विंध्य पर्वतरांग
(विंध्य या पानावरून पुनर्निर्देशित)
विंध्य मध्य भारतातील एक पर्वतरांग आहे. याला विंध्यगिरी किंवा विंध्याद्री असेही म्हटले जाते. या पर्वतामुळे भारताचे उत्तर व दक्षिण भारत असे भौगोलिक विभाजन होते, असे मानले जाते.
विंध्य पर्वतरांगांची सुरुवात पूर्व गुजरातमध्ये होते. ही रांग गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशात विभागली गेली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर परिसरातील गंगा नदीपर्यंत या रांगांतीलच्या टेकड्या विखुरल्या आहेत.
सातपुडा पर्वतरांग विंध्य पर्वतरांगांच्या दक्षिणेस समांतर असून नर्मदा नदीच्या खोऱ्याने मधला प्रदेश व्यापला आहे. [विंध्य पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर = सद्भावना(752m)
पर्यावरण[संपादन]
- अरवली व विंध्य पर्वतरांगांमधील प्रदेश पर्जन्यछायेत असल्याने रूक्ष आहे.
- मानवाला ज्ञात असलेले सर्वात अर्वाचीन बहुपेशीय जीवाश्म विंध्य पर्वतरांगांत सापडले होते. [१]