बौद्ध धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बुद्ध धम्म या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
bronze Statue of the Buddha in meditation position, Haw Phra Kaew, Vientiane Laos
समाधी अवस्थेतील बुद्ध प्रतिमा, लाओस.

बौद्ध धर्म (इंग्रजी: Buddhism / बुद्धिझम्) हा भारताच्या श्रमण परंपरेतून निर्माण झालेला एक धर्म आणि तत्त्वज्ञान आहे. बौद्ध धर्माला बौद्ध धम्म, बुद्ध धर्म, बुद्ध धम्म असेही म्हणतात. इ.स.पू. ६ व्या शतकात बौद्ध धर्माची स्थापना झालेली असून तथागत बुद्ध हे याचे संस्थापक आहेत. तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पुढील दोन शतकात सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला आणि त्यापुढील दोन हजार वर्षांमध्ये हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये (ईस्ट इंडीज) सोबतच सर्व जगात पसरला. बौद्ध धर्म हा आपल्या जन्मस्थानापासून निघून जगभर पसलेला जगातील पहिला धर्म होय. बौद्ध धर्म हा निरीश्वरवादी, अनात्मातावादी, समतावादी, विज्ञानवादी, मानवतावादी धर्म होय. गौतम बुद्ध यांनी मानवजातीला प्रज्ञा, शील, करूणा या तत्त्वांची शिकवण दिली. बौद्ध धर्म हा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, करूणा, मैत्री (प्रेम), प्रज्ञा, मानवी मूल्यें, विज्ञानवाद या तत्त्वांचा पुरस्कर्ता आहे. बौद्ध धर्म हा आधुनिक विज्ञान आणि मानवी मूल्यांचे समर्थन करणारा धर्म आहे.[१]

बौद्ध धर्माचे १.८ अब्ज (२५%) ते २.१ अब्ज (२९%) लोक अनुयायी आहेत.[२][३] लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे.[४][५] चीन देशात सर्वाधिक बौद्ध धर्मीय लोक आहेत, तेथील ८०% ते ९१% चिनी लोकसंख्या (११० कोटी ते १२२ कोटी) बौद्धांची आहे.[६] बौद्ध धर्म हा जगातील २०० पेक्षा अधिक देशात असून २० देशांत बहुसंख्यक आहे. आज सर्वच खंडात भगवान बुद्धांचे अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (४९%) लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. अनुयायांच्या तुलनेत ख्रिश्चन धर्मानंतर (२ अब्ज) जगतात सर्वाधिक अनुयायी बौद्ध धर्माला (१.८ अब्ज) लाभलेले आहेत. परंतु भारतातील कोट्यवधी हिंदू, दलित धर्मीयांनी तसेच जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी बौद्ध धर्माचे अनुयायीत्व पत्करले आहे त्यामुळे या सर्व बौद्ध अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही २.३ अब्जांवर आहे. यानुसार बौद्ध धर्म हा जगातील सर्वाधिक अनुयायी असलेला धर्म सुद्धा ठरतो.

अनुक्रमणिका

उदय[संपादन]

कालानुक्रम: बौद्ध परंपरांचा विस्तार आणि विकास (इ.स.पू. ४५० ते इ.स. १३००)

  इ.स.पू. ४५० इ.स.पू. २५० इ.स. १०० इ.स. ५०० इ.स. ७०० इ.स. ८०० इ.स. १२००

 

भारत

प्रारंभिक
संघ

 

 

 

प्रारंभिक बौद्ध परंपरा महायान वज्रयान

 

 

 

 

 

श्रीलंका आणि
दक्षिण आशिया

 

 

 

 

थेरवाद

 

 

 

 

तिबेटी

 

प्राचीन तिबेटी बौद्ध धर्म

 

Kadam
Kagyu

 

Dagpo
Sakya
  Jonang

 

पूर्व आशिया

 

प्राचीन बौद्ध संस्कृती
आणि महायान
रेशीम मार्गद्वारे
चीन, आणि रोमन साम्राजाशी संपर्क
भारत ते व्हियेतनाम

Tangmi

नांतो रोकुषु किंवा नारा रोकुषु(Nanto Rokushū|NaraRokushū)

शिंगोन बौद्ध धर्म

चान बौद्ध धर्म

 

Thiền, कोरियन सेआॅन
  जपानी झेन
Tiantai / जिंगतू

 

तेंदाई

 

 

निचिरेन

 

ज्युदो शू

 

मध्य आशिया

 

ग्रीक बौद्ध धर्म

 

 

रेशीम मार्ग बौद्ध धर्म

 

  इ.स.पू. ४५० इ.स.पू. २५० इ.स. १०० इ.स. ५०० इ.स. ७०० इ.स. ८०० इ.स. १२००
  Legend:   = थेरवाद   = महायान   = वज्रयान   = विविध धर्म आगमन

ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धर्म हा भारतातील एक अतिप्राचीन, तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून मानवी मूल्यांचा पुरस्कर्ता, विज्ञाननिष्ठ व परिवर्तनशील धर्म आहे. बौद्ध धर्म हा भारतीय धर्म असून भारताच्या इतिहासात या धर्माच्या उदयाला मोठे स्थान आहे. बौद्ध धर्माचा विकास इ.स.पू. ६ ते इ.स. ६ ह्या कालावधीत झाला. बौद्ध संस्कृतीचे सर्वात मोठे योगदान मौर्य कला, गांधार कलामथुरा कला यांत आढळते. तर बौद्ध धर्माचा व तत्त्वांचा प्रसार भारताबरोबरच शेजारील अनेक देशांमध्येही झालेला आहे. त्रिपिटकाच्या स्वरूपातील साहित्य व विविध पंथीय साहित्य हे बौद्ध संस्कृतीच्या रूपाने जगातील अनेक देशांमध्ये पसरले. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहारस्तूपमठ, चैत्य व लेण्या ह्या मौर्य कलेच्या प्रतीकांच्या रूपाने स्पष्ट दिसतो. त्याच्या विकासाला जवळजवळ १,१०० वर्षे लागली. जगाच्या आणि भारताच्या जीवनविषयक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि विशेषत: धार्मिक बाजूंवर बौद्ध धर्माची खोलवर व न पुसणारी अशी छाप पडलेली आहे.

