Jump to content

निलेश लंके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निलेश लंके

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २०२४
मतदारसंघ राहुरी विधानसभा मतदारसंघ

जन्म १० मार्च , १९८०
हंगा, पारनेर
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार
वडील ज्ञानदेव लंके
पत्नी राणीताई निलेश लंके
अपत्ये
निवास पारनेर अहमदनगर
व्यवसाय राजकारण
धर्म मराठा

निलेश ज्ञानदेव लंके हे एक भारतीय राजकारणी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ते महाराष्ट्रातील पारनेर मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडले गेले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकमधून त्यांनी मे २०१६ रोजी राज्यशास्त्र या विषयातील बीएची पदवी घेतली आहे. त्याला सर्व लोक प्रेमाने नेते असेही म्हणतात. लोकांना मदत करण्यासाठी कोविड सेंटरचे निरीक्षण करून कोविड महामारीच्या वेळी त्याच्या मतदार संघास मदत करण्यासाठी १ हजार बेडचे कोविड सेंटर उभारले आहे.[]

परिचय

[संपादन]

पारनेर हा दुष्काळी व पठारी भागाचा तालुका म्हणून ओळखला जातो. पारनेर तालुक्यातील हंगा या छोट्याशा गावात निलेश लंके यांचा जन्म 10 मार्च 1980 रोजी एका सामान्य कुटूंबात झाला. वडील ज्ञानदेव व आई शकुंतला यांनी त्यांचे नाव निलेश ठेवले. लहानपणापासून निलेश कुस्तीची आवड होती. त्यामुळे परिसरात ते पहिलवान म्हणून ओळखले जावू लागले. त्यांनी 1995 साली दहावी व 1997 साली बारावीची परिक्षा उत्तीर्ण केली. पुढे त्यांनी आयटीआय चे व्यवसायिक शिक्षण घेतले. याच वयात त्यांनी हंगा गावातील ग्रामपंचायत निवडणूकीला स्वतःचा पॅनल उभा करून अकरा जागांवर विजय मिळवून दिला. परंतु त्यांचे स्वतःचे वय कमी असल्याने त्यांनी निवडणूक लढविली नव्हती. या निवडणूकीमध्ये त्यांनी आपली चुनूक दाखवून दिली होती. निलेश लंके नावाच्या तरुणाचा कामगार ते आमदार पर्यंतचा प्रवास संघर्षमय आहे.

पारनेर तालुक्यात सुपा येथे औद्योगिक वसाहत आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगार मिळावा म्हणून त्यांनी तत्कालीन आमदारांच्या मागे शिफारशीसाठी बरेच फिरावे लागले. आमदारांचे शिफारस पत्र मिळावे म्हणून त्यांनी अनेक व्यक्तींच्या माध्यमातून प्रयत्न केले. परंतु त्यांना शिफारस पत्र ही मिळाले नाही आणि नोकरी ही मिळाली नाही. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी अहमदनगर येथील कायनेटीक कंपनीमध्ये दोन ते तीन वर्षे नोकरी केली. बालपणापासून समाजकार्याची आवड असल्याने नोकरीत त्यांचे मन रमले नाही. जनतेची सेवा करण्यात त्यांचा बराच वेळ जावू लागला. त्यामुळे नोकरीकडे त्यांचे दुर्लक्ष होत गेले. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने त्यांना कामावरून काढून टाकले.

अहमदनगर येथील नोकरी सोडून ते पुन्हा समाजकार्यात व गावच्या राजकारणात सक्रिय झाले. परंतु कौटूंबिक परिस्थितीमुळे हंगा गावच्या एसटी बस स्टँड वर त्यांनी एक छोटे चहाचे हॉटेल सुरू केले. समाजसेवा व परोपकारी स्वभावामुळे त्यांना चहासाठी लागणाऱ्या दुधाचे ही पैसे मिळत नसत. कार्यकर्त्यांना चहा पाजून पाजून शेवटी सुरू केलेले हॉटेल बंद करावे लागले. त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन किराणा मालाचे दुकान ही सुरू केले.

