पी. लक्ष्मी नरसु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पी. लक्ष्मी नरसु
P. Lakshmi Narasu.jpg
पी. लक्ष्मी नरसु
जन्म नाव पोकला लक्ष्मी नरसु
जन्म १८६१
मृत्यू १४ जुलै, १९३४ (वय ७३)
शिक्षण मद्रास ख्रिश्चन कॉलेज
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म बौद्ध
कार्यक्षेत्र शिक्षण, साहित्य, धर्म, विज्ञान
भाषा तमिळ, इंग्रजी (लेखनभाषा), फ्रेंच, तेलगू, जपानी, संस्कृत आणि पाली
साहित्य प्रकार धार्मिक
संघटना साऊथ इंडियन बुद्धीस्ट असोसिएशन
प्रसिद्ध साहित्यकृती द इसेन्स ऑफ बुद्धिझम (१९०७)
वडील पोकल चेल्लम नयनायागारु
पत्नी रुक्मिणी अमल
रमारत्नम अमल
अपत्ये वेंकट (मुलगा)
विरलक्ष्मी (मुलगी)

पोकला लक्ष्मी नरसु (१८६१ - १४ जुलै १९३४) हे एक भारतीय लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक व बौद्ध अभ्यासक होते. ते भौतिकशास्त्र या विषयाचे प्राध्यापक होते आणि त्यांचे या विषयातील शोधनिबंध जगभरातल्या विज्ञान पत्रिकेतून प्रकाशित झालेले आहेत. भौतिकशास्त्रावर त्यांचे प्रभुत्व होते आणि त्या विषयातील वादविवादात त्यांनी अनेक युरोपियन आणि ब्रिटिश विद्वानांवर त्यांनी मात केली होती.[१][२]

वैयक्तिक जीवन[संपादन]

नरसु यांचा जन्म इ.स. १८६१ मध्ये एका संपन्न कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील पोकल चेल्लम नयनायागारु हे मद्रास उच्च न्यायालयात एक नामांकित वकील होते. त्यांना एक बहीण - अंडल अमल आणि तीन भाऊ - कृष्णस्वामी, रामानुजान व भाष्याम होते. इ.स. १९११ मध्ये ट्रेन आग दुर्घटनेमध्ये रामानुजान व भाष्याम यांचे निधन झाले. नरसुंच्या पहिल्या पत्नीचे नाव रुक्मिणी अमल होते, लग्नानंतर काही वर्षातच रुक्मिणीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी इ.स. १९२५ मध्ये रमारत्नम अमल नामक एका विधवेशी बौद्ध पद्धतीने दुसरा विवाह केला. त्यांना वेंकट नावाचा एक मुलगा व विरलक्ष्मी नावाची एक मुलगी होती. १९२५ पूर्वी, वेंकट पॅरिसमध्ये शिक्षण घेत असतांना त्याचा मृत्यू झाला.[३][४]

शिक्षण व प्राध्यापकीय कारकीर्द[संपादन]

धार्मिक कार्य[संपादन]