भारतातून उच्चाटन[संपादन]

बौद्ध धर्माच्या इतिहासाप्रमाणे बौद्ध धर्माच्या स्वरूपात अनेक स्थित्यंतरे होत गेली व या काळात मुसलमानांची आक्रमणे भारतात झाली. भारतातून बौद्ध धर्म गायब होण्यामागे येथील हिंदू धर्म (वैदिक धर्म / ब्राह्मणी धर्म) आणि हिंदू राजांनी केलेले अत्याचारही कारणीभूत आहेत.[७]

तथागत बुद्धांचे जीवन[संपादन]

मुख्य लेख: गौतम बुद्ध
भगवान बुद्धांची प्रतिमा

तथागत गौतम बुद्ध (इ.स.पू. ५६३इ.स.पू. ४८३) हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. ते तत्त्वज्ञ, आद्य वैज्ञानिक, थोर समाज सुधारकही होते. बुद्धांचे मुळ नाव ‘सिद्धार्थ’ होय. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया (मायादेवी) यांचे पोटी इ.स.पू. ५६३ मध्ये राजकुमाराचा जन्म लुंबिनी येथे झाला. राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामायाचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमीने केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा इ.स.पू. ५४७ मध्ये विवाह झाला. राहुल नावाचा त्यांना पुत्र झाला.

बौद्ध अनुयायी लोक गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध (संमासंबुद्ध) मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. इंग्लडच्या जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड विद्यापिठाने मागील १० हजार वर्षामधील अशा टॉप १०० जगातील विश्वमानवांची यादी तयार केली ज्यांनी आपली बुद्धिमत्ता आणि मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केलीत, त्या यादीत विद्यापिठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांचे ठेवले होते. जागतिक इतिहासातील सर्वाधिक प्रभावशाली मानव म्हणून बुद्धांचे नाव अग्रस्थानी आहे. आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात की, ‘‘बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत केला नाही.’’

शाक्यमुनी’ (शाक्यांचा मुनी) हे गौतमाचेच दुसरे नाव. बुद्ध हे बौद्ध धर्माचे मुख्य स्तंभ आहेत. त्यांची जीवनकहाणी, त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले. गौतम बुद्धांच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुकी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली.

ज्ञानप्राप्ती[संपादन]

stone Mahabodhi temple in Bodh Gaya, India, where Gautama Buddha attained Nirvana under the Bodhi Tree
बोधगया (बिहार) मधील महाबोधी विहार, या ठिकाणी बुद्धांना बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती (बुद्धत्व/निर्वाण) झाली होती.

गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली. आताच्याबिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली धानस्थ बसले असता इ.स.पू. ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ‘दिव्य ज्ञाना’ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’ किंवा ‘निर्वाण’ असेही म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले म्हणून या वृक्षाला ‘बोधिवृक्ष’ (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.

धम्मचक्र प्रवर्तन[संपादन]

Dhamek Stupa shrine in Sarnath, India, built by Ashoka where the Buddha gave his first sermon
सारनाथ मधील धामेक स्तूप (भारत), येथे बुद्धांनी आपला पहिला धम्म उपदेश (शिकनण) दिली होती. सम्राट अशोकांनी या स्तूप निर्मिले आहे.

ज्ञानी बुद्धांनी उत्तर प्रदेश मधील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला. त्यांच्या पहिल्या उपदेशास ‘धम्मचक्रप्रवर्तन’ किंवा ‘धम्मचक्कपवत्तन’ असे म्हणतात. या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्त्वे सांगितली. त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धर्म वाढीस लागला. तथागत बुद्धांनी स्वत: ६व्या शतकामध्ये जवळजवळ १ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.

महापरिनिर्वाण[संपादन]

Gold colored statue of Buddha reclining on his right side
बुद्धांची महापरिनिर्वाण प्रसंगाची प्रतिमा, महापरिनिर्वाण विहार, कुशीनगर, बिहार.

इ.स.पू. ४८३ मध्ये वयाच्या ८०व्या वर्षी कुशीनगर येथे तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले.

A very large hill behind two palm trees and a boulevard, people walking are about one fifth the hill's height
रामाभर स्तूप, येथे बुद्धांच्या निर्वाणानंतर त्यांच्या अत्यंसंस्कार येथे झाला आहे, कुशीनगर, उत्तर प्रदेश, भारत.

उत्तर प्रदेशातील कुशीनगरयेथे बुद्धांच्या निर्वाणानंतर त्यांच्या अत्यंसंस्कार येथे झालेला आहे. तेथे रामाभर स्तूप उभारले आहे.

तत्त्वज्ञान व शिकवण[संपादन]

भगवान बुद्धांनी ‘पाली’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी त्रिशरण, चार आर्यसत्ये, अष्टांगिक मार्ग (मध्यम मार्ग) व पंचशील सांगितलेला आहे.

चार आर्यसत्ये[संपादन]

गौतम बुद्ध चार अार्य सत्यांची शिकवण देतांना, नालंदा, बिहार भारत.

भगवान गौतम बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दु:खमय आहे, दु:खाची निर्मीती तृष्णेतून (वासना, इच्छा, आसक्ती, आवड) होते, म्हणून या तृष्णेवर आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे.मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत.

 1. दु:ख - मानवी जीवन हे दु:खमय आहे.
 2. तृष्णा - मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दु:खाचे कारण आहे.
 3. दु:ख निरोध - दु:खाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होते.
 4. प्रतिपद् - दु:ख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांग मार्ग) आहे.

महान बौद्ध विद्वान व बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, या चार आर्यसत्यामधील पहिले व शेवटचे हे दोनच आर्यसत्वे महत्त्वाचे आहेत. पहिले - दु:ख आहे आणि शेवटचे प्रतिपद् - दु:ख निवारण्याचा (अष्टांग) मार्ग आहे.

पंचशील[संपादन]

मुख्य लेख: पंचशील

बुद्धांनी आपल्या अनुयायांना खालिल पाच शीलांची शिकवण दिलेली आहे.

 1. अहिंसा :- मी जीव हिंसे पासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
 2. मी चोरी करण्यापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
 3. मी कामवासनेच्या अनाचारापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
 4. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
 5. मी मद्य, मादक तसेच इतर सर्व मोहांत पाडणाऱ्या मादक वस्तुंच्या सेवनापासून अलिप्त रहाण्याचीं शपथ घेतो.

या बौद्ध तत्त्वांचा, शिकवणुकीचा मानवाने जीवनात अंगीकार केला तर मानवी अस्तित्व असताना नक्कीच तो दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो.

अष्टांगिक मार्ग[संपादन]

महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘अष्टांग मार्ग’ किंवा ‘मध्यम मार्ग’ सांगितला.

धम्मचक्रातील आठ आरे हे बुद्धांचा अष्टांगिक मार्ग दर्शवतात.
अष्टांगिक मार्ग

अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. ह्या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते.

 1. सम्यम दृष्टी :- निसर्ग नियमा विरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.
 2. सम्यक संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.
 3. सम्यक वाचा :- करुणायुक्त व सत्यपुर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.
 4. सम्यक कर्मांत :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
 5. सम्यक आजिविका :- वाईट मार्गाने आपली उपजिविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
 6. सम्यक व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरीत नाश करणे.
 7. सम्यक स्मृती :- तात्विक गोष्टींचे स्मरण करुन चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.
 8. सम्यक समाधी :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दृष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.

दहा पारमिता[संपादन]

बुद्धांनी सांगितलेल्या या दहा पारमीता ह्या शील मार्ग होय.

 1. शिल :- शील म्हणजे नितिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल.
 2. दान :- स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे.
 3. उपेक्षा :- निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे.
 4. नैष्क्रिम्य :- ऐहिक सुखाचा त्याग करणे.
 5. वीर्य :- हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पुर्ण करणे.
 6. शांति :- शांति म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.
 7. सत्य :- सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये.
 8. अधिष्ठान :- ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.
 9. करुणा :- सर्व प्राणिमात्र, मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता.
 10. मैञी :- मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रुविषयी देखिल नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे.

विज्ञाननिष्ठत्व[संपादन]

बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान हे बहुतांशी विज्ञानवादी / विज्ञाननिष्ठ आहे. खालील बाबींत विज्ञान व बौद्ध धर्मात समानता आहे. विज्ञान व बौद्ध धर्माचा एकच उद्देश आहे - ‘सत्याचा शोध’.

देव (ईश्वर) नाही[संपादन]

विश्वामध्ये देव वा ईश्वर नावाची कसलीही गोष्ट, वस्तू किंवा प्राणी अस्तित्वात नाही. बौद्ध धम्मामध्ये देवाला स्थान नाही. तथागत भगवान बुद्धांनी देव नाही हा सिद्धान्त अनेक दृष्टीने पटवून दिला आहे. विज्ञानाच्या सिद्धांताप्रमाणे जगात देव नाही. कारण, त्याचा आकार कसा, स्थान याबद्दल याबद्दल कोणालाही माहिती नाही. देव ही मानवी मनाची काल्पनिक संकल्पना आहे.

आत्मा नाही[संपादन]

विज्ञानानुसार शरीरामध्ये कोठेही आत्म्याचे स्थान नाही, हा सिद्धान्त तथागत भगवान बुद्धांनी इसवी सनाच्या सहा शतके आधी सांगितला. शरीर चार महाभूतांनी बनलेले आहे. त्यांमध्ये पृथ्वी, आप, तेज आणि वायू यांचा समावेश आहे. मनुष्यप्राणी जेव्हा मरतो तेव्हा ही चारही महाभूते निसर्गातील आपापल्या घटकामध्ये विलीन होतात. त्यामुळे शरीरामध्ये आत्मा नाही हे सिद्ध होते. मानवाच्या शरीरामध्ये आत्मा नावाचा कोणताही भाग आढळत नाही.

अनैसर्गिक मार्गांनी जन्म नाही[संपादन]

नैसर्गिक प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कुणाचाही जन्म होत नाही. त्यामध्ये टेस्ट ट्यूब बेबी किंवा आणखी नवीन विज्ञानाच्या नवीन अविष्कार याचा समावेश असतो कारण आपोआप काहीही होत नाही. म्हणजेच अनैसर्गिक मार्गाने कोणाचाही जन्म होत नाही. या कसोटीला बौद्ध धम्म तंतोतंत उतरतो. बुद्धांना एका ब्राह्मणाने प्रश्न विचारला की, ‘आपण कोण आहात?’ तेव्हा तथागत म्हणतात की, ‘राजा शुद्धोधन आणि महामाया यांचा मी औरस पुत्र आहे. परंतु स्वत:च्या प्रयत्नांनी मी बौद्धिक प्रगती केलेली आहे. तेव्हा तू मला फार तर प्रबुद्ध मानव समज.’

परिणाम सर्वत्र सारखेच[संपादन]

विज्ञानामध्ये एखादे संशोधन झाले तर त्याचा जो परिणाम होईल किंवा जाणवेल तो जगाच्या पाठीवर कुठेही सारखाच जाणवेल त्यामध्ये कमी अधिक परिणाम किंवा प्रमाण असणार नाही. त्याप्रमाणे बौद्ध धम्माचे आचरण केल्यास धम्म अनुसरल्यास त्याचे परिणाम सर्वत्र सारखाच जाणवतो.

दैववाद (नशीब) अमान्य[संपादन]

भगवान बुद्धांनी कर्म सिद्धान्त सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार दैव, देव, नशीब, नियती या सर्व संकल्पना चुकीच्या आहेत. तुम्ही ज्याप्रमाणे वर्तन कराल त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळेल, असे विज्ञान सांगते. भगवान बुद्धांच्या कर्म सिद्धांताप्रमाणे आदर्श समाज घडवायचा असेल तर कुशल कर्म करावे म्हणजेच दैववाद, नशीब यांवर अवलंबून राहू नये. स्वकर्म चांगले तर त्याचा परिणाम चांगला ही नीती बौद्ध धम्माचा गाभा आहे.

जगाची उत्क्रांती[संपादन]

उत्क्रांती वादाचा जनक चार्ल्स डार्वीन १९व्या शतकात होऊन गेला. विज्ञानाच्या आधारे जगाचा हळूहळू विकास होत गेला. विश्व कोणी निर्माण केले नाही हा डार्वीनचा १९व्या शतकातील विज्ञानवादी सिद्धांत अगोदर २५०० वर्षापूर्वी इ.स.पू. ६व्या शतकात भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला सांगितला आहे. याचाच अर्थ बौद्ध धर्म हा विज्ञानवादी धर्म आहे आणि विज्ञानवाद हा बुद्ध धर्माचाच प्रतिध्वनी होय.

विज्ञानाची नम्रता[संपादन]

भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मी सांगतो म्हणून तुम्ही खरे मानू नका, तर या आणि पहा तुमच्या बुद्धीला पटेल तरच धम्माचा स्विकार करा. तसेच धम्म हा सर्वांसाठी खुला आहे. त्यामध्ये जात, पंथ, लिंग इत्यादी कोणताही भेद नाही.” विज्ञानाने केलेले संशोधन हे अंतिम आहे, असे विज्ञान मानीत नाही, म्हणजे बौद्ध आचारसंहिता व विज्ञान यामध्ये हे साम्य आहे.

अनित्य[संपादन]

जगामध्ये सतत बदल होत असतात ते स्थिर (नित्य) असे नसते. ग्रह, तारे, पृथ्वी वगैरे विश्वात काही नित्य नाही. असे विज्ञान स्पष्ट सांगते. भगवान बुद्धांनी सुद्धा सर्व अनित्य आहे. सर्व बदलत असते, सर्व सजिवांमध्येही क्षणाक्षणाला बदल होत असतो.

अकारण काहीही नाही[संपादन]

प्रत्येक गोष्टीला कारण असते, आपोआप कुठलीही गोष्ट होत नाही असा विज्ञानाचा सिद्धान्त आहे. निसर्गामध्ये चमत्कार अद्भुत शक्ती, मंत्र इत्यादी अस्तित्वात नाही हाच सिद्धान्त भगवान बुद्धांनी प्रतित्य समुपाद या नावाने मांडला. त्यात बुद्धांनी सांगितले की, प्रत्येक गोष्टीला कारण असते. कारणाशिवाय काहीही होत नाही. यालाच धम्मात कार्यकारणभाव सिद्धान्त म्हणतात. बौद्ध धर्माचा प्रत्येक सिद्धान्त विज्ञानाच्या कसोटीला उतरतो.

समाज जीवनावर प्रभाव[संपादन]

बौद्ध धर्माचा जगातील सर्व समाज जीवनावर प्रभाव पडलेला आढळतो. कारण बौध्दधर्म सर्व श्रेष्ठ धर्म आहे .

बौद्ध तत्त्वज्ञानाचा हिंदू धर्मावरील प्रभाव[संपादन]

बौद्ध धर्मातील अहिंसा, सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेमसहानुभूती इत्यादी विचारांनी हिंदू धर्मावर प्रभाव टाकला. त्यामुळेच वैदिक धर्मीयांना पुढे अहिंसा (non-voilence) तत्त्वाच्या आवश्यकतेवर भर द्यावा असे वाटले.

वैचारिक स्वातंत्र्य[संपादन]

वैचारिक स्वातंत्र्य हे बौद्ध धर्मात खोलवर रुजलेले असून, त्याचा हिंदूंच्या, कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित न करता, वैदिक परंपरांचे पालन करण्याच्या पारंपरिक विचारपद्धतीवर परिणाम झाला.

सद्गुणांचा विकास[संपादन]

बौद्ध धर्माने अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रिय संयममादक पदार्थाचे सेवन करू नये ह्या पाच शील तत्त्वे (पंचशील तत्त्वे) पालन करण्याचा उपदेशच केला नाही तर ती शिकविली आहेत व त्यामुळे सद्गुणांचा विकास होण्याला हातभार लागला आहे.

समता तत्त्वाचा प्रभाव[संपादन]

तथागत गौतम बुद्धांनी जात, संप्रदाय, वर्णसामाजिक दर्जा ह्या कोणत्याही बाबींचा विचार न करता सर्व व्यक्तींमध्ये समता (equality) प्रस्थापित करण्याविषयी धर्मोपदेश केला. त्याचा जातिव्यवस्थेवर आधारलेल्या पारंपरिक हिंदू समाजरचनेवर प्रभाव पडला.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास[संपादन]

विज्ञानवादी बौद्ध धर्माने लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बिंबविण्यासाठी साहाय्य केले आहे. या धर्माची मूलतत्त्वे व तत्त्वज्ञान ही विज्ञानधिष्ठित असल्याने, त्याच्या शिकवणीतून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टी येण्यास हातभार लागला आहे. २० व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरअल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या अनेक विचारवंतांनी बौद्ध धर्मच खरा विज्ञानवादी धर्म असल्याचे सांगतलेले आहे.

नैतिक सिद्धान्ताचा प्रभाव[संपादन]

करुणा (दयाबुद्धी), प्रामाणिकपणा, प्रेम, परोपकार, अहिंसा, क्षमाशिलता, शीलसंवर्धन, यांसारख्या नैतिक बाबींवर बौद्ध धर्मात भर देण्यात आला. याचा वैदिक हिंदू धर्माच्या नियतिवादावर परिणाम झाला. यामुळेच बौद्ध धर्म हा अगदी भिन्न असलेला स्वतंत्र व प्रभावशाली धर्म आहे.

बौद्ध धर्माचे कलेतील योगदान[संपादन]

वास्तुविद्या, लेण्यांचे आणि विहारांचे खोदकाम आदी क्षेत्रांत बौद्ध धर्माचे योगदान खूप मोठे आहे. त्या काळी विहारे, स्तूप, मंदिरे, लेणी (गुंफा) - खोदकाम यांसारख्या वास्तुविद्या क्षेत्रांतील निर्मितीचा स्फोट झाला होता. त्यामुळे इतर धर्मीयांच्या कला क्षेत्रातील निर्मितीलाही चालना मिळाली.

बौद्ध धर्माने लोकांना वास्तुविद्या विकासासाठी प्रोत्साहित केले आहे. सुंदर विहारे, मंदिरे, स्तंभ, स्तूपे यांसारख्या बांधकामांना वाव देऊन, हा विकास साध्य केला आहे. आज जगातील पहिले सर्वाधिक सुंदर असलेले धार्मिक प्रार्थनास्थळ थायलंड मधील पांढऱ्याशुभ्र रंगाचा एक अप्रतिम बुद्ध विहार आहे.

स्थानिक भाषेतील साहित्यविषयक योगदान[संपादन]

बुद्ध, बौद्ध भिक्खू आणि बौद्ध धर्मप्रचारकांनी धार्मिक विचार हे लोकांच्या नेहमीच्या भाषेत (पाली) मांडल्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार जलद गतीने झाला. त्या काळी प्रचलित असलेल्या पालीसारख्या प्राकृत भाषेचा मोठा विकास झाला. बौद्ध धर्माने पाली भाषा व तिच्या धर्मग्रंथ व अन्य धार्मिक पुस्तकांच्या लिखाणाच्या माध्यमातून साहित्य विकासाला हातभार लावला आहे.

शिक्षणास प्रोत्साहन[संपादन]

बौद्ध धर्माने शिक्षण प्रसारास प्रोत्साहन दिले. बौद्ध विहारमठ यांनी शिक्षण प्रसाराची केंद्रे म्हणून कार्य केले. बौद्ध भिक्खु हे मोठे विद्वान होते. बौद्ध धर्मास ज्या भारतीय सम्राटांनी व राजांनी पाठिंबा दिला त्यांनीही शिक्षणास प्रोत्साहन दिले. तक्षशिलानालंदा या विद्यापीठांनी प्राचीन काळात खूप नाव कमावले होते. नालंदा हे बौद्ध विद्यापीठ म्हणूनच ओळखले जाई. बौद्ध धर्माने स्त्रीशिक्षणाचा व कनिष्ठ जातींच्या शिक्षणाचा देखील पुरस्कार केला.

भारतीय संस्कृतीचा परदेशात प्रसार[संपादन]

बौद्ध धर्माने परदेशात जेथे जेथे आपले पाय रोवले तेथे तेथे भारतीय बौद्ध संस्कृतीचे घटक प्रसारित होण्यास हातभार लागला. श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, म्यानमार, भूतान, कोरिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, सिंगापूर, मंगोलिया, तैवान, हाँगकाँग इत्यादी देशांत बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून आज जगातील जवळजवळ सर्वच देशांत बौद्ध धर्माचा प्रसार झालेला आहे. जगातील प्रत्येक देशांत बौद्ध अनुयायी आहेत. बौद्ध धर्माने भारतीय तसेच विदेशी समाजाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आर्थिक विकासाला प्रोत्साहन[संपादन]

बौद्ध धर्माने भारत देशाच्या आर्थिक विकासाला चालना दिली आहे. बौद्ध धर्मीय चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांचे साम्राज्य जगातील सर्वात संपन्न व शक्तिशाली होते. त्यांच्या साम्राज्याचा बौद्ध धर्म हा राजधर्म होता. जगाच्या एकूण अर्थव्यस्थेत सर्वाधिक म्हणजेच ३४% वाटा हा सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा होता. आज भारताचा जागतिक अर्थव्यस्थेतील वाटा कमी असला तरी चीनजपान हे दोन बौद्ध राष्ट्रे जागतिक अर्थव्यस्थेत अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.

बौद्ध साहित्य[संपादन]

मुख्य लेख: बौद्ध साहित्य

पाली भाषेतील ग्रंथ[संपादन]

 1. त्रिपिटक - पाली भाषेतील बौद्ध ग्रंथ फार प्राचीन आहेत. या ग्रंथात त्रिपिटक हा ग्रंथ फार मोठा व अत्यंत महत्त्वाचा आहे. हा महाभारत ग्रंथाच्या तिपटीने मोठा असून त्याची ग्रंथसंख्या सरासरी तीन लक्ष आहे. या ग्रंथाची भाषांतरे सिंहली, ब्रह्मी, चिनी, जपानी, वगैरे अनेक भाषांतून झाली आहेत. या ग्रंथाला त्रिपिटक हे नाव पडण्याचे कारण त्याचे तीन पिटक (पुडे) म्हणजे भाग आहेत. ते खालील प्रमाणे:
  1. विनयपिटक - यांत भिक्षुकांनी पाळण्याच्या नियमांचा संग्रह आहे. याचे पाच भाग आहेत.
   1. पाराजिका
   2. पाचितियादि
   3. महावग्ग
   4. चुल्लवग्ग
   5. परिवारपाठ.
  2. सुत्तपिटक - यात बुद्धांच्या उपदेशांचा संग्रह आहे. याचे पाच मोठे ‘निकाय’ (पोटभाग) आहेत.
   1. दिर्घनिकाय
   2. मध्यमनिकाय
   3. संयुक्तमिकाय
   4. ॲगुत्तरनिकाय
   5. क्षुद्रनिकाय - यांत बुद्धांचे आपल्या शिष्यांशी केलेले संवाद आहेत. क्षुद्रनिकायाचे पुन: १५ पोटविभाग आहेत.
    1. खुद्दकपाठ
    2. धम्मपद
    3. उदान
    4. इतिवुत्तक
    5. सुत्तनिपात
    6. विमानवत्थु
    7. पेतवत्थु
    8. थेरगाथा
    9. थेरीगाथा
    10. जातक
    11. निद्देस
    12. पटिसंभिदामग्ग
    13. अवदान
    14. बुद्धवंस
    15. चरियापिटक
  3. अभिधम्मपिटक - यात बौद्ध तत्त्वज्ञानाचे विवेचन आहे. यात सात भाग आहेत.
   1. धम्मसंगणि
   2. विभंग
   3. धातुकथा
   4. पुग्गलपज्जत्ति
   5. कथावत्थु
   6. यमक
   7. पठ्ठान
 2. मिलिंदपन्हो
 3. दीपवंस व महावंस

संस्कृत भाषेतील ग्रंथ[संपादन]

 1. ललित विस्तर
 2. बुद्धचरितअश्वघोष
 3. लंकावतार-सूत्र

तिबेटी भाषेतील ग्रंथ[संपादन]

 1. क्यांग-र
 2. ग-छेररोल्प

चिनी भाषेतील ग्रंथ[संपादन]

 1. महाभिनिष्क्रमणसूत्र
 2. महापरिनिर्वाणसुत्त
 3. जातक-निदान
 4. महावंस

या ग्रंथांची चिनी भाषांतरी झालेली आहेत.

ब्रह्मी भाषेतील ग्रंथ[संपादन]

म्यानमार देशांत ‘मलंगवत्तु’ नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. हे एका पाली ग्रंथाचे भाषांतर आहे. याशिवाय अन्य संस्कृत व पाली ग्रंथांचे ब्रह्मी भाषेत भाषांतरे झालेली आहेत.

सिंहली भाषेतील ग्रंथ[संपादन]

 1. दीपवंस
 2. महावंस — (लेखक- महानाम)
 3. ज्ञानोदय

जपानी भाषेतील ग्रंथ[संपादन]

मराठी भाषेतील ग्रंथ[संपादन]

 1. बुद्ध, धर्म आणि संघ — धर्मानंद कोसंबी
 2. धम्मपदं (नवसंहिता) — आचार्य विनोबा भावे
 3. धर्म व धर्मपंथ — प्र.न. जोशी
 4. बुद्ध संप्रदाय आणि शिकवण — चिं.वि.जोशी
 5. बौद्ध विचारधारा — संपादक- महेश देवकर, लता देवकर व प्रदीप गोखले
 6. श्रीहर्ष — पारखीशास्त्री
 7. बौद्धदर्शनसार — बापटशास्त्री
 8. बौद्धपर्व — वा. गो. आपटे, २०१३

बंगाली भाषेतील ग्रंथ[संपादन]

 1. बुद्धदेव — प्रो. सतीशचंद्र विद्याभूषण
 2. बौद्धधर्म — सत्येंद्रनाग टागोर

इंग्रजी भाषेतील ग्रंथ[संपादन]

 1. दि लाईट ऑफ एसिया — एड्वीन अर्नोल्ड, १८७९
 2. दि गोस्पेल ऑफ बुद्ध — पॉल कॅरस, १८९४
 3. बुद्धिझम इन् ट्रान्सलेशन्स — हेन्री क्लर्क वॉरेन, १८९६
 4. सम सेईग्स ऑफ द बुद्ध — एफ. एल. वुडवर्ड, १९२५
 5. अ बुद्धिस्ट बायबल — ड्वाइट गोडार्ड, १९३२
 6. अर्ली बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स — ई. जे. थॉमस, १९३५
 7. दि वेदांतिक बुद्धिझम ऑफ दि बुद्ध — जे. जी. जेनिंग, १९४७
 8. दि टिचिंग्स ऑफ दि कंपॅशनेट बुद्ध — इ. ए. बर्ट, १९५५
 9. दि बुद्ध अँड हिज् धम्म — भीमराव आंबेडकर, १९५७
 10. गौतम दि बुद्ध : हिज लाईफ अँड हिज टिचिंग्स (विपक्षणा रिसर्च इन्सिट्युट)
 11. बुद्धिझम अँड मॉडर्न थॉट्स — इ. जी. टेलर
 12. बुद्धिझम — ई. जे. मिल्स
 13. बुद्धिझम ईथिक्स — डबल्यू. टी. स्टेस
 14. बुद्धिझम ऑफ विझ्डम अँड फेइथ् — थिच थेईन् ताम, १९९१
 15. व्हॉट दि बुद्ध टॉट् — वालपोल राहुल, १९५९
 16. लिवींग धम्म — वेनेरेबल अजाह्न चाह
 17. व्हॉट बुद्धिस्ट बिलींव्ह — वेन. के. श्री धम्मानंद, १९९३
 18. आउटलाइन्स ऑफ् महायान बुद्धिझम — डी. टी. सुजुकी, २००५
 19. इसेंस ऑफ बुद्धिझम - पी लक्ष्मी नरसू, मे -१९०७

बौद्ध प्रतिके[संपादन]

मुख्य लेख: बौद्ध प्रतिके

बौद्ध धर्माचे बुद्ध, धर्म, संघ या प्रमाणेच अन्य महत्त्वाची प्रतिके आहेत.

पंचशील बौद्ध ध्वज
अशोक चक्र, भारताच्या राष्ट्रध्वजावर अंकित

संप्रदाय[संपादन]

color map showing Buddhism is a major religion worldwide
तीन प्रमुख बौद्ध संप्रदायाचा विस्तार

महायान, थेरवाद, वज्रयान, नवयान इत्यादी बौद्ध धर्माचे प्रमुख संप्रदाय किंवा पंथ आहेत. यांच्याशिवाय शेकडो बौद्ध संप्रदाय आजही अस्तित्वात आहेत.

बौद्ध समुदाय[संपादन]

संपूर्ण विश्वात जवळजवळ १.८ अब्ज (१८० कोटी) बौद्ध आहेत. यामध्ये साधारणपणे ७०% ते ७५% महायानी बौद्ध आणि अर्वरित २५% से ३०% थेरवादी, नवयानी (भारतीय) आणि वज्रयानी बौद्ध आहेत. महायान और थेरवाद (हीनयान), नवयान, वज्रयान यांच्या व्यतिरीक्त बौद्ध धर्मात यांचे अनेक उपसंप्रदाय किंवा उपपंथ सुद्धा आहेत परंतु त्यांचा प्रभाव खूप कमी आहे. सर्वात जास्त बौद्ध पूर्व आशिया आणि आग्नेय आशियाच्या सर्व देशांत बहूसंख्याकच्या रूपात राहतात। दक्षिण आशियाच्या दोन किंवा तीन देशांत सुद्धा बौद्ध धर्म बहुसंख्याक आहे. आशिया खंडाची जवळजवळ अर्ध्या पेक्षा अधिक लोकसंख्येवर बौद्ध धर्माचा सखोल प्रभाव आहे. अमेरीका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका और यूरोप सारख्या खंडांमध्ये सुद्धा कोट्यवधी बौद्धांचे समुदाय राहतात. जगात साधारणपणे १८ पेक्षा अधिक देश असे आहेत की, जिथे बौद्ध धर्म बहुसंख्याक किंवा बहुमतात आहे. जगात काही देश असेही आहेत की जिथे बौद्ध लोकसंख्येबद्दल कोणती विश्वासू माहिती उपलब्ध नाही.

सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेले देश
देश बौद्ध लोकसंख्या बौद्ध टक्केवारी
Flag of the People's Republic of China चीन १,२२,५०,८७,००० ९१%[८]
जपान ध्वज जपान १२,३३,४५,००० ९६%[९]
व्हियेतनाम ध्वज व्हिएतनाम ७,४५,७८,००० ८५%[१०][११]
भारत ध्वज भारत ६,७९,८७,८९९ ०६%[१२]
थायलंड ध्वज थायलंड ६,४६,८७,००० ९५%
म्यानमार ध्वज म्यानमार ४,९९,९२,०००० ९०%
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया २,४६,५६,००० ५४%
Flag of the Republic of China तैवान २,२१,४५,००० ९३%[१३]
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया १,७६,५६,००० ७२%
श्रीलंका ध्वज श्रीलंका १,६०,४५,६०० ७५%[१४][१५]
कंबोडिया ध्वज कंबोडिया १,४८,८०,००० ९७%
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया ८०,८५,४०० ०३%
हाँग काँग ध्वज हाँग काँग ६५,८७,६०३ ९३%
मलेशिया ध्वज मलेशिया ६३,४७,२२० २२%
नेपाळ ध्वज नेपाळ ६२,२८,६९० २१%
लाओस ध्वज लाओस ६२,८७,६१० ९८%[१६]
Flag of the United States अमेरिका ६१,५९,९०० ०२%
सिंगापूर ध्वज सिंगापूर ३७,७५,६६६ ६७%
मंगोलिया ध्वज मंगोलिया ३०,५५,६९० ९८%
Flag of the Philippines फिलिपिन्स २८,६७,५९५ ०३%
रशिया ध्वज रशिया २०,९६,६०८ ०२%
Flag of Bangladesh.svg बांग्लादेश २०,४६,८०० ०१%
कॅनडा ध्वज कॅनडा २१,४७,६०० ०३%
ब्राझील ध्वज ब्राझील ११,४५,६८० ०१%
फ्रान्स ध्वज फ्रांस १०,५५,६०० ०२%

चित्रदालन[संपादन]

बुद्ध व बौद्ध धर्माविषयी विचारवंताची मते[संपादन]

बौद्ध धर्म व गौतम बुद्ध यांच्याविषयी जागतिक विचारवंत व जगप्रसिद्ध व्यक्तींची मते खालिल प्रमाणे आहेत.

माझ्या मतानुसार बुद्धांचा धम्म श्रेष्ठ आहे. दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याचेशी तुलना केली जाऊ शकत नाही. जर एखाद्या विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही, असे माझे माझे पक्के मत सर्व धर्मांचा २१ वर्षे सखोल अभ्यास केल्यावर झाले आहे. — डॉ. बाबासाहेब आंबेडकर
“भविष्य काळातील धर्म हा वैश्विक धर्म असेल, तो व्यक्तिगत शरिरधारी ईश्वराच्या पलिकडचा, ठाम निश्चित अशा परंपरेने पाळत असलेल्या मतप्रणाली, तसेच पराप्राकृतिक ईश्वराचा शोध घेणाऱ्या शास्त्रांना बाजूला ठेवणारा असेल. विज्ञानाच्या गरजांची जर कोणता धर्म परिपूर्ती करीत असेल तर तो फक्त बौद्ध धर्म आहे. — अल्बर्ट आईन्स्टाईन
बौद्ध धर्मातील नैतिक आदर्श पुरूष जो अर्हत, तो नैतिक आणि बौद्धिक अशा दोन्ही दृष्टींनी महान असला पाहिजे. तो तत्त्वज्ञ, तसाच श्रेष्ठतम सदाचारीही असला पाहिजे. बौद्ध धर्मात ज्ञान हे मुक्ती (निर्वाण) साठी अनिवार्य मानले गेले आहे आणि ते प्राप्त करण्यास अपयश येण्याची दोन कारणे आहेत त्यापैकी अज्ञान हे एक कारण आहे. (दुसरे कारण लोभ किंवा तृष्णा होय.) ह्या उलट ख्रिश्चन आदर्श पुरूषाच्या घडणीत ज्ञानाला अजिबात स्थान नाही. जगातल्या दु:खापैकी पुष्कळशी दु:खे दृष्टपणापेक्षा मूर्खत्वाने आणि अंधश्रद्धेने निर्माण झाली आहेत. — डब्ल्यू. टी. स्टेस
बौद्ध धर्माइतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या श्रेष्ठत्वावर आणि अज्ञानाच्या हीनतेवर भर देण्यात आला नाही. आपली दृष्टी स्पष्ट असण्याबाबत बौद्ध धर्माव्यतिरीक्त कोणत्याही धर्मात मनोविकासासाठी (चित्त संस्कारासाठी) इतकी सखोल योजना प्रस्तुत करण्यात आली नाही. — ई. जे. मिल्स, ग्रंथ - बौद्ध धर्म (Buddhism)
बौद्ध धर्माचे आध्यातमिक तत्त्वज्ञान हीतकारक सामर्थशाली देणगी आहे, बौद्ध धर्माप्रमाणे युनिटेरिअन ख्रिस्ती बांधवही धर्मग्रंथ किंवा मतप्रणालीची बाह्य शक्ती नाकारून मानवाला अंतर्यामी असलेल्या मार्गदिपाचा अधिकार मान्य करतात. युनिटेरिअन मताचे अनुयायी येशू ख्रिस्त व तथागत बुद्ध हे जीवनाचे सर्वोच्छ भाष्यकार आहेत असे मानतात. — रेव्हरँड लेस्ली बोल्टन, युनिटेरिअन ख्रिस्ती पाद्री
आधुनिक विज्ञान हे बौद्ध धर्मातील अनित्यता आणि अनात्मवादाच्या सिद्धांताचे प्रतिध्वनी होय. — डॉ. रंजन रॉय
दिर्घकाळापर्यंत मानवावर बाह्य शक्तींनी अधिकार गाजवला आहे. जर तो खरोखरच सुसंस्कृत व्हावयाचा असेल तर त्याने स्वत:च्या तत्वानुसार स्वशासनाचा स्विकार करावा. बौद्ध धर्म यात जगातील पहिली नैतिक विचारधारा आहे. जिच्यामध्ये मानवास आत्मनियमन (स्वशासन) करण्याची शिकवण दिलेली आहे. म्हणूनच प्रगतीशील जगाला ही सर्वोच्छ शिकवण देण्यासाठी बौद्ध धर्माची आवश्यकता आहे. — इ. जी. टेलर
जेव्हा आम्ही निसर्गाचा ग्रंथ उघडतो, तेव्हा कोट्यवधी संवत्सरांतील रक्त आणि अश्रूंनी लिहिलेली उत्क्रांतीची गाथा वाचतो, जेव्हा जीवन नियंत्रणाचे नियम आणि विकासाच्या उत्पत्तीस कारणीभूत होणारे नियम आपण अभ्यासतो, तेव्हा ईश्वर प्रेमरूप आहे हे मत किती भसवे आहे याची जाणिव होते. बुद्धाचा धर्म हा कितीतरी निराळा धर्म आहे. — विनवुड रीड
बौद्ध धर्माने मानवात प्रछन्न असलेल्या अंत:सामर्थ्यांच्या शोधाकडे मानवाचे लक्ष वेधले. वेदांमध्ये आपणांस प्रार्थना, पुजा, प्रशंसा आढळते. बौद्ध धर्मात प्रथम सदाचारास प्रवृत्त होण्यासाठी चित्ताच्या (मानसिक) संस्काराचे महत्त्व सांगितल्याचे आढळते. — आर. जे. जॅक्सन
बौद्ध धर्म एक अदभुत धर्म नि तत्त्वज्ञान आहे. — मार्क झुकेरबर्ग
ऐतिहासिक थोर धर्मांपैकी मी बौद्ध धर्माला पसंत करतो. — बर्ट्रांड रसेल
“बुद्धांच्या ह्रदयाचा एक लक्षांशही मला लाभला तर मी स्वत:ला धन्य मानले असते.” — स्वामी विवेकानंद
“अवघ्या जगामध्ये बुद्धच असे एकमेव महापुरूष आहेत की ज्यांनी यज्ञातील पशूहत्या थांबविण्यासाठी यज्ञात पशूच्या ऐवजी स्वत:चे जीवन बळी देण्याची तयारी दाखवली.” — स्वामी विवेकानंद
“बौद्ध धर्म हा जगातील पहिला प्रचारक धर्म होता आणि त्याने त्या काळातील सगळ्या सभ्य जगात प्रवेश केला, आणि तरीही या धर्माच्या प्रचारार्थ रक्ताचा एक थेंबही सांडावा लागला नाही.” — स्वामी विवेकानंद
“बुद्ध हे इतर सर्व धर्माचार्यांपेक्षा अधिक साहसी, अधिक प्रांजळ होते. ते म्हणाले होते की, "कोणत्याही शास्त्रावर विश्वास ठेवू नका. वेद हे थापाडे आहेत. शास्त्रे जर माझ्या अनुभूतींशी वा उपलब्धींशी जुळतील तर ते त्या शास्त्रांचेच भाग्य. सर्वात श्रेष्ठ शास्त्र स्वत: मीच आहे. यागयज्ञ आणि देवदेवतार्चन निष्फळ होय जगाला सर्वांग सुंदर नीतिशास्त्रीची शिकवण देणारे बुद्ध हेच पहिले मानव होते.” — स्वामी विवेकानंद
“बुद्ध हे एक थोर समाज सुधारक होते. भारतातील थोर तत्त्वज्ञांमध्ये बुद्ध हेच असे एकमेव होते की ज्यांना जातिभेद मान्य नव्हता... इतर सर्वच दार्शनिकांनी वा तत्त्वज्ञांनी थोड्याबहूत प्रमाणात सामाजिक अंधविश्वासांना कुरवाळलेच आहे. समाजाच्या खुळचट समजुतींची खुशामत केली आहे.” — स्वामी विवेकानंद
“भगवान बुद्धांसारखा त्यागी महापुरूष या अवनीतलावर अन्य कुणी झाला नाही.” — स्वामी विवेकानंद
“मानवामानवातच काय पण मनुष्य आणि पशू यांमध्ये देखील जी विषमता आढळते तिचा बुद्धांनी निषेध केला. ‘सर्व जीव समान आहेत’ असा उपदेश बुद्ध करीत. बुद्धांनीच सर्वप्रथम मद्यपाननिर्षधाचा पुरस्कार केला आहे.” — स्वामी विवेकानंद
“जगातील सर्व आचार्यांमध्ये वा धर्म संस्थापकांमध्ये बुद्ध हे एकटेच असे आहेत की ज्यांच्या कार्याला बाहेरील कोणताही हेतू प्रेरक नव्हता. इतर सर्वांनीच आपण ईश्वरावतार, ईश्वरदूत, ईश्वरपुत्र आहोत अशी घोषणा केलेली आहे, आणि ते असेही सांगून गेले आहेत की, त्यांच्यावर जो विश्वास ठेवील तोच स्वर्गी जाईल, मुक्त होईल. पण बुद्ध मृत्यूच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हेच म्हणत असत, “कुणीही तुम्हाला मुक्त होण्यासाठी साहाय्य करू शकणार नाही. स्वत:च स्वत:ला साहाय्य करा, स्वत:च्याच प्रयत्नांची मुक्तिलाभाची कास धरा.” स्वत: संबंधी ते म्हणत, "बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशाप्रमाणे अनंत ज्ञानसंपन्न; मी सिद्धार्थ गौतमाने ती अवस्था प्राप्त करून घेतली आहे. तुम्हीही जर तिच्यासाठी प्राण पणास लावून प्रयत्न कराल तर तुम्हालीही ‘बुद्धत्व’ प्राप्ती होऊ शकेल." ” — स्वामी विवेकानंद
“भारतात आज हे जे संन्याशांचे मठ वैगरे दिसतात ते सारे बौद्ध धर्माच्या अधिकाराखाली होते. हिंदूनी आता त्या साऱ्यांना आपल्या रंगाने रंगवून स्वत:चे करून घेतले आहे. बुद्धांपासूनच यथार्थ संन्यासाश्राचा पाया रचला गेला. त्यांनीच संन्यासाश्राच्या मृत सांगड्यात प्राण ओतले.” — स्वामी विवेकानंद
“बुद्धांचा हजारावा अंश माझ्यात असता तर मी स्वत: ला धन्य समजलो असतो.” — स्वामी विवेकानंद
“बुद्धांनी प्रचंड शक्तीशाली सत्याची शिकवण दिली. सर्व जगाला त्यांनी भेदभाव न करता शिकवले, कारण ‘मानवाची समानता’ हा त्यांच्या महान संदेशांपैकी एक संदेश होता. सर्व मानसे समान आहे, याला काही अपवाद नाही.” — स्वामी विवेकानंद
“बुद्ध हे समतेचे महान उपदेशक होते. आध्यात्मिकता प्राप्त करून घेण्याचा प्रत्येक पुरूषाला व स्त्रीला सारखाच हक्क आहे. ही त्यांची शिकवण होती.” — स्वामी विवेकानंद[१७]
भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला सदाचार शिकवणारा पहिला महापुरूष भगवान बुद्ध होय. — डॉ. बाबासाहेब आंबेडकर
हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर. — तुकडोजी महाराज
गौतम बुद्धांनंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव जगाने किंवा भारताने आजपर्यंत निर्माण केला नाही. — ओशो (रजनीश)
शाक्यमुनी गौतम बुद्धांखेरीज संपूर्ण मानवजातीत येशू ख्रिस्तांएवढा थोर पुरुष दुसरा झाला नाही. — रेनन
जगातल्या सर्व धर्मसंस्थापकास भगवान बुद्ध हेच फक्त असे थोर होते की, जे आपली मुक्तीसाध्य करण्याच्या मानवी सामर्थ्याचा स्वाभाविक मोठेपणा बरोबर ओळखू शकले. मानवतेची योग्यता उंचावण्याच्या कर्तृत्वात जर खऱ्या थोर माणसाचे मोठेपण सामावले असेल तर खरा थोर असा तथागताशिवाय दुसरा कोण असू शकेल? बुद्धांनी मानवाच्या वर दुसरे कोणी संस्थापित करून त्याला हीन न करता प्रज्ञा (ज्ञान) व मैत्रीच्या (प्रेम) शिखरावर (त्याला) प्रस्थापित करून श्रेष्ठत्व प्राप्त करून दिले आहे. — ड्वाईट गोडार्ड
कलियुगी हरी बुद्ध रुपधरी ।

