चार्ल्स डार्विन
चार्ल्स डार्विन | |
डार्विनचे १८५४मधील छायाचित्र (वय ४५) | |
पूर्ण नाव | चार्ल्स डार्विन |
जन्म | १२ फेब्रुवारी १८०९ मांउंट हाउस, श्र्यूजबरी, श्रॉपशायर, इंग्लंड |
मृत्यू | १९ एप्रिल, १८८२ (वय ७३) डाउन हाउस, डौने, केंट, इंग्लंड |
राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
वांशिकत्व | इंग्लिश |
कार्यक्षेत्र | प्रकृतीविज्ञान शास्त्रज्ञ |
कार्यसंस्था | जिऑलोजिकल सोसायटी ऑफ लंडन |
ख्याती | द व्होयाज ऑफ द बीगल ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीज उत्क्रांतिवादाचा सिद्धांत |
चार्ल्स रॉबर्ट डार्विन हा एक जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवले.
इंग्लंडमधील श्रॉपशायर परगण्यात फेब्रुवारी १२, इ.स. १८०९ रोजी चार्ल्सचा जन्म झाला. १८१८ मध्ये तो शाळेत जाऊ लागला. त्याला रसायनशास्त्राची फार आवड होती म्हणून आपल्या भावाच्या मदतीने त्याने आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यात छप्पर घालून एक छोटीशी प्रयोगशाळा उभारली होती व तेथे तो प्रयोग करत बसे. त्याचे शाळकरी सोबती त्याच्या या नादाची टर उडवत. कालांतराने त्याची डॉ. ग्रॅट या जीवशास्त्रज्ञाची ओळख झाली. डार्विनने १८२५ मध्ये केंब्रिज विद्यापीठाच्या क्राइस्ट महाविद्यालयात नाव नोंदवून पदवी मिळवली. तेथे त्याला जीवजिवाणू व कीटक निरीक्षणाचा नाद लागला. [ संदर्भ हवा ]
१८२६ मध्ये कॅप्टन किंगने दक्षिण अमेरिकेच्या संशोधनाची मोहीम काढली. त्याच्या हेन्स्लो नावाच्या मित्राच्या निमंत्रणावरून डार्विन मोहिमेत सामील झाला. त्या मोहिमेवर तो पाच वर्षे होता. निरनिराळे पक्षी-प्राणी एकमेकांशी कसे वागतात, कसे एकमेकांशी जुळवून घेतात, याचे निरीक्षण व अभ्यास त्याने केला व तेथे उत्क्रांतिवाद, सहजीवन, 'बळी तो कान पिळी', ही मूलभूत नैसर्गिक तत्त्वे तो शिकला. माणसाचा मूळ पुरुष, चारपायी पायाच्या माकडापासून झाला असला पाहिजे असे विचार त्याच्या डोक्यात घुमू लागले. वेगवेगळे प्राणी कसे निर्माण झाले या विषयावरच्या त्याच्या Origin of Species या नोव्हेंबर २४ रोजी प्रकाशित झालेल्या शोधप्रबंधाच्या १२५० प्रति एका दिवसात खपल्या. हा सिद्धांत बायबलच्या विरुद्ध जात होता. त्याचा निषेध करण्यासाठी १८६० मध्ये ऑक्सफर्डमध्ये विल्बर फोर्स या बिशपने सभा बोलावली. ले डी हूकर या शास्त्रज्ञाने डार्विनची बाजू सडेतोड व सोदाहरण मांडली. बिशपला डार्विनचा सिद्धांत मान्य करावाच लागला. डार्विनला त्या यशाचीना खंतना खेद. तो कार्यातच मग्न राहिला.[ संदर्भ हवा ]
पुस्तके
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- चार्ल्स डार्विन Archived 2006-07-14 at the Wayback Machine.
- डार्विनच्या उत्क्रांतिवादाविषयी इन अवर टाईम कार्यक्रमात बीबीसी रेडिओ ४ वरील चर्चा. (प्रत्यक्षात ऐका) (इंग्रजी भाषा)