१९८५ बेन्सन आणि हेजेस विश्व अजिंक्यपद चषक
१९८५ बेन्सन आणि हेजेस विश्व अजिंक्यपद चषक | |
---|---|
तारीख | १७ फेब्रुवारी – १० मार्च १९८५ |
व्यवस्थापक | क्रिकेट ऑस्ट्रेलिया |
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (५० षटके) |
स्पर्धा प्रकार | साखळी फेरी आणि बाद फेरी |
यजमान | ऑस्ट्रेलिया |
विजेते | भारत |
सहभाग | ७ |
सामने | १३ |
मालिकावीर | रवि शास्त्री |
सर्वात जास्त धावा | कृष्णम्माचारी श्रीकांत (२३८) |
सर्वात जास्त बळी | लक्ष्मण शिवरामकृष्णन (१०) |
१९८५ बेन्सन आणि हेजेस विश्व अजिंक्यपद चषक ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाद्वारे आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. ही स्पर्धा १७ फेब्रुवारी ते १० मार्च १९८५ दरम्यान ऑस्ट्रेलियात झाली.
ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया प्रांतात युरोपीय वसाहत स्थापनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही स्पर्धा भरविण्यात आली होती. तत्कालिन सर्व कसोटी देश (तेव्हा वर्णभेदाच्या मुद्द्यावरून बहिष्कार असल्याने दक्षिण आफ्रिका वगळता) उर्वरीत सात संपूर्ण सदस्य देश : यजमान ऑस्ट्रेलियासह, न्यू झीलंड, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेतील सामने हे मेलबर्न क्रिकेट मैदान आणि सिडनी क्रिकेट मैदान या दोन ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना प्रकाशझोतात खेळविण्यात आला. सर्व सामने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (५० षटके) ह्या पद्धतीने खेळले गेले.
१० मार्च १९८५ रोजी मेलबर्न येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८ गडी राखत पराभव करत ही एकमेव स्पर्धा जिंकली. यानंतर पुन्हा ही स्पर्धा भरविण्यात आली नाही. भारताच्या रवि शास्त्रीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारताच्याच कृष्णम्माचारी श्रीकांत याने सर्वाधिक २३८ धावा केल्या तर लक्ष्मण शिवरामकृष्णन याने सर्वाधिक १० गडी बाद केले.
स्पर्धा प्रकार
[संपादन]संघांना दोन गटात विभागले गेले. पहिल्या गटात ४ संघ तर दुसऱ्या गटात ३ संघ. गट फेरीच्या शेवटी गुणफलकातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. पराभूत उपांत्य संघ ३रे स्थान निश्चित करण्यासाठी अंतिम सामन्याच्या आदल्या दिवशी खेळले.
गट फेरी
[संपादन]गट अ
[संपादन]संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
भारत | ३ | ३ | ० | ० | ० | ६ | ४.४२० | बाद फेरीत बढती |
पाकिस्तान | ३ | २ | १ | ० | ० | ४ | ४.३९० | |
ऑस्ट्रेलिया | ३ | १ | २ | ० | ० | २ | ३.९८० | |
इंग्लंड | ३ | ० | ३ | ० | ० | ० | ३.४१० |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- लक्ष्मण शिवरामकृष्णन (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
गट ब
[संपादन]संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
वेस्ट इंडीज | २ | १ | ० | ० | १ | ३ | ५.८७० | बाद फेरीत बढती |
न्यूझीलंड | २ | १ | ० | ० | १ | ३ | ४.०७० | |
श्रीलंका | २ | ० | २ | ० | ० | ० | ३.१६० |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- पावसामुळे नियोजित दिवशी स्थगित करण्यात आला. परंतु राखीव दिवशी (२० नोव्हेंबर रोजी) दूरचित्रवाणीवरून सामन्याच्या प्रक्षेपणाच्या मुद्द्यावरून चालु झालेल्या निदर्शनांमुळे उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आला.
बाद फेरी
[संपादन]१ला उपांत्य सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
२रा उपांत्य सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
३ऱ्या स्थानाकरता सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
अंतिम सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.