भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९
ऑस्ट्रेलिया
भारत
तारीख २१ नोव्हेंबर २०१८ – १२ जानेवारी २०१९
संघनायक ॲरन फिंच (ट्वेंटी२०)
टिम पेन (कसोटी)
विराट कोहली
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा मार्कस हॅरिस (२५८) चेतेश्वर पुजारा (५२१)
सर्वाधिक बळी नेथन ल्यॉन (२१) जसप्रीत बुमराह (२१)
मालिकावीर चेतेश्वर पुजारा (भारत)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा शॉन मार्श (२२४) महेंद्रसिंग धोनी (१९३)
सर्वाधिक बळी झाय रिचर्डसन (६) भुवनेश्वर कुमार (८)
मालिकावीर महेंद्रसिंग धोनी (भारत)
२०-२० मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा ग्लेन मॅक्सवेल (७८) शिखर धवन (११७)
सर्वाधिक बळी ॲडम झाम्पा (३) कृणाल पंड्या (५)
मालिकावीर शिखर धवन (भारत)

भारत क्रिकेट संघ सध्या २१ नोव्हेंबर २०१८ ते १२ जानेवारी २०१९ दरम्यान ४ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे.[१] खरेतर ॲडलेड येथे होणारी पहिली कसोटी ही दिवस-रात्र कसोटी म्हणून खेळवली जाणार होती, पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा हा प्रस्ताव बीसीसीआयने नाकारला.[२] एप्रिल २०१८ मध्ये पश्चिम ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनने पर्थ येथील नव्या पर्थ स्टेडियमवर पहिली वहिली कसोटी खेळवली जाईल अशी घोषणा केली.[३] दोन संघांमधील दुसरी कसोटी ह्या नव्या मैदानावर खेळवली गेली आणि हे मैदान कसोटी क्रिकेटसाठीचे ऑस्ट्रेलियाचे दहावे मैदान ठरले.[४]

मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारताचा नियमित यष्टीरक्षक, महेंद्रसिंह धोनीचा या दौऱ्यावरील टी२० आणि वेस्टइंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवडण्यात आले नाही.[५] त्याऐवजी धोनीच्या जागी भारताचा कसोटी विकेटकीपर ऋषभ पंतची निवड केली गेली.[६] २ऱ्या ट्वेंटी२० सामन्याचा निकाल लागला नाही त्यामुळे ट्वेंटी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.[७] भारताने कसोटी मालिका २-१ ने जिंकली.[८] भारताने ऑस्ट्रेलियन भूमिवर प्रथमच कसोटी मालिका जिंकली.[९] भारताने पहिल्यांदाज ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.

संघ[संपादन]

कसोटी एकदिवसीय ट्वेंटी२०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत[१०] ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[११] भारतचा ध्वज भारत[१२] ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[१३] भारतचा ध्वज भारत[१४]

भारताचा नियमीत मर्यादित षटकांच्या सामन्याचा यष्टीरक्षक असलेल्या महेंद्रसिंग धोनीला या दौऱ्यातील आणि वेस्ट इंडीजविरूद्धच्या ट्वेंटी२० मालिकेतून वगळण्यात आले.[१४] त्याच्याजागी कसोटीत यष्टीरक्षण करणारा रिषभ पंतची निवड करण्यात आली.[१४] पृथ्वी शाॅ घोट्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला तर त्याच्याजागी मयंक अगरवालची निवड करण्यात आली.[१५] हार्दिक पंड्यालाही कसोटीसाठी संघात घेण्यात आले.[१६] चौथ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघात मार्नस लेबसचग्नेचा समावेश करण्यात आला.[१७] एकदिवसीय मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली तर त्याच्याजागी मोहम्मद सिराजची भारतीय संघात करण्यात आली.[१८] पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी मिचेल मार्श आजारी पडल्यामुळे त्याच्याजागी ऑस्ट्रेलिया अंतिम १२ मध्ये ॲश्टन टर्नरला घेण्यात आले.[१९]

