पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७
पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७ | |||||
ऑस्ट्रेलिया | पाकिस्तान | ||||
तारीख | १५ डिसेंबर २०१६ – २६ जानेवारी २०१७ | ||||
संघनायक | स्टीव्ह स्मिथ | मिस्बाह-उल-हक (कसोटी) अझहर अली (ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | स्टीव्ह स्मिथ (४४१) | अझहर अली (४०६) | |||
सर्वाधिक बळी | जोश हेजलवूड (१५) | वहाब रियाझ (११) | |||
मालिकावीर | स्टीव्ह स्मिथ (ऑ) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डेव्हिड वॉर्नर (३६७) | बाबर आझम (२८२) | |||
सर्वाधिक बळी | मिचेल स्टार्क (९) | हसन अली (१२) | |||
मालिकावीर | डेव्हिड वॉर्नर (ऑ) |
पाकिस्तान क्रिकेट संघाने सध्या तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी डिसेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.[१][२][३] ब्रिस्बेनच्या द गब्बावरील १ली कसोटी गुलाबी चेंडूने दिवस/रात्र खेळवण्यात आली.[४] १ल्या कसोटीची पुर्वतयारी म्हणून पाकिस्तानची कियाद-ए-आझम ट्रॉफी आणि ऑस्ट्रेलियाच्या शेफिल्ड शील्ड २०१६-१७ मोसमाची पहिली फेरी दिवस/रात्र सामन्यांची खेळवली गेली.[५][६].
हा पाकिस्तानचा १७वा ऑस्ट्रेलिया दौरा होता, ह्या आधी २००९-१०च्या मोसमात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्या दौऱ्यावर पाकिस्तानला कसोटी आणि एकदिवसीय मालिकेमध्ये व्हाईटवॉश मिळाला होता तसेच एकमेव टी२० सामन्यात सुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला होता.[७] ह्याआधी दोन्ही संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये २०१४-१५च्या मोसमात आमनेसामने आले होते, त्यावेळी पाकिस्तानने कसोटी मालिका २-० अशी जिंकली परंतु ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकली.[८] ह्या आधीच्या दोन मालिका गमावून ऑस्ट्रेलियाचा संघ ह्या कसोटी मालिकेत उतरला होता – श्रीलंकेविरुद्ध परदेशी[९] आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशी.[१०] ते ह्या एकदिवसीय मालिकेमध्ये उतरतील ते, श्रीलंकेविरुद्धचा ४-१ अशा एकदिवसीय मालिका विजय,[११] आयर्लंडविरुद्ध ९ गडी राखून विजय[१२] आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध परदेशातील ५-० मालिका पराभव – एकदिवसीय मालिकेमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वच्या सर्व पाच सामन्यांमध्ये पराभूत झाला.[१३] परंतु ह्या मालिकेच्या अगदी आधी ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडला ३-० असा व्हाईटवॉश देऊन, चॅपेल-हॅडली चषक पुन्हा मिळवला.[१४]
ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-० अशी खिशात घातली. त्यांचा तिसऱ्या कसोटीमधील विजय हा त्यांचा पाकिस्तानविरुद्ध सलग १२ वा कसोटी विजय होता.[१५] ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकेमध्ये ४-१ असा विजय मिळवला[१६]
संघ
[संपादन]कसोटी | एकदिवसीय | ||
---|---|---|---|
ऑस्ट्रेलिया[१७] | पाकिस्तान[१८] | ऑस्ट्रेलिया[१९] | पाकिस्तान[२०] |
- यासिर शाहला पर्याय म्हणून पाकिस्तानी संघात मोहम्मद असघरची निवड करण्यात आली.[२१]
- पहिल्या कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये, हिल्टन कार्टराईटचा समावेश करण्यात आला.[२२]
- तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात ॲश्टन अगर आणि स्टीव्ह ओ'कीफे यांचा सामावेश करण्यात आला आणि निक मॅडिन्सनला वगळण्यात आले.[२३]
- कसोटी मालिका संपल्यानंतर पाकिस्तानच्या एकदिवसीय संघात मोहम्मद हफीजची निवड करण्यात आली.[२४]
- आईचे देहावसन झाल्याने मोहम्मद इरफान मायदेशी परतला आणि त्याची जागा जुनैद खानने घेतली.[२५]
- आईला रुग्णालयात दाखल केल्याने सरफराज अहमद सुद्धा मायदेशी परतला.[२६]
- मिचेल मार्श आणि ख्रिस लेनने दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघातून माघार घेतली, लेनची जागा पीटर हॅंड्सकॉंबने घेतली.[२७]
सराव सामना
[संपादन]तीन दिवसीयः क्रिकेट ऑस्ट्रेलिया XI वि पाकिस्तान
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तानी, फलंदाजी
- प्रथम श्रेणी पदार्पण: कॅमेरॉन व्हीटली आणि जेक विंटर (क्रिकेट ऑस्ट्रेलिया XI)
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- ऑस्ट्रेलियाच्या पीटर हॅंड्सकॉंबचे पहिले कसोटी शतक.
