पाकिस्तान क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९९० दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने १-० अशी जिंकली. कसोटी मालिकेबरोबरच पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला. तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला २-० ने पराभव पत्करावा लागला.