सायरस पालनजी मिस्त्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सायरस पालोनजी मिस्त्री या पानावरून पुनर्निर्देशित)
सायरस मिस्त्री
जन्म ४ जुलै, १९६८
निवासस्थान मुंबई, भारत
वांशिकत्व पारशी
नागरिकत्व आयरिश
शिक्षण एम.एस्‌‍सी., सिव्हिल इंजिनियर
प्रशिक्षणसंस्था इम्पीरिअल कॉलेज, लंडन बिझनेस स्कूल
कारकिर्दीचा काळ इ.स. २०१२ ते
मालक टाटा उद्योगसमूह
पदवी हुद्दा चेअरमन, टाटा समूह
धर्म पारशी धर्म
अपत्ये
वडील पालनजी मिस्त्री
संकेतस्थळ
http://tata.com/aboutus/sub_index.aspx?sectid=CEBLCxoD5rg=

सायरस पालनजी मिस्त्री ( ४ जुलै, इ.स. १९६८) हे १८८७ साली स्थापन झालेल्या ' टाटा सन्स ' ह्या टाटा समूहाच्या प्रमुख कंपनीचे अध्यक्ष आहेत. टाटा सन्सचे १८ टक्के भागभांडवल हे सायरस यांच्या कुटुंबाच्या मालकीचे आहे.

रतन टाटा सेवानिवृत्त झाल्यावर सायरस मिस्त्री २९ डिसेंबर २०१२ रोजी कार्यभार हाती घेतला. लंडनमधील इम्पीरिअल कॉलेजातून इंजिनीयरिंगची पदवी घेतलेले आणि लंडन बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले सायरस मिस्त्री आपल्या कुटुंबाच्या शापूरजी पालनजी आणि कंपनीमध्ये १९९१ साली संचालकम्हणून दाखल झाले. सायरस यांचे त्यांचे वडील पालनजी मिस्त्री हे बांधकाम व्यवसायातील नामांकित व्यक्ती आहेत. सायरस मिस्त्रींची बहीणसुद्धा टाटा घराण्यातच दिलेली आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.