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६ | |||||
ऑस्ट्रेलिया | भारत | ||||
तारीख | १२ जानेवारी, २०१६ – ३१ जानेवारी, २०१६ | ||||
संघनायक | स्टीव्ह स्मिथ (ए.दि.) अॅरन फिंच (२०-२०) |
महेंद्रसिंग धोणी | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | स्टीव्ह स्मिथ (३१५) | रोहित शर्मा (४४१) | |||
सर्वाधिक बळी | जॉन हेस्टिंग्स (१०) | इशांत शर्मा (९) | |||
मालिकावीर | रोहित शर्मा (भारत) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शेन वॉटसन (१५१) | विराट कोहली(१९९) | |||
सर्वाधिक बळी | शेन वॉटसन(३) | जसप्रित बुमराह(६) | |||
मालिकावीर | विराट कोहली(भारत) |
दिनांक १२ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यावर पाच एकदिवसीय सामने व तीन २०-२० सामने खेळविले गेले.
ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका ४-१ अशी जिंकली. ह्या एकदिवसीय मालिकेमध्ये फलंदाजांनी एकूण ३,१५९ धावा केल्या. दोन देशा दरम्यान खेळविल्या गेलेल्या पाच किंवा त्यापेक्षा कमी सामन्यांच्या मालिकेचा हा विश्वविक्रम आहे. तसेच या मालिकेमध्ये एकूण फलंदाजांनी ११ शतके झळकाविली, हा सुद्धा एक विक्रमच आहे.
भारताने टी२० मालिका ३-० अशी जिंकत आय.सी.सी. टी२० चॅम्पियनशीप मध्ये पहिला क्रमांक मिळविला. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ आठव्या क्रमांकावर फेकला गेला.
संघ
[संपादन]एकदिवसीय सामने | टी२० सामने | ||
---|---|---|---|
ऑस्ट्रेलिया[१] | भारत[२] | ऑस्ट्रेलिया | भारत[३] |
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- बरिंदर सिंग स्रानचे भारताकडून व स्कॉट बॉलॅंड आणि जोएल पॅरीसचे ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय पदार्पण
- रोहित शर्माच्या १७१ धावा ह्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये सर्वोत्कृष्ट धावा होत.
- दोन द्विशतकीय भागीदारी होणारा हा पहिलाच एकदिवसीय सामना. ज्यात भारताकडून रोहित शर्मा आणि विराट कोहलीने २०७ धावांची तर ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ आणि जॉर्ज बेली यांनी २४२ धावांची भागीदारी केली
- रोहित शर्मा हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वात जलद (१९ डावांमध्ये) १००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला.
- स्टीव्ह स्मिथ आणि जॉर्ज बेली यांची २४२ धावांची भागीदारी ही ऑस्ट्रेलियाकडून तिसऱ्या विकेटसाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी.
- वाका क्रिकेट मैदानावरील हा सर्वोत्कृष्ट यशस्वी पाठलाग होय.
२रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये लागोपाठ दोन शतके झळकाविणारा रोहित शर्मा हा तिसरा खेळाडू.
- द गब्बा क्रिकेट मैदानावरील हा सर्वोत्कृष्ट यशस्वी पाठलाग होय.
३रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
- रिशी धवन आणि गुरकिरत सिंगचे भारताकडून एकदिवसीय पदार्पण
- विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वात जलद ७००० धावा पूर्ण (१६१ डावांत)
- महेंद्रसिंग धोणी ३०० हून अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत संघाचे नेतृत्व करणारा तिसरा कर्णधार ठरला. तसेच सर्वच्या सर्व ३ क्रिकेट प्रकारांत प्रत्येकी ५० पेक्षा जास्त सामन्यांत कर्णधारपद भूषविणारा तो पहिलाच खेळाडू होय.
- मेलबर्न क्रिकेट मैदानावरील हा सर्वोत्कृष्ट यशस्वी पाठलाग होय.
४था एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- केन रिचर्डसनने पहिल्यांदाच एका एकदिवसीय सामन्यात ५ बळी घेतले. मानुका ओव्हल मैदानावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५ बळी मिळविणारा तो पहिलाच गोलंदाज.
- विराट कोहलीने सर्वांत जलद २५ एकदिवसीय शतके करण्याचा पराक्रम केला (१६२ डाव).
- ऑस्ट्रेलियाच्या डावा दरम्यान जायबंदी झाल्यामुळे पंच रिचर्ड केटेलबोरो यांच्याऐवजी तिसरे पंच पॉल विल्सन हे पंच म्हणून उभे राहिले.
५वा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत गोलंदाजी
- जसप्रित बुमराहचे भारताकडून एकदिवसीय पदार्पण.
- मनीष पांडे (भा) व मिशेल मार्श (ऑ) यांचे पहिले एकदिवसीय शतक.
- पाहुण्या संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये केलेला हा सर्वांत मोठा यशस्वी पाठलाग ठरला.
२०-२० मालिका
[संपादन]१ला २०-२० सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
- जसप्रित बुमराह व हार्दिक पंड्याचे भारताकडून तर ट्रेव्हिस हेडचे ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
- सुरेश रैनाच्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट मध्ये १००० धावा पूर्ण
२रा २०-२० सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
- स्कॉट बॉलॅंड, नाथन लायन व ॲंड्रयू टेचे ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
- महेंद्रसिंग धोणीचा सर्वाधिक १४० यष्टीचीतचा विक्रम.
३रा २०-२० सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
- कॅमरुन बॉयक्रॉफ्ट आणि उस्मान ख्वाजाचे ऑस्ट्रेलियाकडून टी२० पदार्पण.
- रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १००० धावा पूर्ण.
संदर्भ
[संपादन]- ^ पॅरिस व बॉलॅंडला संधी - कांगारुंचा भारताला तेजतर्रार मारा[permanent dead link]
- ^ "ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी भारतीय संघ". 2015-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-22 रोजी पाहिले.
- ^ "T-20त युवी, भज्जी, नेहराला संधी". 2015-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-22 रोजी पाहिले.
भारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे | |
---|---|
१९४७-४८ | १९६७-६८ | १९७७-७८ | १९८०-८१ | १९८५-८६ | १९९१-९२ | १९९९-२००० | २००३-०४ | २००७-०८ | २०११-१२ | २०१४-१५ | २०१५-१६ | २०१८-१९ | २०२०-२१ |