११ जानेवारी रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय कार्यक्रम कॉफी विथ करणवर केलेल्या विवादित वक्तव्यामुळे लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्याला एकदिवसीय मालिकेतून तसेच न्यू झीलंडच्या संपूर्ण दौऱ्यातून निलंबीत केले.[२०][२१] त्यांच्याजागी विजय शंकरला संघात घेतले.[२२]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२१ नोव्हेंबर २०१८
१७:५० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१५८/४ (१७ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६९/७ (१७ षटके)
शिखर धवन ७६ (४२)
ॲडम झाम्पा २/२२ (४ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ धावांनी विजयी (ड/लु).
द गॅब्बा, ब्रिस्बेन
पंच: सायमन फ्राय (ऑ) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: ॲडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १७-१७ षटकांचा करण्यात आला.
  • डकवर्थ-लुईस पद्धतीचा वापर करून भारताला १७ षटकांत १७४ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.


२रा सामना[संपादन]

२३ नोव्हेंबर २०१८
१८:५० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१३२/७ (१९ षटके)
वि
सामन्याचा निकाल लागला नाही.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: गेरार्ड अबूड (ऑ) आणि सायमन फ्राय (ऑ)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
  • ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.


३रा सामना[संपादन]

२५ नोव्हेंबर २०१८
१८:५० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१६४/६ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६८/४ (१९.४ षटके)
डार्सी शॉर्ट ३३ (२९)
कृणाल पंड्या ४/३६ (४ षटके)
विराट कोहली ६१* (४१)
ॲडम झाम्पा १/२२ (४ षटके)
भारतचा ध्वज भारत ६ गडी आणि २ चेंडू राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
पंच: गेरार्ड अबूड (ऑ) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: कृणाल पंड्या (भारत)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.


सराव सामना[संपादन]

चार-दिवसीय सामना: क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश वि. भारत[संपादन]

२९ नोव्हेंबर - १ डिसेंबर २०१८
धावफलक
वि
३५८ (९२ षटके)
पृथ्वी शाॅ ६६ (६९)
ॲरन हार्डी ४/५० (१३ षटके)
५४४ (१५१.१ षटके)
हॅरी निल्सन १०० (१७०)
मोहम्मद शमी ३/९७ (२४ षटके)
२११/२ (४३.४ षटके)
मुरली विजय १२९ (१३२)
डार्सी शॉर्ट १/३४ (६ षटके)
सामना अनिर्णित.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
पंच: गेरार्ड अबूड (ऑ) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: हॅरी निल्सन (क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश)
  • नाणेफेक: क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश, गोलंदाजी.
  • पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.


कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

६-१० डिसेंबर २०१८
धावफलक
वि
२५० (८८ षटके)
चेतेश्वर पुजारा १२३ (२४६)
जोश हेझलवूड ३/५२ (२० षटके)
२३५ (९८.४ षटके)
ट्रॅव्हिस हेड ७२ (१६७)
जसप्रीत बुमराह ३/४७ (२४ षटके)
३०७ (१०६.५ षटके)
चेतेश्वर पुजारा ७१ (२०४)
नेथन ल्यॉन ६/१२२ (४२ षटके)
२९१ (११९.५ षटके)
शॉन मार्श ६० (१६६)
मोहम्मद शमी ३/६५ (२० षटके)
भारतचा ध्वज भारत ३१ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि नायजेल लॉंग (इं)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • मार्कस हॅरीस (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.
  • चेतेश्वर पुजाराच्या (भा) ५,००० कसोटी धावा पूर्ण.
  • रिषभ पंतने (भा) भारतातर्फे खेळताना यष्टीरक्षक म्हणून कसोटीत महेंद्रसिंग धोनीचा सर्वाधिक १० झेल घेण्याचा विक्रम ११ झेल घेऊन मोडला.
  • या सामन्यात तब्बल ३५ बळी झेलचीत झाले.
  • भारताने ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिकेतील पहिली कसोटी जिंकली.
  • या विजयाने विराट कोहली कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व ऑस्ट्रेलियात एका वर्षात एकतरी कसोटी जिंकणारा आशियातील कोणत्याही देशाचा पहिला कर्णधार ठरला.


२री कसोटी[संपादन]

१४-१८ डिसेंबर २०१८
धावफलक
वि
३२६ (१०८.३ षटके)
मार्कस हॅरीस ७० (१४१)
इशांत शर्मा ४/४१ (२०.३ षटके)
२८३ (१०५.५ षटके)
विराट कोहली १२३ (२५७)
नेथन ल्यॉन ५/६७ (३४.५ षटके)
२४३ (९३.२ षटके)
उस्मान ख्वाजा ७२ (२१३)
मोहम्मद शमी ६/५६ (२४ षटके)
१४० (५६ षटके)
अजिंक्य रहाणे ३० (४७)
नेथन ल्यॉन ३/३९ (१९ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४६ धावांनी विजयी.
पर्थ स्टेडियम, पर्थ
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि क्रिस गॅफने (न्यू)
सामनावीर: नेथन ल्यॉन (ऑस्ट्रेलिया)


३री कसोटी[संपादन]

२६-३० डिसेंबर २०१८
धावफलक
वि
४४३/७घो (१६९.४ षटके)
चेतेश्वर पुजारा १०६ (३१९)
पॅट कमिन्स ३/७२ (३४ षटके)
१५१ (६६.५ षटके)
मार्कस हॅरीस २२ (३५)
जसप्रीत बुमराह ६/३३ (१५.५ षटके)
१०६/८घो (३७.३ षटके)
मयंक अगरवाल ४२ (१०२)
पॅट कमिन्स ६/२७ (११ षटके)
२६१ (८९.३ षटके)
पॅट कमिन्स ६३ (११४)
जसप्रीत बुमराह ३/५३ (१९ षटके)
भारतचा ध्वज भारत १३७ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि इयान गुल्ड (इं)
सामनावीर: जसप्रीत बुमराह (भारत)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • पावसामुळे पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात खेळ होऊ शकला नाही.
  • मयंक अगरवाल (भा) याने कसोटी पदार्पण केले.
  • चेतेश्वर पुजाराचे (भा) १७वे कसोटी शतक.
  • या विजयाने भारताने बॉर्डर-गावसकर चषक राखला.
  • भारताचा हा १५०वा कसोटी विजय, असा पराक्रम करणारा भारत ५वा देश ठरला.
  • विराट कोहली ऑस्ट्रेलिया मध्ये दोन कसोटी जिंकणारा भारताचा पहिला कर्णधार ठरला.
  • भारताचा इतिहासात प्रथमच बॉक्सिंग डे कसोटीत विजय तर बॉक्सिंग डे कसोटी जिंकणारा भारत पहिलाच आशियाई देश.


४थी कसोटी[संपादन]

३-७ जानेवारी २०१९
धावफलक
वि
६२२/७घो (१६७.२ षटके)
चेतेश्वर पुजारा १९३ (३७३)
नेथन ल्यॉन ४/१७८ (५७.२ षटके)
३०० (१०४.५ षटके)
मार्कस हॅरीस ७९ (१२०)
कुलदीप यादव ५/९९ (३१.५ षटके)
६/० (४ षटके) (फॉ/ऑ)
उस्मान ख्वाजा* (१२)
सामना अनिर्णित.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
पंच: इयान गुल्ड (इं) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: चेतेश्वर पुजारा (भारत)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • अपुरा सुर्यप्रकाश आणि पावसामुळे तिसऱ्यादिवशी सायंकाळी ४.२५ ते चौथ्या दिवशी दुपारी १:५० पर्यंत खेळ होऊ शकला नाही. तसेच ४थ्या दिवशी ३ऱ्या सत्रातील तसेच ५व्या पूर्ण दिवसाचा खेळ होऊ शकला नाही.
  • चेतेश्वर पुजाराचे १८वे तर ऋषभ पंतचे २रे कसोटी शतक.
  • ऋषभ पंत (भा) ऑस्ट्रेलियात शतक करणारा भारताचा पहिलाच यष्टीरक्षक ठरला.[२३]


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

१२ जानेवारी २०१९
१३:२० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२८८/५ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२५४/९ (५० षटके)
पीटर हॅंड्सकोंब ७३ (६१)
कुलदीप यादव २/५४ (१० षटके)
रोहित शर्मा १३३ (१२९)
झाय रिचर्डसन ४/२६ (१० षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३४ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: झाय रिचर्डसन (ऑस्ट्रेलिया)


२रा सामना[संपादन]

१५ जानेवारी २०१८
१३:५० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२९८/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२९९/४ (४९.२ षटके)
शॉन मार्श १३१ (१२३)
भुवनेश्वर कुमार ४/४५ (१० षटके)
विराट कोहली १०४ (११२)
ग्लेन मॅक्सवेल १/१६ (४ षटके)
भारतचा ध्वज भारत ६ गडी आणि ४ चेंडू राखून विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
पंच: रिचर्ड केटलबोरो (इं) आणि सॅम नोजस्की (ऑ)
सामनावीर: विराट कोहली (भारत)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • मोहम्मद सिराज (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


३रा सामना[संपादन]

१८ जानेवारी २०१८
१३:२० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३० (४८.४ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२३४/३ (४९.२ षटके)
महेंद्रसिंग धोनी ८७* (११४)
झाय रिचर्डसन १/२० (१० षटके)
भारतचा ध्वज भारत ७ गडी आणि ४ चेंडू राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: युझवेंद्र चहल (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • विजय शंकर (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).
  2. ^ "दिवस रात्र कसोटीचा प्रस्ताव भारताने नाकारला".
  3. ^ "पर्थ स्टेडियम वर पहिली कसोटी. लाल चेंडू उठवणार वादळ". Archived from the original on 2018-10-02. 2018-11-02 रोजी पाहिले.
  4. ^ "इंडिया ॲंड ऑस्ट्रेलिया बॅट्समेन स्टील फॉर टेस्टींग टाईम ॲट 'न्यू' पर्थ".
  5. ^ "महेंद्रसिंग धोनीला वेस्टइंडीज व ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेमधून वगळले". टाइम्स ऑफ इंडिया.
  6. ^ "वेस्ट इंडीज विरुद्ध टी२० मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती; धोनीला वेस्टइंडीज व ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेमधून वगळले". स्क्रोल.
  7. ^ "कम्पोस्ड कोहली गाईड्स इंडिया टू विक्ट्री".
  8. ^ "विराट सेनेचे अभूतपुर्व यश, कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय".
  9. ^ "भारताने कांगारूंना त्यांच्याच मायदेशात ठेचले, ऐतिहासिक कसोटी विजय".
  10. ^ "रोहित, विजय व पार्थिव जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर, हार्दिक पंड्या अजूनही दुखापतग्रस्तच".
  11. ^ "ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ जाहीर".
  12. ^ "ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदिवसीय तर न्यू झीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर". Archived from the original on 2018-12-24. 2018-12-25 रोजी पाहिले.
  13. ^ "स्टार्क, मार्श आणि ल्यॉनला ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी२० संघातून वगळले".
  14. ^ a b c "धोनीला ट्वेंटी२० संघातून डच्चू, वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी रिषभ पंतची यष्टीरक्षक म्हणून निवड".
  15. ^ "उर्वरीत दौऱ्याला शॉ मुकणार, भारताला मोठा धक्का".
  16. ^ "पंड्याचे कसोटीत पुनरागमन".
  17. ^ "लेबसचग्ने खेळणार चौथ्या कसोटीत, मिचेल मार्शला विश्रांती".
  18. ^ "बुमराहला विश्रांती ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड एकदिवसीयसाठी सिराज रवाना".
  19. ^ "मिचेल मार्शच्या अनुपस्थीतीत टर्नर खेळणार".
  20. ^ "पंड्या आणि राहुल निलंबित".
  21. ^ "विवादित प्रकरण भोवले". International Cricket Council. 11 January 2019 रोजी पाहिले.
  22. ^ "शुभमन गिल ला भारतीय संघात स्थान".
  23. ^ "दुसर्‍या कसोटी शतकासह पंत रेकॉर्ड बुक मध्ये". इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]