दौंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दौंड
भारतामधील शहर

Daund.jpg
दौंड रेल्वे स्थानक
दौंड is located in महाराष्ट्र
दौंड
दौंड
दौंडचे महाराष्ट्रमधील स्थान

गुणक: 18°27′47″N 74°34′44″E / 18.46306°N 74.57889°E / 18.46306; 74.57889

देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
जिल्हा पुणे जिल्हा
लोकसंख्या  (२०११[१])
  - शहर ४९,४५०
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०


दौंड (इंग्रजीत Daund) हे पुणे जिल्ह्यातील एक शहर व दौंड तालुक्याचे मुख्यालय आहे. पुणेअहमदनगर शहरांपासून प्रत्येकी ८० किमी तर सोलापूर शहरापासून १८६ किमी अंतरावर असलेल्या दौंडची लोकसंख्या २०११ साली ४९,४५० इतकी होती.

दौंड रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रामधील महत्त्वाच्या जंक्शन रेल्वे स्थानकांपैकी एक असून पुण्याहून दक्षिणेकडे व उत्तरेकडे धावणार्‍या सर्व रेल्गाड्यांचा येथे थांबा आहे. दौंड शहर पुणे-सोलापूर महामार्गापासून ९ किमी अंतरावर आहे. महाराष्ट्र राज्य महामार्ग १० दौंडपासून सुरू होतो व धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा ह्या गावापाशी संपतो.

हवामान[संपादन]

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा,जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो.तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी.पर्यंत असते.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]