वैदिक
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
भारतीय संस्कृतीचे आद्य ग्रंथ म्हणजे वेद. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद,अथर्ववेद या वेदांमधील जे विचार त्यांना वैदिक असे म्हटले जाते. त्याला अनुसरून जे आचरण केले जाते त्याला वैदिक परंपरा असे म्हणतात. १)ऋग्वेद:देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेली पदे आहेत.या पदांना "ऋचा"असे म्हटले जाते.अनेक ऋचा एकत्र गुंफून "सुक्त" तयार होते.अनेक सुक्तांचे मिळून "मंडल"तयार होते. २)यजुर्वेद:यज्ञ विधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचे संकलन करून त्यांचे स्पष्टीकरण केलेले आहे.त्या मंत्रांचा उपयोग केव्हा आणि कसा करावा याचे मार्गदर्शनही केलेले आहे.यज्ञात म्हटले जाणारे हे मंत्र म्हणजे ऋचाच होय. ३)सामवेद:यज्ञ विधीमध्ये ऋग्वेदा मधील ऋचाचे मंत्रस्वरुपात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन केलेले आहे.भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचे स्थान महत्त्वाचे आहे. ४)अथर्ववेद:दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी संबंधीचा विचार केलेला आहे.त्यामध्ये आयुष्यातील संकटे,दुखणी यांवर करायचे उपाय आणि औषधयोजना त्यांची माहिती दिलेली असते.राजनीती संबंधीची माहिती त्यात आढळते.