दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२०-२१
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२०-२१ | |||||
पाकिस्तान | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | २६ जानेवारी – १४ फेब्रुवारी २०२१ | ||||
संघनायक | बाबर आझम | क्विंटन डी कॉक (कसोटी) हेन्रीच क्लासेन (ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | फहीम अशरफ (१७१) | एडन मार्करम (२२७) | |||
सर्वाधिक बळी | हसन अली (१२) | केशव महाराज (१०) | |||
मालिकावीर | मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोहम्मद रिझवान (१९७) | डेव्हिड मिलर (११६) | |||
सर्वाधिक बळी | उस्मान कादिर (४) | ड्वेन प्रिटोरियस (६) तबरैझ शम्सी (६) |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा याच्याअंतर्गत खेळवली गेली. दक्षिण आफ्रिकेने तब्बल १४ वर्षांनंतर पाकिस्तानचा दौरा केला. याआधी दक्षिण आफ्रिकेने २००७-०८ च्या मोसमात पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर या दौऱ्यापर्यंत दोन्ही संघ संयुक्त अरब अमिरातीत द्विपक्षीय मालिका खेळायचे.
डिसेंबर २०२० मध्ये क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने संघ पाकिस्तानचा दौरा करणार याची पुष्टी केली. दक्षिण आफ्रिका संघ निवडसमितीने क्विंटन डी कॉकला कसोटी कर्णधार केले तर ट्वेंटी२० मालिकेसाठी हेन्रीच क्लासेनला कर्णधार केले गेले. दौऱ्यातील पहिली कसोटी कराचीमध्ये, दुसरी कसोटी रावळपिंडीत तर तिन्ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने लाहोर येथे होतील असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जाहीर केले.
पाकिस्तानने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. ऑक्टोबर २००३ नंतर पाकिस्तानने प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेत पाकिस्तानने २-१ असा विजय मिळवला.
२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- नौमन अली आणि इम्रान बट (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- कसोटी विश्वचषक गुण - पाकिस्तान - ६०, दक्षिण आफ्रिका - ०.
२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- पावसामुळे पहिल्या दिवशी शेवटच्या सत्रात खेळ होऊ शकला नाही.
- कसोटी विश्वचषक गुण - पाकिस्तान - ६०, दक्षिण आफ्रिका - ०.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- जॅक्स स्नायमन (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- पाकिस्तानी भूमीवर दक्षिण आफ्रिकेने पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- ग्लेंटन स्टूरमन (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.