टी. सिंगारीवेलू, आयोथी थासर आणि नरसु यांनी मद्रास प्रांतात "साऊथ इंडियन बुद्धीस्ट असोसिएशन" (शाक्य बुद्धिस्ट सोसायटी) या बौद्ध संस्थेची स्थापना केली, ही संस्था अनागरिक धर्मपाल यांनी स्थापन केलेल्या महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत कार्य करणारी एक बौद्ध संस्था होती. १८९० साली स्थापन झालेल्या या महाबोधी सोसायटीचे (मद्रास शाखा) एम. सिंगरलवेलू, आयोथी थासार आणि पी लक्ष्मी नरसु हे तिघेही सदस्य होते. नरसुंनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. इ.स. १९०७ साली त्यांनी लिहिलेला "द इसेन्स ऑफ बुद्धिझम" हा ग्रंथ शाक्य बुद्धिस्ट सोसायटीचा प्रमाणग्रंथ होता.[५] या ग्रंथाला जपानमध्ये खूप मागणी होती. त्यांनी लिहिलेला "व्हॉट इज बुद्धिझम" हा ग्रंथ चेकोस्लोव्हाकिया देशाचे विदेशमंत्री जीन मॅसारीक यांनी १९१६ मध्ये स्वत: अनुवादित करून त्या देशाचा मार्गदर्शक ग्रंथ मानला.[६] त्यांनी "बुद्धिझम इन अ नटशेल", "अ स्टडी ऑफ कास्ट" हे सुद्धा ग्रंथ लिहिलेत. विज्ञानावादावर आधारित बौद्ध धर्माची मांडणी करणारे त्यांचे लेख "रिलीजन ऑफ मॉडर्न बुद्धीस्ट" या जी. अलोसियस यांनी संपादित केलेल्या ग्रंथात प्रकाशित झालेले आहेत.[७] त्यांनी साऊथ बुद्धिष्ट असोसिएशनच्या माध्यमातून सन १९१० मध्ये मद्रासमधील बौद्धांची जनगणना करून घेतली जी १८,००० इतकी निघाली. नरसुंनी चार बौद्ध परिषदांचे आयोजन मद्रास प्रांतात केले होते. त्यापैकी पहिली बौद्ध धर्म परिषद १९१७ मध्ये मूर पॅव्हीलीयन पीपल्स पार्क, मद्रास येथे; दुसरी १९२० मध्ये बेंगलोर येथे, तिसरी १९२८ मध्ये मद्रास येथे तर शेवटची चौथी परिषद १९३२ मध्ये बेंगलोर प्रेसिडेंसी, तिरुपतूर कोलार गोल्ड फिल्ड येथे आयोजित केल्या गेल्या होत्या.[८] त्यांनी श्रीलंका देशात जाऊन जाहीरपणे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण जीवन बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराकरता व्यतित केले. त्यांना आधुनिक काळातील "इग्गेज्ड बुद्धिझम"चे प्रवर्तक मानले जात होते. त्यांचे इंग्रजी, फ्रेंच, तामिळ, तेलगू, जपानी, संस्कृत आणि पाली या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी अनेक प्रगतिशील संस्था आणि संघटनेत एक सक्रिय आणि सन्माननीय सभासद म्हणून कार्य केले.[९] १९४८ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नरसुंच्या "द इसेन्स ऑफ बुद्धिझम" या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करून त्याला प्रस्तावना लिहिली, प्रस्तावनेत त्यांनी 'प्राध्यापक पी.एल. नरसु हे एकोणिसाव्या शतकातील भारतातील अत्यंत प्रतिभावान व्यक्ती होते' असे म्हटले होते. बौद्ध धम्माच्या वाचकांसाठी उपलब्ध असलेले "द इसेन्स ऑफ बुद्धिझम" हे एक अत्यंत मौलिक पुस्तक आहे असा अभिप्रायसुद्धा त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दिला. आंबेडकरांनी म्हटले की, "प्राध्यापक नरसु--जे लढले युरोपियन उद्धटपणाविरुद्ध देशभक्तीपूर्ण उत्साहाने, सनातनी (रुढीप्रिय) हिंदुत्त्वाविरुद्ध मूर्तीभंजक आवेशाने, पाखंडी ब्राम्हणांसोबत राष्ट्रीय दृष्टीने आणि आक्रमक ख्रिस्ती धर्माविरुद्ध बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टीकोनाने. हे सर्व कार्य त्यांनी महान तथागत सम्यक संबुद्धांच्या शिकवणूकीच्या प्रेरणादायी ध्वजाखाली (मार्गदर्शनाखाली) केले".[१०][११][१२][१३]

विचार[संपादन]

जाती विषयक विचार[संपादन]

कोणत्याही व्यक्तीच्या सदाचरण व दुराचरणावरून उचित माहिती मिळविता येते. परंतु जन्म व वंशपरंपरावरुण खात्रीपूर्वक काहीच सांगता येत नाही. सर्व मानव एकच आहेत.

स्त्रियांविषयी विचार[संपादन]

धर्म मानवा मानवामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक करत नाही, एक मानव इतर मानवा पासून विशीष्ट गुणदृष्टीमुळे वेगळा ठरू शकतो, नाहीतर कोणत्याही प्रकारचा भेद नाही.

