भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१
भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१ | |||||
ऑस्ट्रेलिया | भारत | ||||
तारीख | २७ नोव्हेंबर २०२० – १९ जानेवारी २०२१ | ||||
संघनायक | ॲरन फिंच (ए.दि., १ली आणि ३री ट्वेंटी२०) मॅथ्यू वेड (२री ट्वेंटी२०) टिम पेन (कसोटी) |
विराट कोहली (ए.दि., ट्वेंटी२०, १ली कसोटी) अजिंक्य रहाणे (२री-४थी कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मार्नस लेबसचग्ने (४२६) | ऋषभ पंत (२७४) | |||
सर्वाधिक बळी | पॅट कमिन्स (२१) | मोहम्मद सिराज (१३) | |||
मालिकावीर | पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ॲरन फिंच (२४९) | हार्दिक पंड्या (२१०) | |||
सर्वाधिक बळी | ॲडम झम्पा (७) | मोहम्मद शमी (४) | |||
मालिकावीर | स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मॅथ्यू वेड (१४५) | विराट कोहली (१३४) | |||
सर्वाधिक बळी | मिचेल स्वेपसन (५) | टी. नटराजन (६) | |||
मालिकावीर | हार्दिक पंड्या (भारत) |
भारत क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०२० - जानेवारी २०२१ दरम्यान ४ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका ही २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळवली गेली तर वनडे मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगअंतर्गत खेळवली गेली. भारतीय क्रिकेट मार्च २०२० मध्ये कोरोना व्हायरसमुळे बंद पडल्यानंतरची ही भारताची पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे. ॲडलेड येथील पहिली कसोटी ही दिवस/रात्र कसोटी आहे.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ ने जिंकली. ट्वेंटी२० मालिका भारताने २-१ ने जिंकली. कसोटी मालिका २-१ अशी जिंकत भारताने बॉर्डर-गावसकर चषक राखला.
सराव सामने
[संपादन]४० षटकांचा सामना: सी.के. नायडू XI वि. रणजितसिंहजी XI
[संपादन]धावफलक (इंडिया न्यूझ संकेतस्थळावरील बातमी)
२२ नोव्हेंबर २०२० रोजी सिडनी मध्ये भारतीय संघातच आंतर-संघीय सी.के. नायडू XI वि. रणजितसिंहजी XI असा ४० षटकांचा सराव सामना खेळवण्यात आला. विराट कोहलीने सी.के. नायडू XIचे नेतृत्व केले आणि लोकेश राहुलने रणजितसिंहजी XIचे नेतृत्व केले. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू सी.के. नायडू आणि रणजितसिंहजी यांच्यावरून दोन्ही संघांची नावे ठेवली गेली. लोकेश राहुलच्या नेतृत्वात असलेल्या रणजितसिंहजी XI संघाने पहिली फलंदाजी केली. शिखर धवन, मयंक अगरवाल आणि कर्णधार लोकेश राहुलच्या दमदार फलंदाजीमुळे रणजितसिंहजी XI ने ४० षटकात २३५ धावा केल्या. दुसऱ्या डावात विराट कोहलीच्या जबरदस्त अश्या ९१ धावांच्या खेळीने सी.के. नायडू XI संघाने सामना २६ चेंडू राखत जिंकला.
नोट : सामन्याचे अधिकृत धावफलक कुठेच उपलब्ध नाही. भारतीय क्रिकेट संघाच्या इंस्टाग्राम पानावरून सामन्याची माहिती मिळाली.
तीनदिवसीय सामना:ऑस्ट्रेलिया अ वि. भारत
[संपादन]
तीनदिवसीय सामना:ऑस्ट्रेलिया अ वि. भारत
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- पॅट्रीक रो (ऑ.अ.) याने प्रथम-श्रेणी पदार्पण केले.
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]
२रा सामना
[संपादन]३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- कॅमेरॉन ग्रीन (ऑ) आणि टी. नटराजन (भा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : भारत - १०, ऑस्ट्रेलिया - ०.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]
२रा सामना
[संपादन]
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- ऑस्ट्रेलियन भूमीवर भारताची पहिली दिवस/रात्र कसोटी.
- कॅमेरॉन ग्रीन (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.
- मयंक अगरवाल (भा) याच्या १,००० कसोटी धावा पूर्ण.
- पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड (ऑ) या दोघांनी अनुक्रमे १५० आणि २०० कसोटी बळी पूर्ण केले.
- दुसऱ्या डावातील ३६ ही धावसंख्या भारताची कसोटीतील सर्वात निचांकी धावसंख्या आहे. कसोटीच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले की एका डावामध्ये सर्व ११ फलंदाज दुहेरी धावसंख्येपर्यंत पोहोचु शकले नाहीत.
- कसोटी विश्वचषक गुण - ऑस्ट्रेलिया - ३०, भारत - ०.
२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- बॉक्सिंग डे कसोटी.
- मोहम्मद सिराज आणि शुभमन गिल (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- ऑस्ट्रेलियामध्ये कर्णधार म्हणून खेळली गेलेली पहिलीच कसोटी जिंकणारा अजिंक्य रहाणे हा पहिला भारतीय कर्णधार ठरला.
- सलग दोन बॉक्सिंग डे कसोटी जिंकणारा भारत पहिलाच आशियाई देश.
- २०१०च्या दशकात ऑस्ट्रेलियन बॉक्सिंग डे कसोटी जिंकणारा भारत एकमेव विदेशी देश ठरला.
- कसोटी विश्वचषक गुण - भारत - ४०, ऑस्ट्रेलिया - ०.
३री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- विल पुकोवस्की (ऑ) आणि नवदीप सैनी (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- कसोटी विश्वचषक गुण - ऑस्ट्रेलिया - १०, भारत - १०.
४थी कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- टी. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- टी. नटराजन (भा) हा भारताकडून कसोटी खेळणारा ३००वा क्रिकेट खेळाडू ठरला.
- १९८८ नंतर प्रथमच गॅब्बा वर ऑस्ट्रेलियन संघ कसोटी सामना हरला.
- गॅब्बावर भारताचा पहिला कसोटी विजय.
- ऑस्ट्रेलियात भारताने पहिल्यांदाच कसोटीमध्ये ३०० पेक्षा आधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला.
- या सामन्याच्या निकालामुळे बॉर्डर-गावसकर चषक भारताने राखला.
- कसोटी विश्वचषक गुण - भारत - ३०, ऑस्ट्रेलिया - ०.