Jump to content

थेरीगाथा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

थेरीगाथा हा एक बौद्ध ग्रंथ असून तो खुद्दक निकायाच्या १५ ग्रंथांपैकी एक आहे. यात ७३ परमपदप्राप्त विद्वान स्त्रियांनी (भिक्खुणी) आपल्या उद्गारातून रचलेल्या ५२२ गाथांचा संग्रह आहे. थेरी म्हणजे अनुभवी व ज्ञानी स्त्री. पाली भाषेतील या गाथा काव्यस्वरूपात असून त्यांत उत्कट भावनांचा परिपोष आढळतो. हा ग्रंथ १६ वर्गात/भागात विभाजित आहे, जो गाथांच्या संख्येनुसार क्रमाने आहे.


थेरीगाथेमध्ये ज्या भिक्खूणींचा उल्लेख आलेला आहे, त्यातील बहुतांश भगवान बुद्ध यांच्या समकालीन होत्या. एका इसिदाप्तीच्या उदानात भव्य नगरी पाटलिपुत्राचा उल्लेख आला आहे. संभवत: ती सम्राट अशोक यांची राजधानी आहे. यामुळे ग्रंथाचा रचनाकाळ प्रथम बौद्ध संगीती पासून ते तृतीय बौद्ध संगीती पर्यंतचा मानला जातो.

परिचय[संपादन]

थेरीगाथा ही थेरगाथाच्या समान आहे. होय, थेरोंच्या उद्गारात जीवनसंस्मरणांचा उल्लेख कमी आहे. त्यामध्ये विषयांची गंभीरता आणि प्रकृतीचित्रण अधिक आहे. याच्या विपरीत बहुतेक थेरींच्या उद्गारात सुखदुःखाने भरलेले त्यांच्या पूर्व जीवनाचे संस्मरण मिळतात. या प्रकारे त्यांच्या आध्यात्मिक जीवनाच्या व्यतीरिक्त पारिवारिक आणि सामाजिक जीवनाची सुद्धा झलक दिसते. शुभा सारख्या एखाद्या थेरींच्या उद्गारातच प्रकृतीचे वर्णन पाहायला मिळले. अंबपाली सारख्या थेरींचे उद्गार, ज्यात सांसारिक वैभवाचा उल्लेख मिळतो, काव्यशास्त्राच्या अनुपम उदाहरण आहे.

भिक्खूणीसंघाचे संघठन सुद्धा बरेचसे भिक्खूसंघाच्या आधारावरच झाले आहे. कुठलाही भेदभाव न करता, आध्यात्मिक जीवनात मग्न समाजाच्या सर्व स्तरातील महिलांसाठी त्याचे दरवाजे उघडे होते. राजपरीवारातील महिलांपासून ते दीन-दुःखी परिवारातील महिला संघात सामील होत्या. त्या सर्व सामाजिक विषमतांना त्यागून एकच पवित्र उद्देश्याने प्रेरित होऊन संघाची सदस्या (भिक्खूणी) बनल्या होत्या. त्या साधिकांच्या वैराग्याच्या मागे अनेक कारण होते. बहुतांश साधिकांनी प्रियजनांच्या वियोगाने आणि सांसारिक जीवनापासून कंटाळून संघात प्रवेश केला होता. सर्वांना उद्देश्य परम शांतीची प्राप्ती होता. अर्हत्वाच्या प्राप्ती नंतर निर्वाणाच्या परम शांतीची अनुभूतीमध्ये त्या सर्वांना एकाच स्वरात गाताना ऐकतात-- सीतिभूतम्हि निब्बुता अर्थात शीतिभूत झालेली आहे, उपशांत झालेली आहे.

थेरींच्या गाथांतून त्या काळातील स्त्रियांच्या सामाजिक स्थितीवरदेखील प्रकाश पडतो. इसिदासीच्या जीवनातून माहिती मिळते की, त्या वेळी काही लोकांत घटस्पोटांच्या काही प्रथा प्रचलित होत्या. इसिदासीचा विवाह तीन-तीन वेळा झाला होता. त्या सामंत युगात बहुपत्नी प्रथा प्रचलित होती. अनेक थेरी आपल्या गाथांमध्ये या गोष्टीचा उल्लेख करतात. त्या वेळी नगरशोभिनीयाची परंपराही प्रचलित होती.


भगवान बुद्धांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठविला होता. त्यांच्या शिकवणुकींपासून प्रभावित होऊन, त्या वृत्तीला सोडून कितीतरी स्त्रिया पवित्र जीवन जगू लागल्या. अम्रपाली, अड्टकासि आणि विमला ह्या त्यांपैकीच आहेत. ते त्यांच्या उद्गारातून त्या जीवनाचा उल्लेख करतात. स्त्रिया विद्यार्जन करून विदुषी बनू शकतात. कुंडलकेसी आणि नंदुत्तरा याची उदाहरणे आहेत. शिक्षण ग्रहन केल्यानंतर या दोन स्त्रिया देशात भ्रमण करून धम्म (धर्म) आणि दर्शन (तत्त्वज्ञान) या विषायांत विद्वानांनी शास्त्रार्थ करतात. धर्म अनुसरण्याच्या संदर्भात स्त्रिया पुरुषांपेक्षा स्वातंत्र होत्या. ही बाब रोहिणी आणि भद्दकच्चाना यांच्या जीवनचरित्रापासून सिद्ध होते. त्या वेळी सुद्धा समाजात वाईट गोष्टी अस्तित्वात होत्या. भिक्खूनींनाही त्याबरोबर सावध राहावे लागे. ही गोष्ट शुभा थेरीच्या गाथांवरून स्पष्ट होते. त्या परिस्थितीला लक्षात घेऊन, नंतर भिक्खूनींच्या अरणवासाविषयी अनेक नियम बनवावे लागले. याप्रकारे, थेरींच्या गाथांमध्ये त्या काळातील स्त्रियांच्या सामाजिक स्थितीचेही चित्र दिसते.

तीन थेरींच्या उद्गारातील काही अंश खालिलप्रमाणे आहेत.

सोमा, राजगृहाच्या राज पुरोहित यांची कन्या होती. भिक्खूणी होऊन विमुक्तीसुख प्राप्त केल्यानंतर ध्यानासाठी अंधवनामध्ये बसली. मार याने तिला साधनांच्या मार्गावरून व्यत्यय आणण्याच्या विचाराने तिला विचारले - जे स्थान ऋषींनाही मिळवणेही अवघड आहे, कमी बुद्धिमत्तेच्या स्त्रियांना ते मिळवणे शक्य नाही. मार याला उत्तर देण्याच्या उद्देशाने सोमा म्हणाली - ज्याचे मन समाधिस्थ आहे, ज्याच्यामध्ये प्रज्ञा आहे, आणि ज्याला धम्माचा साक्षात्कार झाला आहे त्याच्या मार्गात स्त्रीत्व बाधक नसते. मी तृष्णेचा पूर्णपणे नाश केला आहे, अविद्या रूपी अंधकाराला दुर्लक्षित केले आहे.

भगवान बुद्ध यांची मावशी महाप्रजापती गौतमींनी, ज्या भिक्खूणी संघाच्या अग्रणी होत्या, आपल्या निर्वाणाच्या आधी भगवानाच्या जवळ जाऊन त्यांच्यापासून शेवटचा निरोप घेताना कृतज्ञतेचे हे शब्द व्यक्त केले -

हे बुद्ध वीर! प्राणीमात्रांत सर्वोत्तम! आपल्याला नमस्कार. आपण मला आणि अनेक प्राण्यांना दुः ख पासून मुक्त केले आहे. .... वास्तविक ज्ञानाशिवाय मी सतत जगतात फिरत राहिले. मी देवाचे दर्शन मिळाले. हे माझे शेवटचे शरीर आहे. अनेकांच्या हितासाठी (माझी बहीण) माया देवीने गौतमाला जन्म दिला आहे, ज्यांनी शोकग्रस्थ आणि मरण आजारातील पशूंना दुःखसमूहापासून दूर केले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]