कुलदीप यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कुलदीप यादव (१४ डिसेंबर, इ.स. १९९४ - ) हा उत्तर प्रदेशकडून खेळणारा भारत भारतीय क्रिकेटपटू आहे. हा मंदगती डावखोरा चायनामन गोलंदाज, १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१४ मध्ये भारत १९ वर्षांखालील क्रिकेट संघकडून खेळला होता, ज्यात त्याने स्कॉटलंड संघाविरुद्ध हॅटट्रीक घेतली होती.

२०१२ मध्ये त्याला मुंबई इंडियन्स संघाने, आणि २०१४ मध्ये त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने करारबद्ध केले, त्या संघाचे २०१४ चॅंपियन्स लीग ट्वेंटी२० स्पर्धेत त्याने प्रतिनिधीत्व केले.

ऑक्टोबर २०१४ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली, परंतु एकाही सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.[१] फेब्रुवारी २०१७ मध्ये बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यामध्ये त्याची भारतीय कसोटी संघामध्ये निवड झाली[२] पण अकरा खेळाडूंत तो नव्हता.

यादवने २५ मार्च, २०१७ रोजी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथे कसोटी पदार्पण केले व ६८ धावा देउन ४ बळी मिळविले.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "वेस्ट इंडीज एकदिवसीय मालिकेसाठी कुलदीप यादवची भारतीय संघात निवड" (इंग्रजी भाषेत). २० फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "जायबंदी मिश्राऐवजी कुलदीप यादव". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.