२०१८ आशिया चषक
२०१८ आशिया चषक | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | आशिया क्रिकेट संघटन | ||
क्रिकेट प्रकार | एकदिवसीय सामने | ||
स्पर्धा प्रकार | साखळी फेरी, सुपर ४ आणि अंतिम सामना | ||
यजमान | संयुक्त अरब अमिराती | ||
विजेते | भारत (7 वेळा) | ||
सहभाग | ६ | ||
सामने | १३ | ||
मालिकावीर | शिखर धवन | ||
सर्वात जास्त धावा | शिखर धवन (३४२) | ||
सर्वात जास्त बळी |
रशीद खान (१०) मुस्तफिझुर रहमान (१०) कुलदीप यादव (१०) | ||
|
२०१८ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा असणार आहे. आशिया चषक मालिकेतील ही १४वी स्पर्धा भारतात सप्टेंबर २०१८ होणार असून ह्यात ६ संघ सामिल होतील.
ठरावानुसार स्पर्धा भारतात होणार होती पण भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील राजकीय तणाव आणि दोन्ही देशांच्या सिमेवरील भीषण तणावामुळे स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीला हलविण्यात आली.
स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेवर ९१ धावांनी अभूतपुर्व विजय मिळवला व श्रीलंकेला स्पर्धेतून बाहेर फेकले. ब गटातून दोन्ही साखळी सामने हारल्याने श्रीलंका स्पर्धेतून बाद झाला तर बांग्लादेश आणि अफगाणिस्तान सुपर ४ साठी पात्र ठरले. तर अ गटातून भारत व पाकिस्तान सुपर ४ साठी पात्र ठरले. गट फेरीत अफगाणिस्तान व भारताने दोन्ही सामने जिंकले तर बांग्लादेश व पाकिस्तान यांनी प्रत्येकी १-१ सामने जिंकले. श्रीलंका व हाँग काँगने एकही सामना जिंकला नाही आणि साखळी फेरीतच त्यांचे आव्हान संपुष्टात आले.
सुपर ४ फेरीतून भारत व बांग्लादेशनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात भारताने शेवटच्या चेंडूवर बांग्लादेशवर विजय मिळवत आशिया चषक ७व्यांदा पटकाविला.
पात्र संघ
[संपादन]क्र. | संघ | पात्रता |
---|---|---|
१. | भारत | आय.सी.सी पूर्ण सदस्य, |
२. | पाकिस्तान | आय.सी.सी पूर्ण सदस्य |
३. | श्रीलंका | आय.सी.सी पूर्ण सदस्य |
४. | बांगलादेश | आय.सी.सी पूर्ण सदस्य |
५. | अफगाणिस्तान | आय.सी.सी पूर्ण सदस्य |
६. | हाँग काँग | २०१८ आशिया चषक पात्रता |
संघ
[संपादन]अफगाणिस्तान | बांगलादेश | भारत | पाकिस्तान | श्रीलंका | हाँग काँग |
---|---|---|---|---|---|
स्पर्धेच्या आधी दुखापत झाल्यामुळे अफगाणिस्तानच्या संघात वफादार मोमंदच्याएेवजी यामीन अहमदझाईला सामील केले गेले. स्पर्धेआधी मोमिनुल हकला बांग्लादेशच्या संघात घेतले गेले. दिनेश चंदिमल व दनुष्का गुणथिलका स्पर्धेतून बाद झाले तर त्याच्याजागी निरोशन डिकवेल्ला व शेहान जयसुर्याला श्रीलंकेच्या संघात घेतले गेले. पहिल्या सामन्यात बोटाचे हाड मोडल्यामुळे बांग्लादेशचा तमीम इक्बाल संपूर्ण स्पर्धेतून बाद झाला.
भारत व पाकिस्तान यांच्या सामन्यानंतर दुखापत झाल्या कारणाने हार्दिक पंड्या, अक्षर पटेल व शार्दुल ठाकूर स्पर्धेतून बाहेर पडले तर त्यांच्याजागी भारतीय संघात रविंद्र जडेजा, दीपक चाहर व सिद्धार्थ कौल यांना घेतले गेले. सुपर ४ फेरी आधी बांग्लादेशी संघात सौम्य सरकार आणि इमरूल केस यांना घेण्यात आले.
मैदाने
[संपादन]संयुक्त अरब अमिराती | |
---|---|
दुबई | अबु धाबी |
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम | शेख झायेद क्रिकेट स्टेडियम |
प्रेक्षक क्षमता: २५,००० | प्रेक्षक क्षमता: २०,००० |
सामने: ८ | सामने: ५ |
गट फेरी
[संपादन]गट 'अ'
[संपादन]संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|
भारत | २ | २ | ० | ० | ० | ४ | +१.४७४ |
पाकिस्तान | २ | १ | १ | ० | ० | २ | +०.२८४ |
हाँग काँग | २ | ० | २ | ० | ० | ० | -१.७४८ |
सुपर ४ साठी पात्र.