विज्ञान विषयक विचार[संपादन]

लेखन[संपादन]

नरसु यांनी अनेक ग्रंथ इंग्रजीत लिहिलेले आहेत. त्यांच्या पुस्तकांचे हिंदीत अनुवादही झाले आहेत.[१४][१५]

 • इसेन्स ऑफ बुद्धिझम (१९०७)[१६]
  • द्वितीयावृत्ती १९११ मध्ये अनागरीक धर्मपाल यांनी काढली तर; तृतीयावृत्ती १९४८ मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काढली. या ग्रंथाचा हिंदी अनुवाद भदंत आनंद कौसल्यायन यांनी केला आहे तर जी. अप्पा दुरीयार यांनी हा ग्रंथ तमिळ भाषेत अनुवादित केला.
 • व्हॉट इस बुद्धिझम (१९१६)
 • अ स्टडी ऑफ कास्ट (१९२२)[१७]
 • रिलीजन ऑफ मॉडर्न बुद्धिस्ट (२००२; सम्यक प्रकाशन, नवी दिल्ली)
 • बुद्धिझम इन अ नटशेल

संदर्भ[संपादन]

 1. ^ Muthiah, S. (2011-06-05). "Madras miscellany: The ‘Essential Buddhist'". The Hindu (en-IN मजकूर). ISSN 0971-751X. 2019-03-02 रोजी पाहिले. 
 2. ^ Rajan, K. Mavali. Role of Ayothidas Pandithar in uprising Subaltern conciousness (en मजकूर). 
 3. ^ Narasu, P. L. (2002). Religion of modern Buddhist (English मजकूर). Delhi: Samyak Prakashan, New Delhi. pp. IX. आय.एस.बी.एन. 978-81-98524-70-8 Check |isbn= value (सहाय्य). 
 4. ^ "Dalithmurasu | Ambedkar | Lakshmi Narasu | Budha". keetru.com. 2019-03-02 रोजी पाहिले. 
 5. ^ "India | Pioneer of Buddhist Revival Movement in South India". www.buddhistchannel.tv. 2019-03-02 रोजी पाहिले. 
 6. ^ Narasu, P. L. (2002). Religion of modern Buddhist (English मजकूर). Delhi: Samyak Prakashan, New Delhi. pp. XVIII. आय.एस.बी.एन. 978-81-98524-70-8 Check |isbn= value (सहाय्य). 
 7. ^ https://academiccommons.columbia.edu/download/fedora_content/download/ac:163651/content/Ayyathurai_columbia_0054D_10271.pdf
 8. ^ Narasu, P. L. What is Buddhism (English मजकूर). Delhi: Samyak Prakashan, New Delhi. pp. 8, 9. आय.एस.बी.एन. 81-88794-42-2. 
 9. ^ "Academic Commons". Academic Commons. 
 10. ^ Narasu, P. L. What is Buddhism (English मजकूर). Delhi: Samyak Prakashan, New Delhi. pp. 3, 4. आय.एस.बी.एन. 81-88794-42-2. 
 11. ^ Ober, Douglas Fairchild (2016). Reinventing Buddhism : conversations and encounters in modern India, 1839 - 1956. 
 12. ^ nmuthumohan (2012-09-24). "Ayothee Dasa Pandithar: Dalit Consciousness in South India". nmuthumohan (en मजकूर). 2019-03-02 रोजी पाहिले. 
 13. ^ "20th May in Dalit History – Birth Anniversary of Iyothee Thass – Great Social reformer and Buddhist Scholar". Dr. B. R. Ambedkar's Caravan (en मजकूर). 2015-05-20. 2019-03-02 रोजी पाहिले. 
 14. ^ Shobhana, Nidhin. "Decoding the Spirit of Castes: A review of Pokala Lakshmi Narasu’s ‘A Study of Caste’". Round Table India (en-gb मजकूर). 2019-03-02 रोजी पाहिले. 
 15. ^ "Lakshmi Narasu, P. (Pokala) [WorldCat Identities]". 
 16. ^ https://ia800205.us.archive.org/9/items/essenceofbuddhis015612mbp/essenceofbuddhis015612mbp.pdf
 17. ^ P. Lakshmi Narasu (1922). A Study of Caste. Public Resource. K. V. RAGHAVULU. 


बाह्य दुवे[संपादन]