अजिंक्य रहाणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अजिंक्य रहाणे
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव अजिंक्य मधुकर रहाणे
जन्म ६ जून, १९८८ (1988-06-06) (वय: ३५)
मु.पो आश्र्वी खुर्द संगमनेर शहर महाराष्ट्र,भारत
उंची ५ फु ६ इं (१.६८ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यमवेगी
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. २७
२०-२० शर्ट क्र. २७
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००७– मुंबई
२००८–२०१० मुंबई इंडियन्स
२०११– राजस्थान रॉयल्स
कारकिर्दी माहिती
ए.सा.टि२०कसोटीप्र.श्रे.
सामने ६३ १३ २२ ८६
धावा १९५२ २७३ १६१९ ७४३६
फलंदाजीची सरासरी ३२.५३ २१.०० ४४.९७ ५६.७६
शतके/अर्धशतके २/१३ ०/१ ६/७ २६/३१
सर्वोच्च धावसंख्या १११ ६१ १४७ २६५*
चेंडू १०८
बळी
गोलंदाजीची सरासरी
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी
झेल/यष्टीचीत ३५/– १२/– २७/– ८२/–

५ जानेवारी, इ.स. २०१६
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)

अजिंक्य मधुकर रहाणे ( ६ जून, इ.स. १९८८) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तो भारतीय क्रिकेट संघामध्ये मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळतो. कसोटी सामन्यांमध्ये त्याने भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे.

इ.स. २००७-०८ हंगामामध्ये रहाणेने प्रथम श्रेणीतील स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यास प्रारंभ केला. प्रथम श्रेणीतील १०० डाव खेळला तेव्हा त्याच्या धावांची सरासरी ६२.०४ होती. रहाणेने पहिल्या ५ हंगामांमध्ये तीन वेळा १००० पेक्षा अधिक धावा केल्या. ऑगस्ट इ.स. २०११ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध भारताकडून मॅंचेस्टर येथे टी२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळून पदार्पण केले. मार्च इ.स. २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील सामन्याद्वारे रहाणेने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले [१]. न्यू झीलंडमधील बेसिन रिजर्व, वेलिंग्टन येथे त्याने पहिले कसोटी शतक झळकावले.

प्रारंभिक जीवन[संपादन]

अजिंक्य रहाणे याचा जन्म ६ जून १९८८ रोजी आश्वी खुर्द, जिल्हा अहमदनगर (महाराष्ट्र) येथे झाला. संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी या खेड्यात राहणारे मराठा श्री मधुकर बाबुराव रहाणे व सुजाता रहाणे हे त्याचे आई – वडील! त्याला शशांक हा एक लहान भाऊ आणि अपूर्वा ही एक लहान बहीण आहे. जेव्हा रहाणे ७ वर्षाचा होता तेव्हा त्याचे वडील त्याला डोंबिवली येथे मॅट विकेट वरील प्रशिक्षणासाठी घेऊन गेले होते. पण तेथे त्याला योग्य प्रशिक्षण मिळाले नाही. माजी भारतीय कसोटी पटू प्रवीण आमरे यांचेकडे त्याने वयाच्या १७ वर्षापर्यंत प्रशिक्षण घेतले.

क्रिकेट कारकीर्दीस सुरुवात[संपादन]

इ.स. २००७-०८ हंगामामध्ये रहाणेने प्रथम श्रेणीतील स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यास प्रारंभ केला. प्रथम श्रेणीतील १०० डाव खेळला तेव्हा त्याच्या धावांची सरासरी ६२.०४ होती. रहाणेने पहिल्या ५ हंगामांमध्ये तीन वेळा १००० पेक्षा अधिक धावा केल्या.

सन २००७ मध्ये १९ वर्षाखालील संघातून न्यू झीलंड मध्ये खेळताना त्याने दोन शतके झळकावली. त्याची ही किमया निवड समितीला आकर्षित करून गेली आणि त्यांनी त्याची पाकिस्तानातील मोहम्मद निस्सार ट्रॉफी साठी निवड केली. तो कराचीत त्यापूर्वी प्रथम वर्गीय क्रिकेट खेळलेला न्हवता.

२००७-२००८ चे सीझन मध्ये मुंबई कडून रणजी ट्रॉफी साठी पदार्पण केले. त्यानंतर वेस्ट झोन मधून खेळताना त्याच्या इंग्लंड लिओन्स विरुद्धच्या १७२ धावां केल्याने तो आकर्षला गेला. त्या धावा तर ग्राहम अनियन्स, मॉन्टी पानेसर, स्टीव किरबी आणि लियम प्लनकिट्ट या गोलंदाज्यांच्या समोरील होत्या.