- पाकिस्तानची चवथ्या डावातील धावसंख्या ही कसोटी इतिहासातील चवथ्या डावातील तिसऱ्या सर्वाधिक धावसंख्येशी बरोबरी करणारी ठरली.[२८]
२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी
- पावसामुळे १ल्या दिवशी चहापान लवकर करण्यात आले आणि शेवटच्या सत्रात खेळ होऊ शकला नाही.[२९] २ऱ्या दिवशी जेवण लवकर घेण्यात आले, आणि मधल्या सत्रात खेळ होऊ शकला नाही. त्यानंतर पुन्हा आलेल्या पावसामुळे ५ः१५ वाजता खेळ थांबवण्यात आला. ३ऱ्या दिवशी पावसामुळे खेळ थोडा सकाळी उशीरा १०:३५ वाजता सुरू झाला. ४थ्या दिवशी चहापान लवकर करण्यात आले आणि शेवटच्या सत्रात खेळ होऊ शकला नाही.
- अझहर अलीच्या (पा) २०१६ मध्ये १००० कसोटी धावा पूर्ण.[३०] अलीच्या पहिल्या डावातील नाबाद २०५ धावांची खेळी ही पाकिस्तानी फलंदाजातर्फे ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठी वैयक्तिक[३१] आणि मेलबर्न क्रिकेट मैदानावरील पाहुण्या खेळाडूने केलेली दुसरी सर्वात मोठी कसोटी धावसंख्या.[३२]
- अली आणि सोहेल खानने केलेली ११८ धावांची भागीदारी ही ऑस्ट्रेलियाविरुद्धची ८व्या गड्यासाठीची सर्वोत्कृष्ट भागीदारी.[३३]
- ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावातील ६२४ धावसंख्या ही मेलबर्न क्रिकेट मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या.[३४]
- जोश हेजलवूडचे (ऑ) १०० कसोटी बळी पूर्ण.[३५]
- स्टीव्ह स्मिथच्या (ऑ) २०१६ मध्ये १००० कसोटी धावा पूर्ण.[३६]
३री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: हिल्टन कार्टराईट (ऑ) आणि शर्जील खान (पा).
