हिवरे बाजार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?हिवरे बाजार

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१९° ०४′ ०७″ N, ७४° ३६′ ०४″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर अहमदनगर
जिल्हा अहमदनगर
लोकसंख्या
साक्षरता
 (२०११)
९५ %
भाषा मराठी
सरपंच पोपटराव पवार
ग्रामपंचायत हिवरे बाजार
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 414103
• MH
संकेतस्थळ: http://hiware-bazar.epanchayat.in

हिवरे बाजार हे अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील एक गाव आहे.

हिवरे बाजार हे गाव इतिहासात घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध होते. हिवरे गाव हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखत्यारित असणाऱ्या जुन्नर परगाणा भागाचे शेवटचे गाव. गावात पूर्वी अन्य प्राण्यांचा बाजारही भरायचा. घोड्यांची आणि हत्तींची खरेदी व्हायची.

हिवरे बाजार गावाला लागूनच निजामाचे राज्य होते.. हिवरे बाजारात तेव्हा खूप दूधदुभते होते. त्यामुळे इथे पट्टीचे पहेलवान तयार होत.[१]

१९७२ च्या दुष्काळानंतर ज्वारी आणि बाजरी हीच हिवरे बाजार गावातली मुख्य पिके झाली. ९५ टक्के लोक दारिद्य्र रेषेच्या खाली गेले. गावात पावसाचे प्रमाण २०० ते ४०० मिलीमीटर असूनही गावातले लोक ४ महिन्यांसाठी स्थलांतर करू लागले. गावात सावकाराचे राज्य आले. कालांतराने दुधाची जागा दारुने घेतली. दारुने गावात धिंगाणा आणि मारामाऱ्या आणल्या. दारूमुळे गावात चोऱ्या होऊ लागल्या.[१]

त्यानंतर १९८९ पासून हिवरे बाजार हे गाव सरपंच पोपटराव पवार यांच्या प्रयत्नांमुळे सुधारू लागले. ९० ते ९५% ग्रामविकासाचा आराखडा तयार झाला. जलसंधारणाचे नियोजन करून गावात पहिले पाणी आले. समपातळी चर खणून कुरण विकास झाला, रोजगार मिळाला आणि पाणीही मिळाले.[१]

लोकसहभागाच्या आणि सामूहिक श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम झाल्याने हिवरे बाजार ग्रामपंचायतीस २००९चा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक सामाईक पुरस्कार जाहीर झाला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c "हिरव्यागार गावाची गोष्ट (भाग: १)".[permanent dead link]

बाह्य दुवे[संपादन]