सन २००८-०९ या दुसऱ्या रणजी सीझन मध्ये त्याने १०८९ धावा केल्या आणि त्यामुळे मुंबई संघ ३ ८ व्यांदा जिंकला. त्याचा निवड समितीला आकर्षित करण्याचा सपाटाच होता. सन २००९-१० मध्ये अंतरदेशीय क्रिकेट मध्ये ३ आणि २०१०-११ या रणजी सीझन मध्ये ३ शतके झळंकावली. हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतराष्ट्रीय मैदानावर मुंबई संघासाठी क्रमांक ३ वर फलंदाजीसाठी येऊन हैदराबाद संघाविरुद्ध २६५ धावांचा अत्युच्य नॉट आऊट स्कोर त्याने केला आहे.[२] सन २०११ मध्ये राजस्थान विरुद्ध इराणी कप खेळताना त्याने १५२ धावा केल्या आणि त्यामुळे निवड समितीला त्या खेळाचे आकर्षण होऊन त्याची भारतीय संघात टेस्ट साठी निवड झाली.

कसोटी कारकीर्द[संपादन]

मार्च इ.स. २०१३ मध्ये शिखर धवनच्या बोटाला इजा झाल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील सामन्याद्वारे रहाणेने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले [१]. न्यू झीलंडमधील बेसिन रिजर्व, वेलिंग्टन येथे त्याने पहिले कसोटी शतक झळकावले.

साऊथ आफ्रिकेत दरबान येथे सन २०१३ -१४ मध्ये त्याने फलंदाजीसाठी तळाच्या क्रमांकाला येऊन २०९ धावा करून ६९.६६ सरासरी राखली. त्या सेरीज मध्ये त्याने डेल स्टेन, मोरने मोरकल, व्ही.फिल्यांडर यांचा तेज गोलंदाजी मारा थोपवत अनुक्रमे ९६ व १५७ धावांची भर घातली. या सेरीज मध्ये तो भारताच्या फलंदाजात तिसऱ्या क्रमांकाचा धावा करणारा फलंदाज ठरला.[३]

सन २०१४ मध्ये इंग्लंड मध्ये झालेल्या सेरीज मध्ये चहा पानापर्यंत लॉर्डस वर भारताची १४० धावाला ६ बाद असी अवस्था होती. ती त्याने भुवनेशकुमारच्या ३ ६ धावांच्या साथीने फलकावर शतक झळंकाऊन दोघांचे ९० धावांचे भागीदारीने सावरली. लॉर्डस वर शतक झळकाउन तो अगोदरच्या शतक झळंकाविलेल्या सौरव गांगुली, दिलीप वेंगसरकर, अजित आगरकर यांच्या पंगतीत जाऊन बसला.[४]

सन २०१४-१५ मध्ये झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाचे मेलबोर्ण येथील तिसऱ्या टेस्ट मध्ये मिचेल जॉनसन व ऱ्यान हॅरिस यांच्या गोलंदाजीचा मुकाबला करत एक शतक आणि तीन अर्धं शतके ठोकून ३ ९९ धावा केल्या.

सन २०१५ मध्ये श्री लंकेत पहिली टेस्ट खेळताना आठ चेंडू कॅच करून त्याने विश्व विक्रम प्रस्थापित केला. कोलंबो येथील टेस्ट मध्ये दुसऱ्या डावात चौथे शतक ठोकले, त्यात १२६ धावा केल्या. भारताने ही टेस्ट जिंकली. ICC चे क्रमवारीत हा २० व्या वरच्या क्रमांकावर पोहचला.

सन २०१५ चे न्यू दिल्ली येथील फ्रिडम सेरीज मध्ये याने दोन्ही डावात शतक झळं कावली की जेथे फलंदाज फलंदाजी करताना आडखळत होते. यामुळे रहाणे एका मॅच मध्ये दोन सेंचुरी करणारांच्या एलिट क्लब मध्ये सामील झाला. त्यापूर्वीचे कै. विजय हजारे (एकदा), सुनील गावस्कर(तीन वेळा), राहुल द्रवीड(दोन वेळा), विराट कोहली(एकदा) या भारतीय क्रिकेट पटूणी ही क्रांति केलेली आहे.[५]

एक दिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्द[संपादन]

सन २०११ मध्ये विरेन्द्र सहवागचे जागेवर इंग्लंड मध्ये याने ओ.डी.आय. मध्ये पदार्पण केले. तेथे जरी त्याने ४० धावा केल्या तरी त्याची सरासरी ९०.९० होती. आणि भारताचा तेथील तो पहीला विजय होता. याच वर्षी ऑस्ट्रेलियातील इमरजिंग प्लेयर्सच्या टूर्नामेंट मध्ये त्याने दोन शतके ठोकली.[६]

सन २०१५ मध्ये झिम्बाब्वे ओ.डी.आय. टूर साठी संघणायक म्हणून निवड झाली. त्या ठिकाणी त्याची समाधानकारक फलंदाजी झाली न्हवती तरी भारताने ती सेरीज ३ -० असी जिंकली.

