पुरुष
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |


मानव प्राण्यातील नर जातीला पुरुष असे म्हणतात. सर्वसाधारपणे प्रौढ (३० किंवा त्यातून अधिक वय) मानव नराला पुरुष असे संबोधले जाते. 'मुलगा' हा सर्वनाम शब्द बाल्यावस्थेतील (० ते २० वर्षे) पुरुषांकरीता वापरला जातो. 'युवक' हा शब्द तरुण पुरुषांसाठी वापरला जातो ज्यांचे वय वर्षे २१ ते ४० दरम्यान असते.
जन्म
[संपादन]प्रत्येक बाळाचा जन्म हा स्त्री आणि पुरुष बीजाच्या मिलनातून होतो. स्त्री आणि पुरुष बीजांमध्ये असणाऱ्या गुणसूत्रांनुसार बाळाचे लिंग ठरते. स्त्री बीजामध्ये केवळ X गुणसूत्र असते तर पुरुष बीजामध्ये X आणि Y हे दोन गुणसूत्र असते.
स्त्री बीजामधील X गुणसूत्र आणि पुरुष बीजामधील Y गुणसूत्र एकत्र आले तर बाळाचे लिंग पुरुषाचे असते व मुलगा जन्माला येतो. तर स्त्री बीजामधील X गुणसूत्र आणि पुरुष बीजामधील X गुणसूत्र एकत्र आले तर बाळाचे लिंग स्त्रीचे असते व मुलगी जन्माला येते. ही प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिकरित्या होते.
ही प्रक्रिया संपूर्ण नैसर्गिक असल्यमुळे बाळाचे लिंग हे पुरुषाचे असेल का स्त्रीचे असेल हे कोणालाच माहीत नसते. म्हणूनच मुलगी जन्माला आली तर स्त्रीचा कोणताच दोष नसतो. व मुलाचा जन्मावर पुरुषाचा कोणताच ताबा नसतो.
पुरुषाच्या शरीराची वाढ
[संपादन]पुरुष जन्माला आल्यानंतर त्याच्या शरीराची वाढ हळूवारपणे होत राहते. त्याच्या शरीराची ही हळूवारपणे होणारी वाढ साधारण तो ११ ते १५ वर्षांचा होईपर्यंत होत राहते. पुरुष जेव्हा ११ ते १५ वर्षांचा होतो त्यानंतर त्याच्या शरीराची वाढ ही झपाट्याने होते. वयाच्या या टप्प्याला पौगंडावस्था किंवा वयात येणे असेही म्हणतात. वयात आल्यानंतर पुढील २ ते ५ वर्षांत त्याच्या शरीराची वाढ पूर्ण होते.
वयात येणे (पौगंडावस्था)
[संपादन]पुरुष हा ११ ते १५ वर्षांचा होतो त्यानंतर त्याच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनचा प्रसार होतो. पुरुषांचे लौंगिक अंग 'वृषण' ज्याला आपण गोट्या असेही म्हणतो हे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन करते. टेस्टोस्टेरॉन हे एक हार्मोन आहे जे शरीरात झपाट्याने बदल निर्माण करते व शरीराला पुरुषी रूप देते. वयाच्या या टप्प्याला आपण वयात येणे किंवा पौगंडावस्था असे म्हणतो.
वयात येण्यापूर्वी परुषाच्या शरीराची बरीच वाढ झालेली असते परंतु त्याच्या लौंगिक अंगांची वाढ पूर्ण झालेली नसते. जेव्हा तो वयात येतो तेव्हा त्याच्या शरीराची वाढ ही झपाट्याने होते आणि त्याच्या लौंगिक अंगांची वाढ होऊ लागते. पुरुष हा साधारण ११ ते १५ वर्षांचा झाल्यानंतर वयात येतो. वयात आल्यानंतर त्याच्या शरीराची वाढ ही साधारण २ ते ५ वर्षांत पूर्ण होते. त्यनंतर त्याच्या शरीराची वाढ जास्त होत नाही अथवा पूर्णपणे थांबते.
पुरुष वयात येण्यापूर्वी त्याच्या शरीराची वाढ व शरीरात होणारे बदल लवकर दिसून येत नाही परंतु तो वयात आल्यानंतर त्याच्या शरीराची वाढ व शरीरात होणारे बदल सर्वांना दिसून येतात.
वयात आल्यावर टेस्टोस्टेरॉनचा प्रसारामुळे शरीरात अनेक बदल घडतात जसे कि चेहऱ्यावर मुरुम यायला सुरुवात होते, चेहऱ्यावर मिशी व दाढी येते, शरीरावर (उदाहरणार्थ - काखेत, छातीवर, लौंगिक अंगांभोवती, इत्यादी.) अनेक ठिकाणी केस यायला सुरुवात होते, आवाजात बदल होतो, शिश्नाचा (नुन्नीचा) आकार व लांबी वाढते, वृषणांची वाढ होऊन ते मोठे होतात, असे अनेक बदल पुरुषांमध्ये दिसून येतात.
पौगंडावस्था पूर्ण झाल्यानंतर पुरुष हा प्रजनन करण्यासाठी पूर्णपणे सक्षम होतो.