- स्टीव्ह स्मिथचा (ऑ) ५०वा कसोटी सामना.[३७]
- पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणाच्या वेळे आधी शतक करणारा डेव्हिड वॉर्नर (ऑ) हा पाचवा फलंदाज आणि ऑस्ट्रेलियामध्ये तसे करणारा तो पहिलाच खेळाडू.[३८]
- वॉर्नरचे ७८ चेंडूंतील शतक हे सिडनी क्रिकेट मैदानावरील दुसरे सर्वात जलद शतक आणि पाकिस्तान विरुद्ध सर्वात जलद शतक.[३८]
- सरफराज अहमदचा (पा) यष्टिरक्षक म्हणून १००वा कसोटी बळी.[३९]
- मॅट रेनशॉचे (ऑ) पहिले कसोटी शतक.[४०]
- कसोटी क्रिकेटचे सामने आयोजित करणाऱ्या सर्वच्या सर्व ११ देशांमध्ये शतक झळकावणारा युनिस खान (पा) हा पहिलाच क्रिकेट खेळाडू ठरला.[४१]
- दुसऱ्या डावातील वॉर्नची २३ चेंडूतील अर्धशतक हे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजातर्फे सर्वात जलद अर्धशतक आणि एकूण दुसरे सर्वात जलद अर्धशतक.[४२]
- पाकिस्तानचा हा ऑस्ट्रेलियामधील कसोटीमालिकेतील सलग ४था व्हाईटवॉश आणि ६वा सलग पराभव.[४३]
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: ख्रिस लेन आणि बिली स्टॅनलेक (ऑ)
- मॅथ्यू वेडचे (ऑ) पहिले एकदिवसीय शतक.[४४]
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- अझहर अलीला झालेल्या दुखापतीमुळे मोहम्मद हफीझचा (पा) कर्णधार म्हणून पहिला एकदिवसीय सामना.[४५]
- जानेवारी २०१५ नंतर पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानचा कोणत्याही प्रकारात पहिला सामना विजय.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: पीटर हॅंड्सकॉंब (ऑ)
- बाबर आझमची (पा) सर्वात जलद १००० एकदिवसीय धावा पूर्ण करण्याच्या विक्रमाशी बरोबरी (२१ डावांत).
४था सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
५वा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- ट्रॅव्हिस हेडचे (ऑ) पहिले एकदिवसीय शतक[४६]
- डेव्हिड वॉर्नरच्या (ऑ) १७९ धावा ही त्याची सर्वोत्कृष्ट एकदिवसीय कामगिरी. तसेच एकदिवसीय इतिहासात सर्वात जास्त वेळा १५० पेक्षा जास्त धावा करण्याच्या विक्रमाशी बरोबरी (५ वेळा).[४७]
- ट्रेव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर यांची २८४ धावांची भागीदारी ही दुसरी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय सलामी तर ऑस्ट्रेलियासाठी कोणत्याही गड्यासाठीची सर्वोत्कृष्ट भागीदारी[४७]
- षटकांची गती कमी राखल्याने पाकिस्तानी कर्णधार अझहर अलीवर एका सामन्याची बंदी आणि सामन्याच्या मानधनाच्या ४०% दंड ठोठावण्यात आला. तसेच संपूर्ण संघाला सामन्याच्या मानधनाच्या २०% दंड ठोठावण्यात आला.[४७]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "क्रिकेट वेळापत्रक २०१६: नवीन वर्षातील सर्व प्रमुख मालिकांचे सामने आणि तारखा". इंटरनॅशनल बिझनेस टाइम्स (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट ऑस्ट्रेलियातर्फे २०१६-१७ उन्हाळी वेळापत्रक जाहीर". सिडनी मॉर्निंग हेराल्ड (इंग्रजी भाषेत). २० एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
- ^ "२०१६-१७ उन्हाळी हंगामाची धडाक्यात सुरवात करण्यासाठी चार देश सज्ज". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). २० एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ॲडलेड कसोटीच्या अनिश्चिततेमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तान विरुद्धची गब्बावरील कसोटी दिवस-रात्र खेळवण्याचे जाहीर". एबीसी (इंग्रजी भाषेत). २० एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
- ^ "आगामी मोसमात १० प्रथम-श्रेणी सामने दिवस-रात्र खेळवण्यास पीसीबीची परवानगी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ जून २०१६ रोजी पाहिले.
