बहामनी सल्तनत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बहामनी सल्तनत
इ.स. १३४७इ.स. १५२७


Bahamani-sultanate-map.svg
राजधानी १.गुलबर्गा (१३४७-१४२५),२.बिदर (१४२५-१५२७)
शासनप्रकार राजतंत्र
बहामनी सल्तनतीचा विस्तार दर्शवणारा आधुनिक नकाशा. गुलबर्ग्याचे स्थान बिंदूने दाखवले आहे.

बहामनी सल्तनत (मराठी लेखनभेद: बहमनी सल्तनत) ही इ.स.च्या १४व्या१५व्या शतकांत अस्तित्वात असलेली दक्षिण भारतातील पहिली स्वतंत्र इस्लामी सल्तनत होती. आजच्या कर्नाटकातील गुलबर्गा आणि बीदर येथे या सल्तनतीची प्रमुख ठाणी होती.

मूळच्या [बादाख्शान]] येथील ताजिक वंशात जन्मलेल्या अल्ला‍उद्दीन हसन बहामनी उर्फ हसनगंगू याने इ.स. १३४७ साली ही सल्तनत स्थापली. बहामनी राज्याची राजभाषा मराठी होती, हसनच्या नंतर त्याचा पुत्र मुहम्मदशा प्रथम हा सुलतान बनला व त्याच्याच काळात सर्वप्रथम स्फोटक दारूचा वापर बुक्का विरुद्ध करण्यात आला.इ.स. १५१८नंतर हिचे तुकडे पडून अहमदनगराची निजामशाही, वऱ्हाडातील इमादशाही, बीदर येथील बरीदशाही, विजापुरातील आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही अश्या पाच सल्तनती उदयास आल्या.