पारनेर मधील एका सभेत स्व. बाळासाहेब ठाकरे जात असताना निलेश लंके यांना त्यांचा आशिर्वाद मिळाला. त्याच दिवसापासून या तरुणाने आपले आयुष्य शिवसेनेसाठी वाहून घेण्याचे ठरविले. ऐन तारुण्यात त्यांना शिवसेनेचे तालुका प्रमुख हे पद मिळाले. माध्यमिक शाळेत असल्यापासूनच त्यांनी कार्यकर्ते गोळा करण्याचे काम सुरू केले होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव 2007 मध्ये त्यांनी पहिली पंचायत समितीची निवडणूक लढविली परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही. फार थोड्या मताने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण खचुन जाईल तो निलेश लंके कसला. त्यांच्या या नेतृत्व गुणांमुळे शिवसेनेनी त्यांना तालुका प्रमुख पद दिले. या माध्यमातून त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले व शेकडो वृद्धांना शासनाच्या विविध योजनेतून मिळणारा लाभ मिळवून दिला व अनेक गरीब व निराधारांचा आधार बनले. निलेश लंके प्रतिष्ठानची स्थापना करून अनेक सामाजिक उपक्रमाबरोबरच अनेक शासकिय योजना त्यांनी आपल्या गावासाठी आणल्या.

2010 मध्ये त्यांनी पुन्हा ग्रामपंचायतीला पॅनल निवडून आणत गावचे सरपंच झाले. इतरांना संधी मिळावी म्हणून ते या पदावर फक्त एक वर्षच राहिले. पुढे 2012 मध्ये त्यांच्या पत्नि सौ. राणीताई लंके या पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्या व पंचायत समितीच्या उपसभापती झाल्या. याच राणीताई लंके पुढे 2017 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेल्या व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य झाल्या. यामध्ये त्यांचे पती निलेश लंके यांचे सामाजिक कार्य, मेहनत व संघटन होते.

राजकारणातील त्यांचे वर्चस्व व गरूडझेप पाहता पक्षातील काही विघ्नसंतोषी लोकांना रूचले नाही. तालुक्यातील प्रस्थापीतांना त्यांच्या नेतृत्वाची भिती वाटू लागली. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध षडयंत्रास सुरुवात झाली. 28 फेब्रुवारी 2018 रोजी शिवसेनेचे अध्यक्ष मा. उद्धव ठाकरे यांच्या पारनेर दौऱ्यात झालेल्या पुर्वनियोजीत दगडफेकीचे खापर निलेश लंके यांच्यावर फोडण्यात आले. त्यामुळे 6 मार्च 2018 रोजी त्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर 10 मार्च 2018 रोजी त्यांचा जन्मदिवस असल्याने वाढदिवसासाठी सुमारे 30 हजार लोक जमा झाल्याने कार्यकर्त्यांचे त्यांच्यावरील प्रेम दिसून येते. जनमाणसात ते नेते या नावाने परिचीत आहेत. याच दिवशी त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव 2019 ची विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

दरम्यानच्या काळात त्यांनी आपला जनसंपर्क व सामाजिक कार्याचा धडाका सुरूच ठेवला. राज्यात ठिकठिकाणी ‘निलेश लंके प्रतिष्ठान’ च्या शाखा उघडल्या. निलेश लंके यांच्या कामाची व कार्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार मा. शरदचंद्र जी पवार साहेब यांनी घेऊन त्यांना राष्ट्रवादी पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची संधी दिली. 30 जानेवारी 2019 रोजी त्यांनी पारनेर येथे महासभा घेऊन पक्षात प्रवेश केला. निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक मोठा युवावर्ग त्यांच्या पाठीशी उभा राहिला.

