Jump to content

निळवंडे धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(निलवंडे धरण या पानावरून पुनर्निर्देशित)
निळवंडे धरण

निळवंडे धरण
अधिकृत नाव निळवंडे धरण
धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
प्रवरा नदी
स्थान निळवंडे
सरासरी वार्षिक पाऊस १०५८ मिलिमीटर
लांबी ५३३ मीटर
उंची ७४.६५ मीटर
बांधकाम सुरू १९७१
ओलिताखालील क्षेत्रफळ ६४२६० हेक्टर
जलाशयाची माहिती
क्षमता ८.३ टीएमसी
जलसंधारण क्षेत्र २०२.२१ चौरस किमी
क्षेत्रफळ ८०२ हेक्टर
व्यवस्थापन कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र

'निळवंडे धरण प्रवरा नदीवर बांधलेले आहे.महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात निळवडे गावाजवळ हे धरण आहे. या धरणाची क्षमता ७.८ टी एम सी आहे.

निळवंडे धरणावर कसे पोहचाल

[संपादन]

प्रवरा नदी वरील निळवंडे धरणावर जाण्यासाठी राजूर आणि अकोले या दोन ठिकाण वरून राज्य परिवहन महामंडळाच्या बसची सुविधा आहे. जर तुम्ही स्वतःच्या वाहनाने जाणार असाल तर अकोले पासून विठे गावा पर्यंत कोल्हार घोटी राज्य महामार्ग व त्या नंतर विठे येथून निब्रळ गावा मार्गे निळवंडे धरणाच्या भिंती पर्यंत रस्ता आहे. जर राजूर वरून येणार असाल तर चिंतळवेढे गावा मधून निळवंडे धरणाच्या भिंती जवळ जाण्यासाठी रस्ता आहे.

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे