Jump to content

वर्ण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. ते केवळ ध्वनी असतात, म्हणून त्यांना ध्वनिरूपे म्हणतात. वर्ण हा भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, शब्द, वाक्यव्याकरण) एक आहे.

मराठी भाषेत मधे एकूण ५२ वर्ण आहेत.

वर्णाचे एकूण ३ प्रकार पडतात.

१. स्वर

२. स्वरादी

३. व्यंजन आणि विशेष संयुक्त व्यंजने

स्वर[संपादन]

ज्या वर्णाचा उच्चार करण्यास सुरुवात केल्या पासून ते शेवट पर्यंत जर एक सारखाच ध्वनी निर्माण होत असेल तर त्या वर्णाला स्वर असे म्हणतात. तसेच ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या वाचून करता येतो त्याला स्वर असे म्हणतात. मराठीत एकूण १४ स्वर आहेत.

अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए (ॲ) ऐ ओ (ऑ) औ

स्वरादी[संपादन]

ज्या वर्णाचा उच्चार करण्यास 'अ' ने सुरुवात करून अनुनासिक किंवा विसार्गाने समाप्ती होते त्या वर्णाना स्वरादी असे म्हणतात. मराठीत एकूण २ स्वरादी आहेत.

ं (अं ) ः (अ:)

व्यंजन[संपादन]

ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण होण्यास शेवटी स्वराचे साहाय्य घ्यावे लागते त्या वर्णाला व्यंजन असे म्हणतात. मराठीत एकूण ३६ व्यंजन आहेत.

मूळ व्यंजने:
क् ख् ग् घ् ङ्

च् छ् ज् झ् ञ्

ट् ठ् ड् ढ् ण्

त् थ् द् ध् न्

प् फ् ब् भ् म्

य् र् ल् व्

श् ष् स्

ह् ळ्

संयुक्त व्यंजने: क्ष् ज्ञ्

द् + न् + य् = ज्ञ्

क् + ष् = क्ष्