- ^ "शेफिल्ड शील्डचे वेळापत्रक जाहीर". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). १९ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान, २००९/१०" (इंग्रजी भाषेत). २ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान, २०१४/१५" (इंग्रजी भाषेत). २ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "वॉर्न-मुरलीधरन चषक, २०१६" (इंग्रजी भाषेत). २ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाची ऑस्ट्रेलिया मधील कसोटी मालिका, २०१६-१७" (इंग्रजी भाषेत). २ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "Australia in Sri Lanka ODI Series 2016" (इंग्रजी भाषेत). २ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा, एकमेव आं.ए.दि.सामना: ऑस्ट्रेलिया वि आयर्लंड, बेनोनी, २७ सप्टेंबर २०१६" (इंग्रजी भाषेत). २ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ मुंडा, फिर्दोस. "बोलिंग वूज ग्रिप ऑस्ट्रेलिया ॲज व्हाईटवॉश लूम्स" (इंग्रजी भाषेत). २ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलिया दौरा२०१६/१७" (इंग्रजी भाषेत). २ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "हेजलवूड रॅप्स अप ३-० व्हाईटवॉश". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "४-१ पराभवानंतर अझहर अलीचे कर्णधारपद जाण्याची शक्यता". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "मार्श डाऊट्स लीव्ह ऑस्ट्रेलिया अनचेंज्ड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानी संघात बदल नाही". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "नवोदित लेन आणि स्टॅनलेक ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तानच्या कर्णधारपदी अझहर अलीची पुनर्निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "यासिर शाहला पर्याय म्हणून पाकिस्तानी संघात मोहम्मद असघर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बॉक्सिंग डे कसोटी संघामध्ये कार्टराईटचा समावेश". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियाने ओ'कीफे आणि अगरला बोलावले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानच्या एकदिवसीय संघात हफीजची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आईच्या मृत्युमुळे इरफान मायदेशी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "सरफराज अहमद मायदेशी परतणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारत दौर्याआधी खांद्यामुळे मिचेल मार्श बाजूला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ नोंदी/ कसोटी सामने / सांघिक नोंदी / चवथ्या डावातील सर्वाधिक धावा
- ^ "बर्डच्या दुहेरी धक्क्यानंतर पावसामुळे खेळ स्थगित". क्रिकेट.कॉम (इंग्रजी भाषेत). २७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "अझहर अलीचे १२वे शतक, २०१६ मध्ये बॉक्सिंग डे कसोटी दरम्यान १,००० धावा पूर्ण". क्रिकेटकंट्री.कॉम (इंग्रजी भाषेत). २७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "आकडेवारी/ स्टॅट्सगुरू / कसोटी सामने / फलंदाजीतील विक्रम". २८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "आकडेवारी/ स्टॅट्सगुरू / कसोटी सामने / फलंदाजीतील विक्रम". २८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "आकडेवारी/ स्टॅट्सगुरू / कसोटी सामने / भागीदारी विक्रम". २८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "अ रेअर डबल-टन दॅट एन्डेड इन डिफीट" (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "वॉर्नर आणि ख्वाजातर्फे ऑस्ट्रेलियाचे दमदार प्रत्युत्तर" (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "स्मिथ'स अफेयर विथ बॉक्सिंग डे टेस्ट" (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ कव्हरडेल, ब्रेडन. "स्टीव्हन स्मिथ'स एक्स्ट्राऑर्डिनरी ५०" (इंग्रजी भाषेत). ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b सीर्वी, भरत. "पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणाच्या वेळे आधी शतक करणारा वॉर्नर फक्त पाचवा" (इंग्रजी भाषेत). ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ शर्मा, मनूज. "रेनशॉ, वॉर्नरच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाला सिडनी कसोटीमध्ये चांगली सुरवात" (इंग्रजी भाषेत). ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ ब्रेटिग, डॅनिएल. "रेनशॉ आणि वॉर्नरचा दिवस" (इंग्रजी भाषेत). ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ सीर्वी, भरत. "युनिस कम्प्लिट युनिक सेट" (इंग्रजी भाषेत). ६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "नोंदी / कसोटी सामने / फलंदाजीतील नोंदी / जलद अर्धशतके" (इंग्रजी भाषेत). ७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया १२, पाकिस्तान ०: व्हाईटवॉश आवृत्ती" (इंग्रजी भाषेत). ७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ ब्रेट्टीग, डॅनिएल. "वेड, फॉकनर कम्प्लिट ऑस्ट्रेलियाज टर्नअराउंड विन" (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ कव्हरडेल, ब्रेडन. "अझहर रुल्ड आऊट ॲज पाकिस्तान सीक एमसीजी रिबाउंड" (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ कव्हरडेल, ब्रेडन. "वॉर्नर, हेडच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाची ३६९ धावांपर्यंत मजल" (इंग्रजी भाषेत). २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b c सुंदररमन, गौरव. "एकदिवसीय क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्कृष्ट भागीदार्या" (इंग्रजी भाषेत). २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "Warner150" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे