राहुरी तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख राहुरी तालुका विषयी आहे. राहुरी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
राहुरी तालुका
राहुरी is located in अहमदनगर
राहुरी
राहुरी
राहुरी तालुक्याचे अहिल्यानगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर
जिल्हा उप-विभाग श्रीरामपूर
मुख्यालय राहुरी

क्षेत्रफळ १०३५.११ कि.मी.²
लोकसंख्या २,९४,७४८ (२००१)
साक्षरता दर ७३.७८

तहसीलदार फसीउद्दिन शेख
लोकसभा मतदारसंघ अहमदनगर(दक्षिण)
विधानसभा मतदारसंघ राहुरी
आमदार श्री प्राजक्ता तनपुरे
पर्जन्यमान ४५५ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ

राहुरी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय राहुरी गावात असून तालुक्यात एकंदरीत ९६ गावे आहेत. राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे कृषी विद्यापीठ आहे.

राहुरीपासून पश्चिमेस ८ किमी अंतरावर घोरपडवाडी गाव आहे. हे गाव कांदा व वांगी उत्पन्नात तालुक्यातील अग्रेसर गाव आहे. पाच महादेवाची मुखे असलेले जागृत देवस्थान श्री पंचमुखी केकताईश्वर देवस्थान तसेच श्री क्षेत्र विरभद्र देवस्थान व गावातील कार्यशील संघटना जय बजरंग युवा प्रतिष्ठाण तत्परतेने काम करत असते.

बाह्य दुवे[संपादन]

  • "राहुरी तालुक्याचा नकाशा". ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.