अमेरिका (खंड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमेरिका खंड

अमेरिका खंड हा पृथ्वीच्या पश्चिम गोलार्धातील एक मोठा खंड आहे. अमेरिका खंडात उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे उप-खंड व मध्य अमेरिकाकॅरिबियन हे भौगोलिक प्रदेश समाविष्ट आहेत.

अमेरिका खंडात एकूण ३५ स्वतंत्र देश व २३ वसाहती आहेत. अमेरिका खंडाने पृथ्वीवरील ८.३% पृष्ठभाग व्यापला आहे व जगातील १३.५% लोक येथे राहतात.

हा खंड म्हणजेच युरोपमध्ये नवे जग समजले जाणारा भूप्रदेश आहे हे अमेरिगो वेस्पुचीने सिद्ध केले. या खंडाचे नाव वेस्पुचीच्या नावावरुनच आले आहे.