5 ऑगस्ट 2019 रोजी मा. अजितदादा पवार यांच्यासह अनेक राष्ट्रवादी नेत्यांच्या उपस्थितीत जनसंवाद यात्रेस सुरुवात केली. प्रत्येक गावागावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. 24 ऑक्टोबर 2019 रोजी 61 हजार मताधिक्याने निवडून येऊन एका सामान्य गरीब कुटूंबातील शिक्षकाचा कामगार मुलगा आमदार झाला. त्यांच्या या विक्रमी विजयाने तालुक्यातील अनेक प्रस्थापीतांची एक फळी गारद झाली व पारनेर सह नगर तालुक्यातील जनता ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीली.

राज्यात महाआघाडीचे सरकार आले कारणाने एक सामान्य कुटुंबातील आमदार सत्तेतील आमदार झाले योगायोग असा की 145 मॅजिक फिगर चे मतदान निलेश लंके यांच्या मताने झाले व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदी,ज्या पक्षातून आमदार निलेश लंके यांची हाकलपट्टी केली त्या मा.शिवसेना तालुकाप्रमुख निलेश लंके यांच्या मताने उद्धव साहेब ठाकरे हे महाआघाडीचे मुख्यमंत्री झाले.

हजारोंचा जनसमुदाय जमलेल्या विजयी सभेमध्ये हा सामान्य घरातील आमदार भावनिक झाला व येथे जन्मलेला प्रत्येक माणूस आमदार आहे असा मनाचा मोठेपणा दाखवत साधेपणाची साद दिली व पिढीजात चालत आलेल्या घराणेशाहीला खिळ घालत तसेच तरुणांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोण गढून झाला असतानाही सामान्य कुटुंबातील व्यक्ती राज्यातील विधानसभेत पोहोचत मतदारसंघाचे नेतृत्व करू शकते हे सिद्ध केले. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी पारनेर तालुक्यातील या हिऱ्याला ओळखुन विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी दिली त्या संधीचे लोकनेते निलेश लंके यांची सोनं केले.

आमदार झाल्यानंतर आपल्या कार्याचा झंझावात चालू ठेवत महाराष्ट्रात कुणीही नाही केले असे या लोकप्रिय कार्यकुशल आमदार लंके यांनी चालू केले.प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी पारनेर येथे जनता दरबार व मंगळवारी नगर येथे जनता दरबार घेत सर्वसामान्य माणसांच्या प्रशासकीय पातळीवर होणारी अडवणूक व त्यांची होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी सर्व अधिकारी वर्गाला एकत्र बोलवत जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक सुरू केली व हजारो प्रलंबित प्रकरणे मार्गी लावली. जनता दरबार ही नवीन संकल्पना त्यांनी पारनेर-नगर मतदार संघात उदयास आणली.

नोव्हेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मतदार संघातील अनेक गावांमध्ये शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचे शासकीय पंचनामे करण्यासाठी सर्व अधिकारी यंत्रणा बरोबर घेत गावोगावी जात झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

प्रथमच विधानसभेत गेलेले आमदार निलेश लंके यांना विधिमंडळाची कुठलीही माहिती नसताना पहिल्यास हिवाळी अधिवेशनात आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्वातून महाराष्ट्राच्या विधानसभेत अनेक मुद्दे तारांकित करत मतदार संघातील विविध प्रलंबित विषयाला हात घातला. व महाराष्ट्राच्या विधानसभेत एक साधेपणाचे आमदार हे वेगळेपण महाराष्ट्राला दाखवून दिले .

