विधानसभा
भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या कनिष्ट गृहाला विधानसभा म्हणतात. भारताच्या घटनेच्या १७० व्या कलमानुसार प्रत्येक राज्यात विधानसभा हे सभागृह अस्तित्वात आहे. विधानसभा हे राज्य कायदेमंडळाचे कनिष्ठ पण अधिकाराच्या दृष्टीने वरिष्ठ असलेले जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे.[१] विधानसभेत कमीत कमी ६० आणि जास्तीत जास्त ५०० सभासद असतात; मात्र लहान राज्याच्या विधानसभा अपवाद आहेत. उदा. पुडुचेरी विधानसभा ३० सदस्यांची आहे. सर्वाधिक संख्याबळ असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ सदस्य आहे. विधानसभेच्या मतदारसंघांपैकी काही जागा अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव असतात. विधानसभेचे मतदारसंघ कमीत कमी ७५,००० ते ३५०,००० मतदारांचा मिळून बनलेले असतात.
महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश व तेलंगणा या ६ राज्यांत द्विसदनी कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे व तेथे विधानसभेसोबत विधान परिषदसुद्धा अस्तित्वात आहे. बाकीच्या सर्व राज्यांत एकसदनी कायदेमंडळ पद्धती असून तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे. भारतातील विधानसभा ह्या भारतीय लोकसभां सारख्याच काम करणार असे घटनाकारांचे मत होते.
वर्तमान विधानसभा
[संपादन]डिसेंबर २०२४ मधील राज्य विधानसभा खालीलप्रमाणे होत्या:
माजी / विसर्जित विधानसभा
[संपादन]विधानसभा | ठिकाण | कार्यकाळ | कायदा |
---|---|---|---|
अजमेर विधानसभा | अजमेर | १९५०-५६ | राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ |
भोपाळ विधानसभा | भोपाळ | १९४९-५६ | राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ |
बॉम्बे विधानसभा | बॉम्बे (मुंबई) | १९५०-६० | बॉम्बे पुनर्रचना कायदा, १९६० |
कुर्ग विधानसभा | मेर्करा (मडिकेरी) | १९५०-५६ | राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ |
हैदराबाद विधानसभा | हैदराबाद | १९४८-५६ | राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ |
मध्य भारत विधानसभ | ग्वाल्हेर | १९४८-५६ | राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ |
पतियाळा आणि पूर्व पंजाब राज्य संघ विधानसभा | पतियाळा | १९४८-५६ | राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ |
सौराष्ट्र विधानसभा | राजकोट | १९४८-५६ | राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ |
त्रावणकोर-कोची विधानसभा | तिरुवनंतपुरम | १९४९-५६ | राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ |
विंध्य प्रदेश विधानसभा | रेवा | १९४८-५६ | राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ |
संदर्भ
[संपादन]- ^ "State Legislative Assemblies" (PDF). www.india.gov.in. 2018-04-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2018-12-12 रोजी पाहिले.
- ^ "Terms of the Houses". Election Commission of India (इंग्रजी भाषेत). 28 August 2022 रोजी पाहिले.