वि
|
||
- नाणेफेक : हाँग काँग, फलंदाजी
- बाबर आझम (पाक) एकदिवसीय सामन्यात २००० हजार धावा काढणारा संयुक्त वेगवान फलंदाज ठरला.
- गुण : पाकिस्तान - २, हाँग काँग - ०
वि
|
||
- नाणेफेक : हाँग काँग, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : खलील अहमद (भा)
- निजाकत खान व अंशुमन रथ यांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात हाँग काँगसाठीची १७४ धावांची सर्वोच्च सलामी भागीदारी रचली.
- ह्या सामन्याच्या निकालामुळे हाँग काँग स्पर्धेतून बाद तर भारत व पाकिस्तान सुपर ४ साठी पात्र
- गुण : भारत - २, हाँग काँग - ०
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- वनडेत भारताचा चेंडूच्या बाबतीत पाकिस्तानवर मोठा विजय. (१२६ चेंडू)
- गुण : भारत - २, पाकिस्तान - ०
गट 'ब'
[संपादन]संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|
अफगाणिस्तान | २ | २ | ० | ० | ० | ४ | +२.२७० |
बांगलादेश | २ | १ | १ | ० | ० | २ | +०.०१० |
श्रीलंका | २ | ० | २ | ० | ० | ० | -२.२८० |
सुपर ४ साठी पात्र.
वि
|
||
- नाणेफेक : बांग्लादेश, फलंदाजी.
- श्रीलंकेच्या १२४ धावा ह्या एकदिवसीय सामन्यात बांग्लादेशविरूद्धच्या निचांकी धावा.
- गुण : बांग्लादेश - २, श्रीलंका - ०
वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
- अफगाणिस्तानचा एकदिवसीय सामन्यामध्ये श्रीलंकेवरचा पहिला विजय.
- ह्या सामन्याच्या निकालामुळे श्रीलंका स्पर्धेतून बाद तर बांग्लादेश व अफगाणिस्तान सुपर ४ साठी पात्र
- गुण : अफगाणिस्तान - २, श्रीलंका - ०
वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : अबु हैदर आणि नझमुल होसेन शांतो (बां)
- गुण : अफगाणिस्तान - २, बांग्लादेश - ०
सुपर ४
[संपादन]संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|
भारत | ३ | २ | ० | १ | ० | ५ | +०.८६३ |
बांगलादेश | ३ | २ | १ | ० | ० | ४ | -०.१५६ |
पाकिस्तान | ३ | १ | २ | ० | ० | २ | -०.५९९ |
अफगाणिस्तान | ३ | ० | २ | १ | ० | १ | -०.०४४ |
अंतिम सामन्यासाठी पात्र.
वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- गुण : भारत - २, बांग्लादेश - ०
वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : शहीन अफ्रिदी (पाक)
- गुण : पाकिस्तान - २, अफगाणिस्तान - ०
वि
|
||
शिखर धवन ११४ (१००)
|
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
- युझवेंद्र चहलचे (भा) ५० एकदिवसीय बळी.
- रोहित शर्माचे (भा) ७,००० एकदिवसीय धावा.
- ह्या सामन्याच्या निकालामुळे भारत अंतिम सामन्यासाठी पात्र
- गुण : भारत - २, पाकिस्तान - ०
वि
|
||
- नाणेफेक : बांग्लादेश, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : नझमूल इस्लाम (बां)
- ह्या सामन्याच्या निकालामुळे अफगाणिस्तान स्पर्धेतून बाद
- मशरफे मोर्ताझाचे (बां) २५० एकदिवसीय बळी.
वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : दीपक चाहर (भा)
- महेंद्रसिंग धोनीचा (भा) भारताचा कर्णधार म्हणून २००वा एकदिवसीय सामना.
वि
|
||
- नाणेफेक : बांग्लादेश, फलंदाजी
- आशिया चषकाच्या एकदिवसीय प्रकाराच्या इतिहासात बांग्लादेशचा पाकिस्तानवरचा पहिलाच विजय.
- मुशफिकुर रहिम (बां) बांग्लादेशचा एकदिवसीय सामन्यात ९९ धावांवर बाद होणारा प्रथम खेळाडू.
- ह्या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान स्पर्धेतून बाद तर बांग्लादेश अंतिम सामन्यासाठी पात्र
अंतिम सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- लिटन दासचे (बां) पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक.
- भारताने आशिया चषक ७व्यांदा जिंकला.