Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२०-२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२०-२१
श्रीलंका
इंग्लंड
तारीख १४ – २६ जानेवारी २०२१
संघनायक दिनेश चंदिमल ज्यो रूट
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा अँजेलो मॅथ्यूज (२१३) ज्यो रूट (४२६)
सर्वाधिक बळी लसिथ एम्बलडेनिया (१५) डॉमिनिक बेस (१२)
मालिकावीर ज्यो रूट (इंग्लंड)

इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळवली गेली. वेळेपत्रकानुसार ही मालिका मार्च २०२० मध्ये होणार होती. परंतु कोरोनाव्हायरसच्या फैलावामुळे इंग्लंड संघ सराव सामना चालु असतानाच इंग्लंडला परतला. त्यामुळे दोन्ही क्रिकेट बोर्डांनी ही मालिका जानेवारी २०२१ मध्ये आयोजित केली.

दिमुथ करुणारत्नेला दुखापत झाल्याने पहिला कसोटीत श्रीलंकेचे कर्णधारपद दिनेश चंदिमलकडे देण्यात आले. ज्यो रूटच्या उत्तम अश्या २२८ धावांच्या खेळीमुळे पहिल्या कसोटीत इंग्लंडने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला. ज्यो रूटची २२८ ही खेळी इंग्लंडच्या फलंदाजाने श्रीलंकेत केलेल्या सर्वोच्च धावा होत्या. दुसऱ्या कसोटीसाठीसुद्धा करुणारत्ने बरा नाही होऊ शकल्याने दिनेश चंदिमललाच कर्णधार नेमण्यात आले. इंग्लंडने दुसरी कसोटी देखील ६ गडी राखत जिंकली आणि कसोटी मालिकेमध्ये २-० असा विजय मिळवला. इंग्लंडने सलग पाचव्यांदा परदेशात कसोटी मालिका जिंकली, तर ह्या सलग ज्या पाच मालिका जिंकल्या त्या १९१३-१४ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतरचा सर्वोत्तम विजयी मालिका आहेत.

सराव सामने

[संपादन]

दोन-दिवसीय सामना:टीम रूट वि टीम बटलर

[संपादन]
८-९ जानेवारी
धावफलक
वि
१८४/२घो (५० षटके)
ज्यो रूट ७४* (११७)
मेसन क्रेन १/३७ (५ षटके)
१२०/६ (३८ षटके)
ओलिए पोप ५८* (९१)
ओली रॉबिन्सन २/१५ (४ षटके)
  • नाणेफेक: नाणेफेक नाही


१ली कसोटी

[संपादन]
वि
१३५ (४६.१ षटके)
दिनेश चंदिमल २८ (७१)
डॉमिनिक बेस ५/३० (१०.१ षटके)
४२१ (११७.१ षटके)
ज्यो रूट २२८ (३२१)
दिलरुवान परेरा ४/१०९ (३६.१ षटके)
३५९ (१३६.५ षटके)
लहिरु थिरिमन्ने १११ (२५१)
जॅक लीच ५/१२२ (४१.५ षटके)
७६/३ (३४.२ षटके)
जॉनी बेअरस्टो ३५* (६५)
लसिथ एम्बलडेनिया २/२९ (१२ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली
सामनावीर: ज्यो रूट (इंग्लंड)


२री कसोटी

[संपादन]
वि
३८१ (१३९.३ षटके)
अँजेलो मॅथ्यूज ११० (२३८)
जेम्स अँडरसन ६/४० (२९ षटके)
३४४ (११६.१ षटके)
ज्यो रूट १८६ (३०९)
लसिथ एम्बलडेनिया ७/१३७ (४२ षटके)
१२६ (३५.५ षटके)
लसिथ एम्बलडेनिया ४० (४२)
डॉमिनिक बेस ४/४९ (१६ षटके)
१६४/४ (४३.३ षटके)
डॉम सिबली ५६* (१४४)
लसिथ एम्बलडेनिया ३/७२ (२० षटके)
इंग्लंड ६ गडी राखून विजयी.
गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली
सामनावीर: ज्यो रूट (इंग्लंड)