Jump to content

शिर्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?श्री साईनगर (शिर्डी)
Shirdi
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१९° ४६′ १२″ N, ७४° २८′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ५०४ मी
जिल्हा अहिल्यानगर जिल्हा
लोकसंख्या ३६,००४ (२०११)
भाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 423109
• ++९१२४२३
• एम एच-१७

शिर्डी Shirdi.ogg उच्चार हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर आहे. इ.स.च्या १९ च्या शतकाच्या उत्तरार्धात संत साईबाबांच्या वास्तव्यामुळे शिर्डी नावारुपास येऊ लागले.

  • साईबाबांच्या पश्चात तेथे भक्तांनी उभारलेल्या साईबाबा मंदिरामुळे धार्मिक क्षेत्र म्हणून हे प्रसिद्धी पावले आहे.
  • शिर्डी उपविभाग

शिर्डीला साईनगर देखील म्हणतात, हे शहर वेस्टर्न सीशोर लाइन (अहमदनगर - मनमाड रोड) या व्यस्त मार्गाच्या पूर्वेस १८५ कि.मी. आहे.

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील संत श्री साईबाबा यांचे घर म्हणून शिर्डी प्रख्यात आहेत. शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट ही सर्वात श्रीमंत मंदिर (संस्था) आहे.

इतिहास

[संपादन]

शिर्डी हा शिलधी या शब्दाचा अपभ्रंश आहे, असे समजले जाते.

साईबाबांचे वास्तव्य व उत्तरकालीन मंदिर

[संपादन]

साईबाबा हे वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीला आले. साईबाबा लोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाई नावाच्या पडक्या मशिदीत बसत होते व त्यानंतर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्वारकामाईत ६० वर्षे वास्तव्य होते. मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी १५ ऑक्टोबर, इ.स. १९१८ रोजी साईबाबांनी समाधी घेतली.

साईबाबांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी शिर्डीस मंदिर उभारले. या मंदिरामुळे शिर्डीस धार्मिक क्षेत्राचे महत्त्व आले असून दररोज सुमारे ८,००० ते १२,००० भाविक साईबाबा मंदिरास भेट देण्यासाठी शिर्डीस येतात. दिवसेंदिवस भाविकांची संख्येत वाढ होत आहे.

शिर्डीच्या मंदिराची श्रीमंती

[संपादन]

आयुष्यभर फकिराचे जीवन जगलेल्या साईबाबांच्या नावाने काढलेल्या संस्थानची झोळी जगभरातील लाखो भाविकांच्या दातृत्वामुळे भरली आहे. बाबांच्या नावाने सुरू करण्यात आलेले हे संस्थान करोडपती बनले आहे़. साईबाबांच्या मूर्तीवर दीड कोटींच्या हिरेजडित सुवर्ण मुकुटासह कोट्यवधींची आभूषणे घालण्यात येतात.

शिर्डी संस्थानची स्थापना झाल्यावर २८ मे १९२३ रोजी संस्थानने काही तुटलेली तांब्या-पितळेची भांडी व चांदीच्या दोन ताटल्या मोडून बाबांच्या आरतीसाठी तबक बनवले होते़. आज २०१९ साली, बाबांचे सिंहासन व मंदिराच्या शिखरासह रोजच्या पूजेतील वापराच्या जवळपास सर्वच वस्तू सोन्याच्या व चांदीच्या आहेत़.

शेवटच्या ९२ वर्षांतील संस्थानचा ताळेबंद आश्चर्यकारक आहे़. १९२३ साली संस्थानच्या इंपीरियल बँकेच्या बचत खात्यात केवळ १,४४५ रुपये ७ आणे व ६ पैसे होते़. आज २०१५ साली, पंधरा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये संस्थानचे १,४८३ कोटी रुपये ठेवीच्या स्वरूपात आहेत़. या वर्षी ठेवींवर संस्थानला निव्वळ व्याजापोटी ९९ कोटी रुपये मिळाले़. संस्थानची स्थावर मालमत्ता पाचशे कोटींवर आहे़

याशिवाय वापरातील सोन्यासह जवळपास ३८० किलो सोने, चार हजार किलो चांदी आणि सात कोटींची हिरेमाणके तिजोरीत आहेत़.

वाहतूक

[संपादन]
  1. विमानसेवा आणि विमानतळ: १ ऑक्टोबर २०१७ रोजी शिर्डी विमानतळाचे उद्घाटन भारताचे अध्यक्ष श्री. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. शिर्डी विमानतळापासून तीन विमाने निघतात, एक दिल्ली विमानतळ, एक हैदराबाद विमानतळ आणि दुसरे मुंबई विमानतळ. शिर्डीच्या दक्षिण-पश्चिमेस १४ कि.मी. अंतरावर काकडी (कोपरगाव तालुका) येथे विमानतळ हे आहे.<ref>परंतु, मूळ योजनांनुसार बांधकाम फेब्रुवारी २०१६ मध्ये पूर्ण झाले आणि पहिल्या ट्रायल फ्लाइटने २ मार्च २०१६ ला उतरविले. धावपट्टी २२०० मीटर ते ३२०० मीटर पर्यंत वाढवण्याची योजना आहे. लक्ष्यपूर्तीची तारीख २०१७ किंवा २०१८ आहे. शिर्डीपासून अनुक्रमे औरंगाबाद आणि पुणे येथे सर्वात महत्त्वाची विमानतळ आहेत.
  2. रेल्वे: शिर्डी हे गाव रेल्वेने जोडलेले आहे. शिर्डीला रेल्वेने येण्यासाठी बहुतेक गाड्या आहेत. शिर्डीत आता साईनगर शिर्डी नावाचे एक नवीन रेल्वे स्थानक आहे, जे मार्च २००९ मध्ये कार्यरत झाले. २०११ पर्यंत शिर्डीत चेन्नई, मुंबई, विशाखापट्टणम, काकीनाडा, हैदराबाद म्हैसूर व इतर शहरांमध्ये/ राज्यांत शिर्डी रेल्वे स्थानक टर्मिनल थांबे म्हणून आहे.
  3. बसमार्ग: शिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक खासगी वाहतूक कंपन्यांच्या बसगाड्याही उपलब्ध आहेत.
  • शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ किमी आहे.
  • औरंगाबादपासून शिर्डीचे अंतर साधारणपणे १६० किमी आहे. तसेच शिर्डीला जाण्यासाठी औरंगाबादाहून रेल्वेसुद्धा उपलब्ध आहे.
  • कोपरगावपासून शिर्डी केवळ १५ किमी आहे.
  • श्रीरामपूर पासून शिर्डीचे अंतर साधारणपणे ३५ किमी आहे.
  • अहमदनगर शहरापासून शिर्डी ८५ किमी अंतरावर आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
  • "साईबाबा संस्थानाचे संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)