शेगांव
(शेगाव या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
?शेगांव महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
![]()
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | अकोला,बुलढाणा |
विभाग | विदार्भ |
जिल्हा | बुलढाणा |
भाषा | मराठी |
तहसील | शेगांव |
पंचायत समिती | शेगांव |
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे. |
शेगांव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्री गजानन महाराज यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण विदर्भातील पंढरपूर असे संबोधले जाते. महाराजांच्या समाधीस्थळावर एक भव्य मंदिर बांधले गेले असून त्याची व्यवस्था तेथील 'गजानन महाराज संस्थान' पाहते. तेथील संस्थानाच्या 'भक्त निवास' मध्ये अल्प दरात मुक्कामाची सोय केलेली आहे. तेथे ७०० खोल्यांची व्यवस्था असून, गर्दीच्या वेळेस त्याव्यतिरिक्त ५००० बिछाने देखील पुरविण्यात येतात. येथे येणाऱ्या भक्तांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या निवासाची व्यवस्था येथे आहे. याच संस्थानाने आनंद-सागर हे प्रेक्षणीय स्थळ सुमारे ३५० एकर जागेपैकी सध्या १२० एकर जागेवर निर्माण केले असून पर्यटकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहे. त्याच्या विस्ताराचे काम खूप चांगल्या प्रकारे सुरु आहे. ते शेगाव-बाळापूर रस्त्यावर, शेगांवपासून सुमारे २.५ कि.मी. अंतरावर आहे. तेथे जवळच 'आनंद सागर विसावा' येथेही भक्त निवास असून तेथेही राहण्याची व भोजनाची सोय आहे.
या संस्थानातर्फे सेवार्थ बस सेवा, निःशुल्क महाप्रसाद, अल्पदरात भोजन व्यवस्था, विविध वैद्यकिय सेवा इत्यादी अनेक प्रकल्प राबविण्यात येतात.
शेगांव रेल्वे स्थानक मुंबई-भुसावळ-नागपूर मार्गावर आहे. शेगांवची लोकसंख्या ३२,८२४ आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरातून शेगावकडे राज्य परिवहन मंडळाच्या व खाजगी बसेस उपलब्ध असून मुंबई-नागपूर मार्गावरील सर्व प्रमुख रेल्वे गाड्या येथे थांबतात.
कचोरी[संपादन]
येथील 'कचोरी' हा खाद्यपदार्थ सुप्रसिद्ध आहे. त्यास आय एस ओ मानांकन मिळालेले आहे. शेंगाव मधील कचोरी मोठ्या प्रमाणात लोकांना आवडलेला खाद्य पदार्थ आहे. म्हणून त्या खाद्य पदार्थाला शेगाव कचोरी असे संबोधले जाते.
हेही पाहा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
बुलढाणा जिल्ह्यातील तालुके |
---|
खामगांव | चिखली | संग्रामपूर | सिंदखेडराजा | देउळगांव राजा | नांदुरा | बुलढाणा तालुका | मेहकर | मोताळा | मलकापूर | लोणार | जळगाव जामोद | शेगांव |