न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८२-८३
Appearance
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८२-८३ | |||||
ऑस्ट्रेलिया | न्यू झीलंड | ||||
तारीख | १७ मार्च १९८३ | ||||
संघनायक | किम ह्युस | जॉफ हॉवर्थ | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने मार्च १९८३ मध्ये एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. जानेवारी १९८३ मध्येच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडबरोबर तिरंगी मालिकेत न्यू झीलंडने भाग घेतला होता, ज्यात ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात न्यू झीलंडचा पराभव करत चषक जिंकला होता.
एक महिन्याने न्यू झीलंड संघ १९८३ साली ऑस्ट्रेलियात जंगलाला लागलेली आग आणि त्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एकमेव एकदिवसीय सामना आयोजित केला होता. त्यातून मिळणारे उत्पन्न निसर्ग संवर्धनासाठी वापरण्यात आले. सिडनीतील सिडनी क्रिकेट मैदान येथे एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविला गेला. न्यू झीलंडने सामना १४ धावांनी जिंकला.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]एकमेव एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- ३५ षटकांचा सामना
- माइक व्हिटनी (ऑ) आणि ट्रेव्हर फ्रँकलिन (न्यू) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.