कोरेगांव
कोरेगांव | |
जिल्हा | सातारा जिल्हा |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | २३,५३९ (शहर) (२०११) |
दूरध्वनी संकेतांक | ०२१६3 |
टपाल संकेतांक | ४१५-५०१ |
वाहन संकेतांक | MH-११ |
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
कोरेगांव हे सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्याचे गाव आहे.
नारायण हरी आपटे हे मराठी लेखक येथे रहात होते. त्यांचा मृत्यू कोरेगांव येथे नोव्हेंबर १४, इ.स. १९७१ रोजी झाला. कोरेगाव येथे शंकराचे मोठे मंदिर आहे. हे मंदिर केदारेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. श्रावण महिन्यात केदारेश्वरांची यात्रा भरते. तसेच येथे भैरवनाथाचे पण हेमाडपंथी मंदिर आहे. त्यांची पण मोठी यात्रा भरते. या गावातून तीळगंगा ही नदी वाहते, तर वसना ही नदी गावाशेजारून वाहते. ब्रिटीश काळापासून येथे व्यापारी पेठ आहे. इथला व्यापार थेट पंजाब आणि दिल्लीशी पूर्वीपासून आहे. इथला पांढरा आणि काळा घेवडा बेकरी साठी या ठिकाणी पाठवला जातो. आल्याचे मोठे उत्पादन कोरेगाव परिसरात होत असते. अभिनेत्री उषा चव्हाण हिचे एकंबे हे गाव इथून ८ किमी अंतरावर आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे वडील पायगोंडा पाटील हे कोरेगाव तहसील मध्ये मुद्रांक विक्री करीत.
इथे दोन बस स्थानक आहेत