वेद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेद हे वैदिक धर्माचे संस्कृत भाषेत लिहिलेले सर्वात प्राचीन भारतीय वाङ्मय आहे. वेद अपौरुषेय (कोणत्याही व्यक्तीने रचले नाहित असे, म्हणजेच ईश्वरकृत) असल्याचे मानले जाते. 'मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामधेयम्' अशी वेदाची व्याख्या करता येईल.

या वेदांचे संहिता, आरण्यके, ब्राह्मणे आणि उपनिषदे असे चार उपविभाग आहेत. यापैकी उपनिषदे ही वेदांच्या शेवटी येतात म्हणून त्यांना 'वेदांत' असे म्हटले जाते.

शब्दोत्पत्ती[संपादन]

वेद हा संस्कृत शब्द असून तो 'विद्' या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे. वेद म्हणजे ज्ञान होय. वेद या शब्दाचा अर्थ 'ज्ञान' असा सुद्धा घेतला जातो. वेद भक्तांच्या दृष्टीने हे ज्ञान पवित्र आणि दैवी ज्ञान आहे. परंतु मूळ रुपामध्ये हा शब्द साहित्य ग्रंथामध्ये एक विशाल राशी - विशेष चा बोधक आहे. ज्याची रचना करण्यासाठी किमान दोन हजार वर्ष लागली असतील.


उप वेद:-


वेद हे भारतीय संस्कृतीतील आणि जगातीलही प्राचीनतम साहित्य आहे. वेद हे लिखित साहित्य नव्हते. गुरू-शिष्य परंपरेने ते मागील पिढीकडून पुढच्या पिढीकडे सोपविले जाई.


वेदांशी निगडित असे -