इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७०-७१
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७०-७१ | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | २७ नोव्हेंबर १९७० – १६ फेब्रुवारी १९७१ | ||||
संघनायक | बिल लॉरी (१ली-६वी कसोटी, ए.दि.) इयान चॅपल (७वी कसोटी) |
रे इलिंगवर्थ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ७-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | कीथ स्टॅकपोल (६२७) | जॉफ बॉयकॉट (६५७) | |||
सर्वाधिक बळी | जॉन ग्लीसन (१४) | जॉन स्नो (३१) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९७० - फेब्रुवारी १९७१ दरम्यान द ॲशेसअंतर्गत सात कसोटी सामने आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ॲशेस (कसोटी) मालिका इंग्लंडने २-० अशी बरोबरीत जिंकली.
ह्या दौऱ्यामध्ये मेलबर्न क्रिकेट मैदानावर नियोजित तिसरी कसोटी पावसामुळे पहिले ४ दिवस खेळवताच आली नाही. त्यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डांनी शेवटच्या दिवशी वातावरण चांगले असल्या कारणाने ४० षटकांचा सामना ५ जानेवारी १९७१ रोजी मेलबर्नमध्येच आयोजित करण्यात आला. तत्कालिन आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी त्या सामन्याला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा दिला. ऑस्ट्रेलियाने जगातला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना ५ गडी राखून जिंकला. अशाप्रकारे क्रिकेटमधील एका नवीन युगाला सुरुवात झाली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ॲलन थॉमसन, रॉडनी मार्श, टेरी जेनर (ऑ), ब्रायन लकहर्स्ट आणि केन शटलवर्थ (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- ग्रेग चॅपल (ऑ) आणि पीटर लीव्हर (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
३री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: नाणेफेक नाही.
- पावसामुळे सामना रद्द.
४थी कसोटी
[संपादन]५वी कसोटी
[संपादन]६वी कसोटी
[संपादन]७वी कसोटी
[संपादन]आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]एकमेव एकदिवसीय सामना
[संपादन] ५ जानेवारी १९७१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- जगातला पहिला तसेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही देशांचाही पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- ऑस्ट्रेलियन भूमीवर खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- ऑस्ट्रेलियन भूमीवर इंग्लंडचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- जगातली पहिली कसोटी आणि जगातला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना जिंकण्याचा पराक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर.
- ग्रेग चॅपल, इयान चॅपल, ॲलन कॉनोली, बिल लॉरी, गार्थ मॅकेन्झी, ॲशली मॅलेट, रॉडनी मार्श, इयान रेडपाथ, कीथ स्टॅकपोल, ॲलन थॉमसन, डग वॉल्टर्स (ऑ), जॉफ बॉयकॉट, कॉलिन काउड्री, बेसिल डि'ऑलिव्हेरा, जॉन एडरिच, कीथ फ्लेचर, जॉन हॅम्पशायर, रे इलिंगवर्थ, ॲलन नॉट, पीटर लीव्हर, केन शटलवर्थ आणि जॉन स्नो (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.