येशू ख्रिस्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
येशू
Cefalù Pantocrator retouched.jpg
जन्म c.0 BC
बेथलेहेम
मृत्यू जेरुसलेम
मृत्यूचे कारण मानवजातीच्या पाप क्षमेसाठी क्रूसावर बलिदान देणे
नागरिकत्व ज्यू
प्रसिद्ध कामे मृतांना जीवंत करणे, रोग्यांना बरे करणे, आंधळ्यांना दृष्टी देणे, मानवजातीचा पापांसाठी मरणे आणि तिसर्‍या दिवशी पुन्हा जीवंत होणे आणि स्वर्गात जाणे
मूळ गाव नाझारेथ
पदवी हुद्दा परमेश्वराचा पुत्र (जगाचा तारणारा)
वडील योसेफ (जागतिक पिता
आई मारिया

येशू ख्रिस्त (इंग्रजी: Jesus Christ किंवा Jesus of Nazareth ; हिब्रू: יֵשׁוּעַ yēšūă किंवा Yeshua ग्रीक: Ιησούς Χριστός ( iēsous Christós अभिषिक्त एक ); (इ.स.पू ४ ते इसवी सन ३० अंदाजे) हा ख्रिस्ती धर्माच्या केंद्रस्थानी आहे. त्‍याला मरियम पुत्र, नासरेथ गावाचा येशू, प्रभु येशू खिस्‍त, जीजस क्राइस्ट, यीशु किंवा ईसा मसीह असेही म्‍हटले जाते, ख्रिस्‍ती धर्मग्रंथातील (बायबलमधील) नवा करार नामक उपग्रंथ येशूच्‍या जन्मासंबंधी, तसेच त्‍याचे जीवन, कार्य, शिकवण या विषयांशी संबंधित आहे. बायबल हा ग्रंथ ख्रिस्ती धर्माचा एकमेव पवित्र ग्रंथ आहे.

नावाचा अर्थ[संपादन]

मत्‍तयरचित शुभवर्तमानाच्या पुस्‍तकातल्या पहिल्या अध्‍यायातले २१ वे पद येशू ख्रिस्ताच्या नावाबद्दल सांगते की,

वह पुत्र जनेगी और तू उसका नाम यीशु रखना, क्‍योंकि वह अपके लोगोंका उन के पापोंसे उद्वार करेगा। (हिन्‍दी)
तिला पुत्र होईल आणि तू त्‍याचे नाव येशू ठेव कारण तो आपल्‍या लोकांना त्‍यांच्‍या पापांपासून मुक्त करेल.

येशू ख्रिस्ताला, 'इब्री(हिब्रू) भाषेत 'येशुआ'[१] तर ग्रीक भाषेत 'येसूस' Ιησούς (Iēsoûs) असे म्हटले आहे येशू हे याच शब्‍दाचे मराठी रूपांतर आहे, त्‍याचा अर्थ तरणारा, येशू सर्व मानवजातीला पापांच्‍या बंधनातून सोडविण्‍याकरिता आला, असे पवित्र शास्त्र(=बायबल) सांगते. या येशूला तत्कालीन राजसत्तेने क्रूसावर चढवून ठार मारण्याचा प्रयत्‍न केला. येशूच्या केवळ नावाद्वारे पापातून मुक्ती मिळत आहे. (प्र‍ेषित(?). ४.१२)

ख्रिस्त हा शब्‍द ग्रीक भाषेतील ख्रिस्‍तोस (Χριστός, Christós अभिषिक्त एक ) या शब्‍दावरून आलेला असून त्‍याचा अर्थ अभिषिक्‍त असा होतो. यहूदी लोकांना(ज्यू धर्मीयांना) याव्‍हे (यहोवा) नावाच्या देवाकडून ख्रिस्ताचा जन्म होईल असे आश्वासन प्राप्‍त झाले होते, असे समजले जाते. तरीसुद्धा त्या येशूचा यहूदी लोकांनी स्‍वीकार केला नाही, देवाने येशूला अभिषेक करून विशेष कार्यासाठी निवडून, पृथ्वीवर पाठविण्‍यात आले होते, असा समज आहे..

जन्म[संपादन]

येशू ख्रिस्ताचा जन्म नक्की कोणत्या दिवशी किंवा कोणत्या महिन्यात झाला, हे इतिहासात कुठेच नमूद केलेले नाही. तरी नवीन करारातील लूककृत शुभवर्तमान ह्या पुस्तकात यहुदी कॅलेंडर प्रमाणे सहाव्या महिन्यात ( सध्याच्या कॅलेंडर प्रमाणे ऑगस्ट-सप्टेंबर) मरियेला देवदूताने तिच्या पोटी येशू जन्म घेणार असल्याचा देवाचा निरोप दिल्याची नोंद आहे. असे असले तरी, दर वर्षी २५ डिसेंबर हा ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ म्हणून पाळला जातो.[२]

मृत्यू[संपादन]

येशू ख्रिस्त

येशूचा मृत्यू वयाच्या ३०-३३ वर्षाच्या सुमारास झाला आहे,असे बायबलमध्ये नमूद केले आहे. त्याला क्रूसावर खिळून ठार करण्यात आले.

संदर्भ यादी[संपादन]

  1. ^ "यीशु". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2020-01-05.
  2. ^ http://en.wikipedia.org/wiki/Special:BookSources/0567080463बाह्य दुवा[संपादन]