विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान
मैदान माहिती
स्थान नागपूर
स्थापना १९२९ (पहिल्या सामन्याची नोंद)
आसनक्षमता ४०,०००
मालक विदर्भ क्रिकेट असोसिएशन
प्रचालक विदर्भ क्रिकेट असोसिएशन

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. ३-८ ऑक्टोबर १९६९:
भारत  वि. न्यू झीलंड
अंतिम क.सा. १-५ मार्च २००६:
भारत  वि. इंग्लंड
प्रथम ए.सा. २३ जानेवारी १९८५:
भारत वि. इंग्लंड
अंतिम ए.सा. १४ ऑक्टोबर २००७:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
शेवटचा बदल २५ ऑक्टोबर २०१६
स्रोत: इएसपीएन.क्रिकइनफो.कॉम हे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)

विदर्भ क्रिकेट असोसिएशन ग्राउंड हे नागपूर मधील एक कसोटी क्रिकेटचे मैदान होते.

हे मैदान व्हिसीए मैदान म्हणून ओळखले जाते आणि मध्य विभागाच्या अधिपत्याखाली आहे. ह्या मैदानावरील पहिला सामना १९६९ साली खेळला गेला

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान म्हणून ह्या मैदानाची जागा आता नवीन मैदान विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान ह्या मैदानाने घेतली आहे. सध्या हे मैदान विदर्भ आणि उत्तर प्रदेश क्रिकेट संघ वापरत आहे.

सुनील गावसकरने त्याचे एकमेव एकदिवसी शतक ह्याच मैदानावर क्रिकेट विश्वचषक, १९८७ दरम्यान न्यू झीलंड विरुद्ध केले.[१]

१९९५ साली, भारत आणि न्यू झीलंड ५व्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, मैदानातील इस्ट स्टँडची भिंत कोसळून झालेल्या अपघातामध्ये ९ जणांचा मृत्यु झाला आणि ७० जण जखमी झाले होते.

इतिहास[संपादन]

विदर्भ क्रिकेट असोसिएशन व्यवस्थापित देशातील दहावे कसोटी मैदान जे कदाचित एकमेव असे आंतरराष्ट्रीय मैदान आहे ज्यावर आपण रस्त्यावरून सरख मैदानावर चालत येऊ शकता आणि जे नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे.

इतिहासातील, पहिली क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील हॅटट्रिक चेतन शर्माने केन रुदरफोर्ड, इयान स्मिथ आणि एवेन चॅटफिल्ड ह्या तिघांना त्रिफळाचीत करून नागपूरमध्येच साधली होती.[२]

सुनील गावसकर त्याचे एकमेव एकदिवसीय आणि विश्वचषक शतक न्यू झीलंड विरुद्ध १९८७ क्रिकेट विश्वचषकादरम्यान केले होते. तो स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना होता आणि भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवला. शतकांचा विचार करता हे मैदान सचिन तेंडुलकरसाठी दुसरे सर्वात फलदायी मैदान आहे. सचिन तेंडुलकर चेपॉक येथे चार आणि त्यामागोमाग नागपूरमध्ये तीन शतके लगावली आहेत.

२६ नोव्हेंबर १९९५ रोजी, ह्या मैदानावर एक अत्यंत दुःखदायक घटना घडली. भारत-न्यू झीलंड एकदिवसीय मालिकेतील पाचव्या सामन्यादरम्यान, इस्ट स्टँडमधील एक भिंत कोसळून नऊ लोक मरण पावले.[३]

बीसीसीआयने १९९९ मध्ये खेळपट्टी नव्याने तयार करण्यासाठी एक समिती नेमली, त्याआधी खेळपट्टीची अवस्था खूपच वाईट होती. हवी तशी खेळपट्टी तयार होईपर्यंत थोडा वेळ जावा लागला. याच कारणामुळे २००३-०४ मध्ये खेळवल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर दणदणीत विजय मिळवला आणि बॉर्डर-गावसकर चषकावर आपले नाव कोरले.

स्थानिक समिक्षकांनी क्युरेटरवर टीका केली की घरच्या संघाच्या मागणीकडे दुर्लक्ष करून त्यांनी एक विरोधी संघाला मदत करणारी वेगवान खेळपट्टी बनवली. परंतु क्युरेटरच्या म्हणण्यानुसार त्याने फक्त खेळपट्टी समितीच्या आदेशांचे पालन केले. आजमितीला अस्सल वेगवान गोलंदाजांना वेग आणि मुव्हमेंटसाठी सहाय्य करणाऱ्या काही मैदानांपैकी एकमेव असे नागपूरचे मैदान आहे. २००४-०५ च्या हंगामातील बरेच प्रथम-श्रेणी सामने हे त्यामुळे ३ दिवसात संपले.

विक्रम[संपादन]

कसोटी[संपादन]

फलंदाजी[संपादन]

  • सर्वोच्च सांघिक धावसंख्या: ६०९/६घो, भारत वि झिम्बाब्वे, २०००-०१ त्यानंतर ५७०/७ आणि ५४६/९ सर्व भारतातर्फे
  • निचांकी सांघिक धावसंख्या: १०९, भारत वि न्यू झीलंड, १९६९-७०.
  • सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या: २३२*, अँडी फ्लॉवर वि भारत २०००-०१.
  • सर्वाधिक धावा: सचिन तेंडुलकर (६५९ धावा), राहुल द्रविड (४२३ धावा) आणि अँडी फ्लॉवर (२९८ धावा).

गोलंदाजी[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय[संपादन]

फलंदाजी[संपादन]

  • सर्वाधिक सांघिक धावसंख्या: भारत ३५० वि श्रीलंका – २००५-०६ मध्ये, त्यानंतर न्यू झीलंड ३४८/३ आणि भारत ३३८/३.
  • सर्वात जास्त वैयक्तिक धावा: सौरव गांगुली (३९८ धावा), राहुल द्रविड (३९२) आणि सचिन तेंडुलकर (३९० धावा).
  • सर्वात निचांकी धावसंख्या: झिम्बाब्वे १५४ वि. ऑस्ट्रेलिया – १९९५-९६
  • सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या: शिवनारायण चंद्रपॉल १४९ वि. भारत, २००६-०७ मध्ये.

गोलंदाजी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "रिलायन्स विश्वचषक, २४वा सामना: भारत वि न्यू झीलंड, नागपूर, ऑक्टोबर ३१, २९८७". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले."खेळाडू / भारत / सुनील गावसकर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ भारत वि न्यू झीलंड
  3. ^ "पाचवा एकदिवसीय सामना - भारत वि न्यू झीलंड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.