अधिवेशनाच्या काळात मुंबईमध्ये तळ ठोकून अनेक मंत्री महोदयांच्या भेटीगाठी घेत आपला दुष्काळी मतदार संघात नाविन्यपूर्ण योजना कशा राबवता येतील याचा अभ्यास करत पाठपुरावा केला.त्यात टाकळीढोकेश्वर येथील पोलीस स्टेशन असो,प्राथमिक शिक्षकांचा प्रश्न असो, ढवळपुरी येथील एम.आय.डी.सी. असो पाणी प्रश्न असो,रोहित्राची कमतरता व वीज वितरण कंपनीच्या अनेक समस्या असो,बाभुळवाडे सबस्टेशन असो,पारनेर शहराचा नागरी विकास असो, याप्रमाणे अनेक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कागदपत्रांचा पाठपुरावा करत आपल्या नेतृत्वाचे वेगळेपण दाखवून दिले. सामान्य नागरिकांमध्ये लगेच व सहज मिसळण्यांची त्यांची शैली त्यांना इतर राजकारणी व पुढाऱ्यांपेक्षा वेगळी ठेवते. त्यांच्या या कार्यशैलीमुळे अनेक कार्यकर्ते त्यांना जोडत गेले. जनतेप्रती त्यांच्या आपुलकीमुळे जनतेमध्ये त्यांच्याप्रती जिव्हाळा निर्माण झाला. कार्यकर्त्यांत मिसळून ग्राउंड लेवलवर प्रत्यक्ष काम ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. यामुळे ते सर्व सामान्य वाटतात. निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून मतदार संघासह राज्यात त्यांनी तरुणांचे एक संघटन उभे केले व तरुणही प्रतिष्ठानच्या कार्यात उत्स्फुर्तपणे सहभागी झाले.

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावर अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. परंतु संघटनात्मक नेतृत्वाचा पगडा आमदार निलेश लंके यांच्यावर असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नातून तो अविश्वासाचा ठराव बारगळला गेला.आमदार लंके यांचा राजकीय मुस्तद्दीपणा पुन्हा एकदा तालुक्याने पाहिला. तदनंतर झालेली पंचायत समिती सभापती उपसभापती निवडणुकीत विरोधक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी पाकीटमारी केल्यामुळे सभापतीपदी शिवसेनेचा उमेदवार आरुढ झाला परंतु उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या सौ.सुनंदाताई सुरेश धुरपते यांची वर्णी लावण्यात आमदार लंके यशस्वी झाले.व त्यांच्या विकासात्मक राजकीय व सामाजिक कार्याचा आलेख दिवसेंदिवस वाढतच गेला .

224 पारनेर नगर मतदार संघाची भूमि ही शुरांची, वीरांची, त्यागी समाज सुधारकांची, साधू संतांची भूमी या भूमीने देशाला अनेक नामवंत हिरे दिले आहे. बहिर्जी नाईक, सेनापती बापट, संत निळोबाराय महाराज तसेच या मतदार संघातील पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार हे या मतदार संघातील भूमिपुत्र व त्यांच्या कर्तृत्वाची ओळख सातासमुद्रा पलीकडे पोहोचवणारी पारनेर नगरची माती .

देशाचे राजकारण व समाजकारण करत देशाला नवी दिशा देणारे व तळागाळातील सामान्य कुटुंबातील व्यक्तींची गुणवत्ता ओळखण्यात माहीर असणारे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब या जवाहीराने निलेश लंके नावाचा मौल्यवान हिऱ्याची पारख करत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून निलेश लंके यांच्यावर विश्वास टाकला व त्या विश्वासाच्या बळावर एका सामान्य शिक्षकाच्या मुलाला पारनेर नगर मतदार संघाच्या आज वरील राजकीय इतिहासात सर्वाधिक 61 हजार मताधिक्याने जनतेने निवडून दिले व सर्वसामान्य जनतेच्या हृदयअसनावर जनतेने आपला जननायक म्हणून त्या सामान्य व्यक्तीला लोकनेता ही पदवी बहाल केली.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Nilesh Lanke: "हॅलो, अजित पवार बोलतोय..."; आमदार निलेश लंकेचं कौतुक करत अजितदादांनी दिला मोलाचा सल्ला".