बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२०-२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२०-२१
न्यू झीलंड
बांगलादेश
तारीख २० मार्च – १ एप्रिल २०२१
संघनायक टॉम लॅथम तमिम इक्बाल (ए.दि.)
महमुद्दुला (१ली,२री ट्वेंटी२०)
लिटन दास (३री ट्वेंटी२०)
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा डेव्हन कॉन्वे (२२५) महमुद्दुला (११९)
सर्वाधिक बळी जेम्स नीशम (७) रूबेल होसेन (३)
मुस्तफिझुर रहमान (३)
मालिकावीर डेव्हन कॉन्वे (न्यू झीलंड)
२०-२० मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा डेव्हन कॉन्वे (१०७) मोहम्मद नयीम (८४)
सर्वाधिक बळी टिम साउदी (६) महेदी हसन (४)
मालिकावीर ग्लेन फिलिप्स (न्यू झीलंड)

बांगलादेश क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल २०२१ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. वेळापत्रकानुसार हा दौरा ऑक्टोबर २०२० मध्येच होणार होता परंतु त्यावेळेस कोरोनाव्हायरस ह्या साथीच्या रोगाच्या संक्रमणामुळे दौरा पुढे ढकलण्यात आला होता. २९ सप्टेंबर २०२० रोजी न्यू झीलंड क्रिकेट बोर्डाने दौरा मार्च २०२१ मध्ये होईल असे जाहीर केले. दुसऱ्या दिवशी वेळापत्रक जाहीर केले गेले. ट्वेंटी२० सामने हे न्यू झीलंड महिला संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी२० सामन्यांबरोबरच त्याच मैदानात काही तासांच्या अंतराने होणार आहेत. एकदिवसीय मालिका ही २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली.

एकदिवसीय मालिकेआधी दुखापत झाल्याने न्यू झीलंडचा नियमीत कर्णधार केन विल्यमसन हा एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला. त्याच्याजागी टॉम लॅथमकडे न्यू झीलंडचे कर्णधारपद देण्यात आले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने ३-० ने जिंकली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका देखील न्यू झीलंडने ३-० ने जिंकली.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

बांगलादेश Flag of बांगलादेश
१३१ (४१.५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३२/२ (२१.२ षटके)
महमुद्दुला २७ (५४)
ट्रेंट बोल्ट ४/२७ (८.५ षटके)
न्यू झीलंड ८ गडी राखून विजयी.
युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन
सामनावीर: ट्रेंट बोल्ट (न्यू झीलंड)


२रा सामना[संपादन]

बांगलादेश Flag of बांगलादेश
२७१/६ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२७५/५ (४८.२ षटके)
तमिम इक्बाल ७८ (१०८)
मिचेल सँटनर २/५१ (१० षटके)
टॉम लॅथम ११०* (१०८)
महेदी हसन २/४२ (१० षटके)
न्यू झीलंड ५ गडी राखून विजयी.
हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च
सामनावीर: टॉम लॅथम (न्यू झीलंड)


३रा सामना[संपादन]

न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
३१८/६ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१५४ (४२.४ षटके)
डेव्हन कॉन्वे १२६ (११०)
रूबेल होसेन ३/७० (१० षटके)
महमुद्दुला ७६* (७३)
जेम्स नीशम ५/२७ (७.४ षटके)
न्यू झीलंड १६४ धावांनी विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना[संपादन]

१ला सामना[संपादन]

२८ मार्च २०२१
१४:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२१०/३ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४४/८ (२० षटके)
डेव्हन कॉन्वे ९२* (५२)
नसुम अहमद २/३० (४ षटके)
अफीफ हुसैन ४५ (३३)
इश सोधी ४/२८ (४ षटके)
न्यू झीलंड ६६ धावांनी विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
सामनावीर: डेव्हन कॉन्वे (न्यू झीलंड)


२रा सामना[संपादन]

३० मार्च २०२१
१९:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१७३/५ (१७.५ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४२/७ (१६ षटके)
ग्लेन फिलिप्स ५८* (३१)
महेदी हसन २/४५ (४ षटके)
सौम्य सरकार ५१ (२७)
टिम साउदी २/२१ (४ षटके)
न्यू झीलंड २८ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
मॅकलीन पार्क, नेपियर
सामनावीर: ग्लेन फिलिप्स (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे बांगलादेशला १६ षटकांत १७० धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.


३रा सामना[संपादन]

१ एप्रिल २०२१
१९:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१४१/४ (१० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
७६ (९.३ षटके)
फिन ॲलन ७१ (२९)
शोरिफुल इस्लाम १/२१ (२ षटके)
मोहम्मद नयीम १९ (१३)
टॉड ॲस्टल ४/१३ (२ षटके)
न्यू झीलंड ६५ धावांनी विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: फिन ॲलन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १०-१० षटकांचा करण्यात आला.