वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९६० - फेब्रुवारी १९६१ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेपासूनच वेस्ट इंडीज-ऑस्ट्रेलिया मध्ये खेळविण्यात येणाऱ्या कसोटी मालिकांना फ्रँक वॉरेल चषक असे नाव देण्यात आले. तसेच ह्या मालिकेतच बरोबरीत सुटलेला (टाय झालेला) जगातला पहिला कसोटी सामना बघायला मिळाला.