तुकोबा शरीरी प्रवेशला ।।

— संत बहिणाबाई
एकोनी बंका करित उत्तर ।

बौद्ध अवतार पांडुरंग ।।

— संत बंका
बुद्ध अवतार माझीया आदृष्टा ।

मौन्य मुखे निष्ठा धरियली ।

तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध

— संत तुकाराम
बुद्ध अवतारी आम्ही झालो संत ।

वर्णवया मात नामा म्हणे ।

— संत नामदेव

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "बौद्ध धर्म और विज्ञान". studybuddhism.com (hi मजकूर). 2018-03-16 रोजी पाहिले. 
 2. ^ "On downplaying the number of Buddhists worldwide • r/sgiwhistleblowers". reddit (en मजकूर). 2018-03-16 रोजी पाहिले. 
 3. ^ "Nigerian Clerics: Kicking God, Kissing The Dog By Ayo Opadokun | Sahara Reporters". Sahara Reporters. 2013-02-22. 2018-03-16 रोजी पाहिले. 
 4. ^ "Buddhism by country from wiki". thetruelordbuddha.blogspot.in (en मजकूर). 2018-03-16 रोजी पाहिले. 
 5. ^ "List of Religious Populations | List Religious Populations". www.liquisearch.com. 2018-03-16 रोजी पाहिले. 
 6. ^ "Buddhists in the World - The Dhamma - thedhamma.com - Vipassana Foundation". www.thedhamma.com. 2018-03-16 रोजी पाहिले. 
 7. ^ "क्रांती-प्रतिक्रांतीचा सिद्धान्त". Loksatta (mr-IN मजकूर). 2016-05-25. 2018-03-16 रोजी पाहिले. 
 8. ^ १.६ अब्ज (२२%) अनुयायी असलेल्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म - बौद्ध धर्म
 9. ^ जपानमध्ये बौद्ध धर्म
 10. ^ व्हिएतनाम मध्ये बौद्ध धर्म
 11. ^ व्हिएतनाम मध्ये बौद्ध धर्म
 12. ^ २००१ च्या जनगणेतील बौद्ध लोकसंख्या ५%
 13. ^ तैवान मधील धार्मिक लोकसंख्या
 14. ^ बौद्ध धर्म आणि श्रीलंकन संस्कृती
 15. ^ श्रीलंका
 16. ^ लाओस मधील धार्मिक लोकसंख्या
 17. ^ संदर्भ - भगवान बुद्ध आणि त्यांची शिकवण : लेखक - स्वामी विवेकानंद


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: