नालंदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नालंदा is located in बिहार
नालंदा
नालंदा
नालंदाचे बिहारच्या नकाशावरील स्थान

नालंदा हे भारतातील प्राचीन शहरांपैकी एक होते. ते सध्याच्या बिहार राज्यात येते. याठिकाणीच नावाजलेले नालंदा विद्यापीठही होते. बिहारमध्ये नालंदा या नावाने जिल्हा असून त्या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बिहार शरीफ हे आहे.

इतिहास[संपादन]

नालंदा हा मुख्यतः बौद्धविहार होता. बुद्धांच्या शिकवणुकीचा प्रसार करण्याचे ते एक केंद्र होते; त्यामुळे शेकडो बौद्धभिक्षू या ठिकाणी ज्ञानार्जन करण्यासाठी येत. येथे सर्व विद्या, सर्व शास्त्रे यांचे शिक्षण मिळत असे. या विद्यापीठाला तसेच तोलामोलाचे आचार्य लाभले. त्यापैकी काही प्रसिद्ध नावे - नागार्जुन, असंग, शीलभद्र, धर्मपाल, चंद्रपाल, जिनमित्र अशी आहेत. या विद्यापीठाचे अनेक आचार्य देशोदेशी जाऊन बौद्ध धर्मप्रसाराचे काम करीत होते. शांतरक्षित, पद्मसंभव, कमलशील, स्थिरमती हे तिबेटला गेले. कुमारजित, परमार्थ, शुभकर, धर्मदेव हे चीन व कोरियाला गेले व या विद्यापीठाची कीर्ती सर्वत्र पसरली. [१]

हेही पहा[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ गायधनी, रं. ना. (२०१५). प्राचीन भारताचा इतिहास. पुणे: अनिरुद्ध पब्लिशिंग हाऊस. pp. ३३१. ISBN 978-93-84730-42-0.