टी-२० कारकीर्द[संपादन]

ऑगस्ट २०११ मध्ये तो राहुल द्रविडच्या संघातून पहिली मॅच खेळला तेव्हा त्याने इंग्लंड विरुद्ध खेळताना ६१ व ४९ धावा केल्या. सन २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियात खेळताना त्याला पहिल्या ३ मॅच खेळवले नाही पण पुढच्या मॅच मध्ये त्याने ३२ धावा करून भारताला चांगली सुरुवात करून दिली आणि ती मॅच भारताने जिंकली. भारतात साऊथ आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्याने ५ मॅचचे सेरीज मध्ये ३ अर्ध शतके ठोकली त्यात अतिशय जलद ८९ धावांचा समावेश होता. त्यावेळी त्याने एकूण ४३८ धावा जमविल्या.

आयपीएल कारकीर्द[संपादन]

रहाणे आयपीएल मुंबई इंडियन्स संघातून खेळत होता. तेथे त्याला हवे तेवढे खेळवले नाही. वॉटसन ने त्याला सन २०१० मध्ये ऑस्ट्रेलिया मध्ये खेळताना पाहीले होते. त्याचा खेळ पाहून त्याने आणि राहुल द्रविडने त्याला राजस्थान रोयल संघात घेतले आणि त्याला ओपनिंग साठी तयार केले. त्याने त्याचे चीज केले पण हा पट्ट्या सर्व श्रेय राहुल द्रविडला देतो.

सन २०१२ मध्ये किंग’ज ११ पंजाब विरुद्ध ९८, RCB विरुद्ध १०३ , दिल्ली D विरुद्ध ६३ चेंडूवर ८४ धावा, असा कायम धावा जमविण्याचा चढता क्रम होता.तो नंतर 2019 पर्यंत राजस्थान रॉंयल्स या संघाकडून खेळत आहे.

खेळण्याची पद्धत[संपादन]

त्याची फलंदाजी पद्दत राहुल द्रविड व व्ही.व्ही.एस लक्ष्मण सारखी आहे असे वाटते. ऑस्ट्रेलिया चे स्टीव्ह वॉ म्हणतात त्याच्यात सचिन तेंडुलकरची एकाग्रता, चेंडूला सामोरे जाण्याची पद्दत, वातावरण, या बाबी सामावलेल्या आहेत. रहाणे टेस्ट आणि ODI साठी मिडल ऑर्डर आणि T२० साठी ओपनिंगला खेळतो. बऱ्याच वेळा “भारतीय क्रिकेटचा उगवता तारा”असी त्याची ओळख केली जाते. सर्व प्रकारचे गोलंदाजांना खेळण्याची रहाणेत ताकद आहे आणि तो सर्व परिस्थितीत ताबडतोब स्वतःला सामावून उत्तम खेळ करू शकतो असे विराट कोहली म्हणतो.

रहाणे हा अतिशय उत्कृष्ट फिल्डर आहे. सर्व सहकारी क्रिकेट खेळाडू त्याला अजु किंवा जिंक्स या निकनेम ने बोलावतात.

वैयक्तिक जीवन[संपादन]

रहाणेने डोंबिवली येथील एस.व्ही.जोशी हाय स्कूल मधून एस.एस.सी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. २६ सप्टेंबर २०१४ रोजी राधिका धोपवकर हिच्याशी त्याचे मुंबईमध्ये लग्न झाले. त्याचा प्रेम विवाह आहे.

पुरस्कार[संपादन]

मे २०१६ मध्ये बीसीसीआयने रहाणेची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली.[७]

सारांश[संपादन]

तपशील टेस्ट ओ.डी.आय. एफ.सी. एल.ए.
एकूण मॅच २२ ६६ ८६ १२५
एकूण धावा १६१९ २०९१ ७४३ ६ ४२०५
बॅटिंग सरासरी ४४.९७ ३ ३ .७२ ५६.७६ ३ ५.३ ३
१००s/५०s ०६/०७/१६ २/१५ २६/३ १ ६/२७
टॉप स्कोअर १८८ १११ २६५* १८७
बोल्ल्स बोल्ड - २४३ ३ १०८ ४२
विकेट्स - -
बेस्ट बोलिंग - - - २/३६
क्याचेस २७ ३६ ८२ ६२


संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "बालपणीच स्वप्न शेवटी सत्यात आले".
  2. ^ "रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा सुपर लीग - गट अ, हैदराबाद विरुद्ध मुंबई".
  3. ^ "रहाणेनी त्याच्या फलंदाजी क्रमांक सहाची ताकद दाखवली आहे".
  4. ^ "रहाणेनी लॉर्डस वर शतक झळकावला".
  5. ^ "अजिंक्य राहणे ची आकडेवारी".
  6. ^ "अजिंक्य रहाणेचे पदार्पणातील शतक त्याच्या कारकीर्दीतील अत्यंत महत्त्वाचे - प्रवीण आम्रे". Archived from the original on 2014-07-29. 2016-06-02 रोजी पाहिले.
  7. ^ "राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी विराट कोहलीची तर अर्जुन पुरस्कारासाठी अजिंक्य रहाणेची बीसीसीआय ने शिफारस". Archived from the original on 2016-05-07. 2016-06-02 रोजी पाहिले.